Posts

Showing posts from May, 2023

रस्त्यालगतच्या अतिक्रमणांवर बांधकाम विभागाने फिरवला जेसीबी

Image
एकच दिवशी १२५ घरे, टपऱ्या, हाॅटेल, दुकाने भुईसपाट कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७: कोपरगाव शहरातील साईबाबा तपोभूमी ते रेल्वे स्टेशन दरम्यानच्या स्टेशन रोडवरील अतिक्रमणांवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने जेसीबी फिरवून अतिक्रमणात असलेले दुकानं, पञ्यांसह कच्ची पक्की घरे, दुकाने, टपऱ्या तसेच दारुच्या अड्ड्यांवर जेसीबी फिरवून १२५ अतिक्रमणे भूईसपाट केल्याने स्टेशन रोडच्या शेजारचा परिसर मोकळा झाला आहे.   याबाबत कोपरगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाचे अभियंता वृषभ शिंदे यांनी अधिक माहिती देताना म्हणाले की, स्टेशन रोड परिसरातील नागरिकांनी रस्त्याला अगदी खेटून घरे, दुकाने व टपऱ्या थाटल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत होता. नियमाप्रमाणे रस्त्याच्या मध्यभागापासुन १५ मिटर अंतरा पर्यंत कोणालाही बांधकाम किंवा अतिक्रमण करता येत नाही माञ साईबाबा तपोभूमी ते कोपरगाव रेल्वेस्टेशन या दरम्यान १२५ अतिक्रमण धारकांनी रस्त्याला अडथळा होईल असे अतिक्रमण केले होते. अतिक्रमण काढण्यासाठी आपण गेल्या अनेक महिन्यांपासून नोटीसा वर नोटीसा देवूनही कोणीच अतिक्रमण न काढल्याने अखेर बुधवारी सकाळी दहा वाजता कोपरगाव शहर ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं वावड असणाऱ्यांनी या देशातलं पाणीही पिवू नये - डॉ. राजरत्न आंबेडकर

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीच भेदभाव केला नाही. या देशातील प्रत्येकांच्या घरात विद्युत पुरवठा करण्याची व्यवस्था केली, प्रत्येकांच्या घराघरात, पिण्यासाठी पाणीपुरवठा योजनांची व्यवस्था केली इतकंच काय तर शासकीय सेवेत नौकरी आणि हक्काच्या सुट्ट्यांची व्यवस्था करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं वावड असणाऱ्यांनी या देशाचं पाणी सुध्दा पिवू नये असा टोला. राजरत्न आंबेडकर यांनी लगावला.  बुध्दीस्ट यंग फोर्सच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील मुख्य रस्त्यावर विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार उभारण्यात आले असुन त्याचा लोकार्पण सोहळा बौध्द महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी राजरत्न आंबेडकर हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव साहेबराव कोपरे होते. तर आमदार आशुतोष काळे, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेगाव, डॉ. गोवर्धन हुसळे...

श्री मुक्ताई ज्ञानपीठासाठी कोल्हे परिवाराने यापुढेही सहकार्य करावे -स्वामी रामानंदगिरीजी महाराज

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे व माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी श्रीक्षेत्र पुणतांबा येथील श्री मुक्ताई ज्ञानपीठासाठी आजपर्यंत भरीव सहकार्य केलेले आहे. त्यांच्या सहकार्यातून या ठिकाणी अनेक विकासाची कामे झाली आहेत. यापुढील काळातही श्री मुक्ताई ज्ञानपीठासाठी कोल्हे परिवाराने असेच सहकार्य करावे, अशी अपेक्षा श्रीक्षेत्र पुणतांबा येथील श्री मुक्ताई ज्ञानपीठाचे प्रमुख प.पू. स्वामी रामानंदगिरीजी महाराज यांनी व्यक्त केली. श्रीक्षेत्र पुणतांबा येथील श्री मुक्ताई ज्ञानपीठाच्या वतीने कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांना संत श्री मुक्ताई यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी (१४ मे २०२३) आयोजित सोहळ्यात कै. सौ. चंद्रभागाबाई राघोजी बुधवंत यांच्या नावाने देण्यात येणारा ‘मातोश्री’ पुरस्कार श्रीक्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्तपीठ संस्थानचे प्रमुख प.पू. भास्करगिरीजी महाराज व श्री मुक्ताई ज्ञानपीठाचे प्रमुख प.पू. स्वामी रामानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्नेहलताताई कोल्हे यांना सन्मानपत्र, ...

समता इंटरनॅशनल स्कूलची निकालाची उज्वल परंपरा कायम - स्वाती कोयटे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ :   सी.बी.एस.ई.चा २०२२-२३ चा इ. १० वी आणि इ.१२ वी चा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अहमदनगर जिल्ह्यात बाजी मारत उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. इ.१० वीत अथर्व बेरगळ आणि हर्ष कासलीवाल यांनी ९७ टक्के गुण मिळवुन स्कूलमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला तर तनिषा जैन हिने ९६.४ टक्के गुण मिळवत द्वितीय तर गणेश गवळी आणि आयुष जोर्वेकर यांनी ९५.४ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. तर इ.१२ वीत श्रुतिका देशमुख हिने ९५ टक्के, ओम जाधव आणि प्रीती परदेशी यांनी ९४.२ तर गार्गी कदम हिने ८८ टक्के गुण मिळवत अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. समता इंटरनॅशनल स्कूलचे या वर्षी सर्वच विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन समता पॅटर्न अहमदनगर जिल्ह्यात यशस्वी ठरत इ.१० वी आणि इ.१२ वीचा समता स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. समता इंटरनॅशनल स्कूल मधील ६ विद्यार्थी ९५ टक्केच्या पुढे गुण मिळवुन उत्तीर्ण झाले आहे.त्यात अथर्व बेरगळ, हर्ष कासलीवाल, तनिषा जैन, गणेश गवळी, आयुष जोर्वेकर, सोनल अहिर...

कोपरगावच्या साई सालकरची उत्तुंग भरारी, जर्मनीच्या स्टुटगार्ट विद्यापीठाची एम.एस. पदवी प्राप्त

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : कोपरगावच्या साईप्रसाद राजेंद्र सालकर याने जर्मनीच्या  स्टुटगार्ट  विद्यापीठातून इन्फोटेक (एम्बेडेड सिस्टम्स) एम एस मास्टर ऑफ सायन्स इन इंजीनियरिंग पदवी प्राप्त केली आहे. स्टुटगार्ट विद्यापीठ, जर्मनी येथे  त्याचे संशोधन प्रबंध (Research Project) सादर केले होते. त्यात स्टुटगार्ट, जर्मनी विद्यापीठाची  (एम.एस.)  मास्टर ऑफ सायन्स इन इंजीनियरिंग ही पदवी मिळून त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.  साई प्रसाद सालकर यांनी शारदा इंग्लिश स्कूल मधून दहावी पास केल्यानंतर संजीवनी येथील केबीपी पॉलिटेक्निक मध्ये इएनटीसी या शाखेतून डिप्लोमा केला. चांगले मार्क मिळवून पुणे येथील पीआयसीटी कॉलेजमध्ये डिग्रीसाठी प्रवेश मिळवला त्या कॉलेजमध्ये पहिल्या पाच मध्ये येण्याचा मान मिळून एनटीसी शाखेची डिग्री प्राप्त केली त्यानंतर अमेरिका किंवा जर्मनीमध्ये जाऊन इएनटीसी मध्ये एमएस करण्याची त्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी युनिव्हर्सिटीकडे प्रयत्न केले. परंतु आधी त्याला टीसीएस पुणे या कंपनीत त्याला नोकरी मिळाली पुन्हा येथे एक दीड दोन वर्षे काम केल्यानंतर कंपनीने त्याला जर्मनी येथे पाठवले त...

संजीवनीची अनुश्री बनकर ९८ . २० टक्के गुण मिळवुन तालुक्यात प्रथम - डॉ. मनाली कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १५ : केंद्रिय माध्यमिक  शिक्षण  मंडळाने (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एक्झामिनेशन-सीबीएसई) फेब्रुवारी फेब्रंवारी/मार्च २०२३ मध्ये इ.१० वीच्या परीक्षांचे निकाल जाहिर केले असुन त्यात संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित संजीवनी अकॅडमीच्या अनुश्री योगेश  बनकर हीने ९८.२० टक्के गुण मिळवुन कोपरगांव तालुक्यातील सर्व सीबाएसई पॅटर्नच्या शाळांमधुन प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण झाली. या परीक्षेमध्ये संजीवनी अकॅडमीच्या १७ विध्यार्थ्यांनी ९० टक्यांपेक्षा अधिक गुण मिळवुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन घडविले आहे, तसेच १०० टक्के निकालाची परंपराही कायम राखली आहे, अशी  माहिती स्कूलच्या संचालिका डॉ. मनाली अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.           पत्रकात डॉ. कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की, हितेन समीर शाह  याने या परीक्षेत ९७.६० टक्के गुण मिळवुन दुसरा क्रमांक पटकाविला तर मनस्वी विजय नरोडे हीनेे ९७ टक्के गुण मिळवुन तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. २९ विध्यार्थ्यानी  विध्यार्थ्यांनी ८० ते ८९ टक्यांपर्यंत गुण मिळविले तर २३ विध्यार्थ्यांनी ७० ते ७९ टक्यांपर्यंत गुण मि...

नगरपरिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांना साड्या वाटून बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस साजरा

शेवगाव प्रतिनिधी, दि. ११ : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस  येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वाढदिवसाच्या निमित्ताने शेवगाव नगरपरिषदे मधील सर्व महिला कर्मचाऱ्यांना साड्या वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबवून वाढ दिवस साजरा करण्यात आला. वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्रा.  किसन चव्हाण, नगरपरिषदेचे माजी बाधंकाम सभापती कैलास तिजोरे, मुख्याधिकारी सचिन राऊत, तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल यांच्या हस्ते साड्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी  नगरपरिषद कामगार संघटना प्रमुख रमेश खरात, उपाध्यक्ष सुरज मोहीते, राजूभाई काझी,राजू नाईक, देवदान कांबळे ,भानुदास गायकवाड,  विष्णु तुजारे, सुरेश खडांगळे, शेख सलीम जिलानी, शामभाऊ शिंदे, संजय लांडे पाटील,शेख राजुभाई, कडु मगर, डॉ. दिलीप वाघमारे, रईस सौदागर उपस्थित होते.     याप्रसंगी  प्रा .चव्हाण म्हणाले, आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत वंचित उपेक्षित शोषित कष्टकरी शेतकरी कामगार या पिचलेल्या वर्गासाठी रस्त्यावर उतरून चळवळीत काम करतो याचा आम्हाला अभिमान आहे. आदरणीय बाळासाहेब हे महामानव डॉ. बाबासाहेब आंब...

समता पतसंस्थेच्या क्युआर कोड द्वारे पैसे देणे-घेणे झाले सोपे – काका कोयटे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : समता पतसंस्थेचे कामकाज गेली अनेक वर्ष अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली द्वारे सुरू आहे. मोबाईल बँकिंग, व्हावचरलेस बँकिंग, पेपरलेस बँकिंग, फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम, कॉल सेंटर या प्रणालीमुळे समता बँकिंग क्षेत्रात अग्रेसर आहे. त्या तंत्रज्ञानातील यु.पी.आय. प्रणालीच्या माध्यमातून क्यु.आर कोड द्वारा ही सेवा आधी इनकमिंग पद्धतीने सुरू होती. समताचा ३८ वा वर्धापनदिन व जागतिक तंत्रज्ञान दिवसाच्या निमित्ताने आता ही सेवा आउट गोइंग केल्यामुळे देखील समताचा क्यु.आर.कोड वापरणाऱ्या ग्राहकांना बँकेपेक्षा अधिक सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच राष्ट्रीयकृत, खाजगी बँकांपेक्षाही समताचे कामकाज सरस होणार असून ग्राहक, सभासदांना क्युआर कोड द्वारा कोणतेही शुल्क न आकारता इनकमिंग बरोबर आउट गोइंग सेवा देखील मिळणार असल्याचे समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सांगितले.    समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या ३८ व्या वर्धापन दिनी झालेल्या वार्षिक सर्व साधारण सभेत सेल्फ बँकिंग प्रणालीचा आणि क्यु.आर. कोड आउट गोइंग सेवेचा शुभारंभ प्रमुख पाहुणे विजय नायडू, सभासद डॉ.नरेंद्र भट...

खता सोबत इतर साहित्यांची बळजबरीची विक्री थांबवावी

खत कंपनीच्या धोरणाविरोधात खत विक्रेत्यांचे आमदार राजळे यांना निवेदन शेवगाव प्रतिनिधी ,  दि. १० : खत उत्पादक कंपन्याच खाता सोबत लिंकिंग करून अन्य अनावश्यक उत्पादने शेतकऱ्यांच्या माथी मारतात. मात्र ग्राहकांच्या तोंडावर किरकोळ वितरक असल्याने त्यानाच होणार्‍या वादाला व बदनामीला सामोरे जावे लागते. म्हणून शासकीय स्तरावरच लिंकिंगला कायदेशीर  पायबंध घालावा. अशी मागणी तालुक्यातील रासायनिक खत व्यापारी संघटनेने आमदार मोनिकाताई राजळे यांचे कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.     यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे  की,  तालुक्यातील कृषी विक्रेत्यांनी या अगोदर २४ ऑगस्ट २०२२ ला बंद पाळून ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र शासनाने त्यावर कुठलीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे खत विक्रेत्या कंपन्यांची मुजोरी आणखीनच वाढत गेली. त्यानंतर २९ ऑगस्ट २०२२ ला तत्कालीन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या समवेत सर्व कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक झाली. तेव्हा कोणत्याही कंपनीच्या खतावर इतर साहित्याची लिंकिंग केली गेली तर संबंधित कंपनीवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. अशी तंबी त्यांनी दिली ...

एसएसजीएम महाविद्यालयाच्या विद्यार्थांची पोलीस भरतीत निवड

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : महाराष्ट्र शासनातर्फे नुकत्याच झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी होऊन एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चांगले यश प्राप्त केले आहे. यात सेंट्रल कस्टम एक्साईजमध्ये पवन सुनील शिरसाट या विद्यार्थ्याला कॉन्स्टेबलपदी नियुक्ती मिळाली. तर रेश्मा रमजान शेख, अरबाज इब्राहिम शेख, अमोल शंकर थोरात, अनंत बबन पवार या विद्यार्थ्यांना पोलीसपदी नियुक्ती मिळाली आहे. तसेच, गणेश सुनील वादगे या विद्यार्थ्यांची इंडियन नेव्हीत क्लर्कपदी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांनी, महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून मिळालेली प्रेरणा आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व त्यातील प्रा.संजय गायकवाड यांचे मार्गदर्शन यांचा आपल्या यशात मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. हे यश प्राप्त केल्याबद्दल महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथकाका शिंदे तसेच सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. रमेश सानप आणि सर्व प्राध्यापकांनी सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

अधिकाऱ्यांच्या बचावासाठी शेतकऱ्यांचा बळी जाणार नाही याची काळजी घ्या - आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० :  अस्मानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. उन्हाळ्यात देखील होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तरीदेखील या नुकसानीला न घाबरता झालेले नुकसान सोसून शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे शेतकरी केंद्रस्थानी ठेवून खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व खते मुबलक उपलब्ध होतील याचे योग्य नियोजन करा. अधिकाऱ्यांच्या बचावासाठी शेतकऱ्यांचा बळी जाणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी खरीप आढावा बैठकीत कृषी विभागाला दिल्या आहेत. कोपरगाव तहसील कार्यालय येथे आ. आशुतोष काळे यांनी बुधवार (दि.१०) रोजी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून  कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत खरीप आढावा व नियोजन बैठक घेतली. या बैठकीत कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या समस्याबाबत कृषी विभागाला मार्गदर्शन केले. यावेळी मार्गदर्शन त्यांनी सांगितले की, अवेळी झालेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या कांदा पिकाचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी अत्यंत अडचणीत आहे.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आशा खरीप हंगामाकडे लागल्या आ...

खरीप हंगाम पूर्वनियोजन बैठक कृषी खात्याच्या गंभीर तक्रारीने गाजली

शेवगाव प्रतिनिधी, दि . १० : दोन दिवसापूर्वी पंचायत समितीमध्ये झालेल्या खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठकीत बळीराजांना सहकार्य करणाऱ्या विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविणाऱ्या तालुक्यातील कृषी कर्मचाऱ्यांचा व प्रगतिशील शेतकऱ्याचा सन्मान करण्यात आला. तसेच बळीराजा प्रति असहकार करणाऱ्या, कामाला सातत्याने दांड्या मारणाऱ्या काही कर्मचाऱ्यांबाबत देखील अनेकांनी केलेल्या गंभीर तक्रारींनी ही बैठक विशेष  गाजली. तक्रारदारांनी बैठकीत खुलेआम समोरासमोर तक्रारी तर केल्याच शिवाय त्यांच्या शिष्टमंडळाने आमदार मोनिकाताई राजळे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतल्याने तक्रारीचे गांभीर्य वाढले आहे.         यावेळी  ‘माझी वसुंधरा ‘ योजनेअंतर्गत राज्यात दीड कोटीचे प्रथम पारितोषिक पटकावणाऱ्या वाघोलीचे  युवक कार्यकर्ते उमेश भालसिंग यांनी रामनाथ वांढेकर तीन वर्षापासून गावचे कृषी सहायक म्हणून कागदोपत्री कार्यरत असले तरी ते कधीही गावात येत नाहीत. शेतकऱ्यांनी केलेले फोनही घेत नाहीत. घेतले तर उडवा उडवीची उत्तरे देतात. गेल्या तीन वर्षात कृषी खात्याची एकही योजना गावात राबविली गेली नाही. प्रशासन, लोकप्रतिनिधी लोक...

येसगावचा नावलौकिक वाढविण्यासाठी सदैव कटिबध्द - विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि, १० : येसगाव हे विकासासह सर्वच बाबतीत कोपरगाव तालुक्यात आदर्श गाव असून, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त गाव म्हणून येसगाव संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते येसगावला आदर्श गाव म्हणून प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. केवळ विकासाच्या बाबतीत नव्हे तर धार्मिक व इतर क्षेत्रातही येसगाव यापुढेही नेहमी अग्रेसर रहावे. यासाठी जी काही मदत लागेल ती कोल्हे परिवार व संजीवनी उद्योग समुहाकडून दिली जाईल, अशी ग्वाही सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी दिली. कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे ओम श्री साई ग्रुपने आयोजित केलेल्या श्री साई सच्चरित्र महापारायण व संगीतमय साई कथामृत सोहळ्याची मंगळवारी (९ मे) श्रीक्षेत्र सराला बेटाचे मठाधिपती प. पू. ह.भ.प. रामगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय व मंगलमय वातावरणात सांगता झाली. विवेक कोल्हे यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून प. पू. ह.भ.प. रामगिरीजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्...

पोलीसांच्या कारवाईतुन गुटखा बंदी की, विक्रीला संधी

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : कोपरगाव तालुक्यासह जिल्ह्यात ज्या ज्या गुटखा विक्रेत्यांवर किंवा मावा विक्रेत्यांवर पोलिसांनी धाडी टाकुन कारवाया केल्या त्यापैकी बहुतांश गुटखा विक्रेत्यांचे आजही मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री जोमात सुरु आहे तर कारवाई करणारे पोलीस व अधिकारी कोणत्या कारणाने कोमात आहेत.  एखाद्या गुटखा विक्रेत्याला कायद्याचा दणका दिल्यानंतर त्याला पोलिसांची अथवा अन्न व औषध प्रशासनाची भिती बसण्याऐवजी तो गुटखा विक्रेता पुन्हा जोमाने कसा काय विक्री करु शकतो. त्याला गुटखा विक्री करण्यासाठी कोणा कोणाचा अर्थपूर्ण पाठिंबा असतो.  स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी गुटखा विक्रेत्यांना सूट इतर अवैध व्यवसाय करणाऱ्याबरोबर इतके दयाळू कसे वागतात. कायद्याचे रक्षकच जर भक्षक होत असतील तर गुन्हेगारी विश्वाला खतपाणी घातल्या सारखे आहे.  तालुक्यात अनेक गुटखा किंग आजही राजरोसपणे गुटखा विक्री करतात. पोलीसांच्या कारवाईतुन गुटखा विक्री बंद तर होतच नाही, उलट जोमाने विक्री सुरू होते हे आता हळूहळू सिद्ध होत आहे. जिल्ह्याचा तिसरा डोळा म्हणून ओळख अलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या काही पोलीस कर्मचाऱ्यांना जिल...

तालुक्यातील सर्व प्रमुख रस्त्याची कामे होणार पूर्ण, आ. राजळे यांची ग्वाही

शेवगाव प्रतिनिधी, दि. ९ : तालुक्यातील बहुतेक मुख्य रस्त्यांची कामे पूर्ण झाली तर काही कामे  जोरात सुरू आहेत, मानवी शरीरातील धमन्याप्रमाणे रस्त्याचे  कार्य असते. रस्ते चांगले असतील तर दळणवळण वाढते. विकास कार्य होऊ शकते. गेल्या काही दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांची मोठी दूर्दशा झाली. शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व प्रमुख रस्ते आपण पूर्ण करत असल्याची ग्वाही आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिली.        शेवगावातील बस स्थानक ते भगूर या २ कोटी ७५ लाख  रुपये खर्चाच्या रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या. आ. राजळे म्हणाल्या, जनसामान्यासाठी कार्यरत राहणे हेच आपले कर्तव्य असल्याची आपली निष्ठा असून विकास कार्यात  राजकारणाला आपण कधीही थारा देत नाही.        श्री संत गाडगे बाबा चौकात या रस्त्याच्या कामाचा शुभारभ करण्यात आला.  या रस्त्याबरोबरच तालुक्यातील सुरू असलेल्या सर्वच रस्त्याची कामे महिनाभरात पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी आ. राजळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या.         यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, महिला आघाडी अध्यक्ष आशा गरड, बापू प...

थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज - विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : थॅलेसेमिया हा रक्ताशी संबंधित अनुवंशिक व धोकादायक आजार असून, या आजाराच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कोपरगाव तालुक्यात थॅलेसेमियाबाधित जवळपास ५० रुग्ण आढळले आहेत. थॅलेसेमिया या आजाराबाबत समाजात सर्व स्तरावर व्यापक जागृती करण्याची गरज आहे. थॅलेसेमियाच्या रुग्णाला वारंवार रक्ताची गरज भासते. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रक्तदान करण्यासाठी पुढे आले पाहिजे. तसेच थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये म्हणून स्वयंसेवी संस्था व संघटनांनी रक्तदान शिबिरांच्या आयोजनासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे आवाहन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले. जागतिक थॅलेसेमिया दिनाचे औचित्य साधून संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आज मंगळवारी (९ मे २०२३) कोपरगाव येथील व्यापारी धर्मशाळेत आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन विवेक कोल्हे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. ‘जागवू या ज्योत माणुसकीची’ या ब्रीदवाक्यानुसार विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठा...

संजीवनीच्या १० अभियंत्यांची व्हर्चुसा अमेरिकन कंपनीत निवड - अमित कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ९ : संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मागिल बॅचच्या अभियंत्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवुन दिल्या. या अभियंत्यांनी तेथे उत्तम कामगिरी करून संजीवनीची  विश्वासाहर्ता अधोरेखित केली. यामुळे अनेक नामांकित कंपन्या संजीवनीच्या अभियंत्यांना प्रथम पसंती देत आहे. अलिकडेच व्हर्चुसा या मुळच्या अमेरिकन कंपनीने संजीवनी अभियांत्रिकी माहाविद्यालयाच्या अंतिम संत्रातील १० नवोदित अभियंत्यांची मुलाखती घेवुन वार्षिक पॅकेज रू ५ .५ लाखांवर निवड केल्याचे नेमणुक पत्र दिले आहे. अशा प्रकारे संजीवनीच्या प्रयत्नातुन शेकडो ग्रामिण विध्यार्थी नोकरदार होत आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.  कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की, व्हर्चुसा कार्पोरेशन ही एक माहिती तंत्रज्ञान सेवा देणारी कंपनी आहे. ग्रामीण भागातील विध्यार्थी हे जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाशी अवगत असले पाहीजे अशी तळमळ संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक कै. शंकरराव  कोल्हे यांची अ...

स्वच्छता गृहाच्या मागणीसाठी नगरपालिकेत सामूहिक मूत्र विसर्जन आंदोलन

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : शहरातील मुख्य चौकात महिला व पुरुषासाठी स्वच्छता गृह बांधावे या मागणीसाठी सर्व सामान्य नागरिक व बाजार पेठेतील व्यापारी यांच्या समवेत लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने नगरपालिका आवारात प्रतिकात्मक सामूहिक मूत्र विसर्जन आंदोलन करण्यात आले, अशी माहिती लोक स्वराज्य आंदोलनाचे अँड.नितीन पोळ यांनी एका निवेदनाद्वारे नगर पालिकेला केली आपल्या निवेदनात पोळ पुढे म्हणाले की, कोपरगाव शहरात मूख्य रस्त्या लगत पुरुषांसाठी स्वच्छता गृहे होती. मात्र विकास कामाच्या गदारोळात ही स्वच्छता गृहे नगरपालिकेने काढून टाकले तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्य गृहाच्या बाजूला असलेले स्वच्छता गृहा शेजारी नवीन इमारतीचा पाया खोदत असताना आठ दिवसापूर्वी पडले. मात्र त्यामुळे परिसरातील नागरिक व व्यापारी यांची मोठी हाल होत आहे तसेच महिला करिता एवढ्या मोठ्या शहरात भाजी मार्केट मध्ये एकमेव स्वच्छता गृह आहे.  अनेक व्यापारी व नागरिक यांनी वारंवार नगरपालिकेकडे स्वच्छता गृहाची मागणी केली. मात्र आठ दिवस झाले तरी नागरिक, व्यापारी यांच्या मागणीकडे नगरपालिका अक्षम्य दुर्लक्ष करत असून आज रोजी कोपरगाव शहरातही महिल...

कोपरगाव तालुक्यातील बड्या गुटखाकिंगवर पोलीसाची कारवाई

गुटखा किंग पोलीसांना गुंगारा देवुन पसार   कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : संपूर्ण कोपरगाव तालुक्यातील गुटखा विक्रेत्यांना गुटखा पुरवणारा तालुक्यातील कोळपेवाडी येथील रितेश गादीया हा गुटखा किंग गेल्या अनेक वर्षांपासून पोलीसांच्या आशीर्वादाने गुटखा विक्री करत आहे. माञ रविवारी राञी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक धाड टाकुनी रितेश सुभाष गादीया याला मुद्देमालासह  पकडले माञ पोलिसांची चाहुल लागताच गुटखा माफिया रितेश गादीया आपल्या ताब्यातील गुटख्याची गाडी सोडून पसार झाला.    स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गादीया यांच्या ताब्यातील मालवाहतुक गाडीची झाडाझडती घेतली असता त्यात विविध कंपन्यांच्या गुटख्याचे पुढे आढळून आले. १ लाख ११ हजार ५४० रुपयांचा गुटखा व ५ लाखांची मालवाहतुक गाडी एम‌ एच. १५ एच‌एच. ४००१ हिच्यासह तब्बल ६ लाख ११ हजार ५४० रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.   अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कर्मचारी शिवाजी अमोल ढाकणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी रितेश सुभाष गादीया यांच्या विरोधात कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   दरम्यान स्था...

साखर गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यानी नवनविन तंत्रज्ञान आत्मसात करावे - राजेंद्र चांदगुडे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ :  साखर कारखान्याचे गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नवनविन तंत्रज्ञान आत्मसात करून ऑफ सिझन मधील देखभालीची कामे प्राधान्याने पूर्ण करावी असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टीटयूटच्या अभियांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र चांदगुडे यांनी केले.               सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याला बदलत्या परिस्थितीत स्पर्धेला सामोरे जातांना सज्ज असले पाहिजे हा ध्यास माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या पश्चात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी घेतला असून अभ्यासु युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी देश व राज्यपातळीवरील साखर उद्योगातील विविध तंत्रज्ञामार्फत कारखान्याच्या उत्पादन विभागातील कर्मचा-यांना अद्ययावत ज्ञान मिळावे यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट पुणे यांच्यावतीने एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यांत आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.             प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या प्रगतीचा आढावा देवुन प्रशिक्षणाचे महत्व विषद...

कृषी योजना कागदावर न दाखवता बळीराजा पर्यंत पोहचवा - आमदार राजळे

शेवगाव प्रतिनिधी, दि. ८ : आपला तालुका दुष्काळी आहे. याचे भान ठेवून कृषी खात्याने शासनाच्या विविध योजना कशा   ‘छान छान’ आहेत हे फक्त कागदावर दाखवू नये. प्रत्यक्षात त्या योजना ज्यांच्यासाठी आहेत त्या बळीराजापर्यंत पोहोचविल्या पाहिजेत. यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हावेत. त्यासाठी कर्मचारी व अधिकार्‍यावर कारवाईची वेळ आणू नये, अशी जाणीव करून देत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, त्यांच्या आत्महत्या रोखल्या जाव्यात. यासाठी आपण काम करावे असे आवाहन आमदार मोनिकाताई राजळे यांनी येथे केले. पंचायत समितीच्या घुले पाटील सभागृहात आज सोमवारी खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक आमदार राजळे यांच्या अध्यक्षते खाली पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. आमदार राजळे म्हणाल्या, ठिबक सिंचन, अस्तरीकरण अशा शेतक-यांसाठी वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजना पुनः सुरु करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून त्याचा  जास्तीत जास्त लाभ तालुक्यातील शेतकऱ्यांना  मिळाला पाहिजे. तसेच जलयुक्त शिवार योजनेत तालुक्यातील १० गावाचा नव्याने समावेश करण्यात आला असून त्या योजने अंतर्गत विविध कामांचा आराखडा शिवार फेरीतून कृषी विभागाने तयार करावा.   ...

श्रीगणेशच्या ९ विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी निवड

कोपरगाव प्रतिनिधी, दि.८ : आज प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल, जिज्ञासा, संशोधकृती आणि काहीतरी वेगळे करण्याची आवड निश्चितच आहे. परंतु हे सर्व गुण फुलवण्यासाठी, रुंदीगत करण्यासाठी आपणास आवश्यकता आहे प्रत्यक्षात प्रायोगिक कौशल्य व संशोधनात्मक कृती वाढवणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची ती संधी उपलब्ध करून देण्यासाठी जनसेवा प्रतिष्टान, अहमदनगर संचलित सर डॉ सी.व्ही.रामण बालवैज्ञानिक स्पर्धा आयोजित करण्यात येते. या बालवैज्ञानिक परीक्षेत श्रीगणेश शैक्षणिक संकुलाच्या दोन विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर व सात विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळविला. यामध्ये अनुष डांगे व हर्षदा वाघे या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर अनुक्रमे  द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे यांनी यांनी दिली.           याचबरोबर शिवांजली डांगे व साईशा डांगे यांनी तालुकास्तरावर प्रथम तर सिद्धी वहाडणे द्वितीय, भूमिका गमे व अथर्व चौधरी तृतीय, वेदिका चौधरी व तेजल दिघे यांनी चतुर्थ क्रमांक पटकाविला.           या परीक्षेत राज्य, जिल्हा व तालुका गुणवत्ता यादीत येणा...

पावसाळयापूर्वी सर्व मंजूर रस्त्यांची कामे पूर्ण करा - आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि, ८ : येणाऱ्या पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना रस्त्यांच्या बाबतीत अडचणी येणार नाही याची काळजी घेवून कोपरगाव विधानसभा संघातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांच्या दुरुस्तीची व सर्व मंजूर झालेल्या नवीन रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, तसेच पंचायत समिती व कोपरगाव नगरपरिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघाच्या रस्त्यांच्या कामांची सद्य परिस्थिती सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारे अर्थसंकल्पीय निधी, जिल्हा नियोजन, आमदार निधी,२५१५,पंचायत समिती जिल्हा नियोजन ३०५४, ग्रामीण भागातील ग्रामपंचायत अंतर्गत येणारे रस्ते, कोपरगाव नगरपालिका अंतर्गत शहरातील प्रत्येक प्रभागातील रस्त्यांची डांबरीकरण व खडीकरणाची कामे आदी कामांची सखोल माहिती घेवून त्यांनी रस्ते दुरुस्तीच्या कामाला गती देण्याच्या व नवीन मंजुरी मिळालेल्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मतदार स...

जगाला बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची गरज - विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : जगाला समता, अहिंसा, शांतता, ज्ञान व मानवतावादाचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध हे प्रयत्नवादी, अहिंसावादी, बुद्धिप्रामाण्यवादी होते. भगवान गौतम बुद्ध यांचे तत्त्वज्ञान सर्वव्यापी आहे. मानवी जीवन आनंददायी, सुंदर करण्यासाठी त्यांच्या तत्त्वज्ञानाची व समतावादी विचारांची आज जगाला खरी गरज आहे, असे मत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, युवा नेते विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले. कोपरगाव येथील बुद्ध धम्म प्रसारक मंडळ (ट्रस्ट) तर्फे विश्वशांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती शुक्रवारी (५ मे) नगर-मनमाड महामार्गावरील लुंबिनी उपवन बुद्ध विहार येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमास युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी उपस्थित राहून तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच सर्वांना तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती व बुद्ध पौर्णिमेच्या मन:पूर्वक...

संवत्सर रामवाडी येथे बिबट्याने शेळी फाडली

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : तालुकयातील संवत्सर रामवाडी येथील हरिभाऊ चौतमल यांची पत्नी सुभाष कोद्रे यांच्या उसाच्या शेतात शेळ्या चारीत असताना उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेळीवर झडप घालून  तिचा फडशा पडला, शेळीची मान धरून उसाच्या शेतात ओढीत नेले केल्याने चौतमलबाई घाबरून जागेवर बेशुद्ध झाल्या घटनेची माहिती समजतात बिबट्याला पळवण्यासाठी फटाके फोडण्यात आले. यावेळी उपसरपंच विवेक परजने यांनी फोन केल्यानंतर फाडलेल्या शेळीचा पंचनामा वनपाल संजय साखरे, डॉ. दहे, अशोक घोरपडे हरिभाऊ चौतमल यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला. सध्या संवत्सर  परिसरात बिबट्याचाही व रानडुकराचा संचार वाढल्याने शेतकऱ्यांना  रात्रीच्या वेळी पाणी भरणे, शेतात जाणे अवघड झाले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्या मोठा असल्याने  शक्यतो घराबाहेर पडण्याचे धाडस शेतकरी करीत नाहीत. लोकांना भीतिमुक्त करण्यासाठी सरपंच सुलोचनाताई ढेपले ग्रामपंचायत मधून वनविभागाला पत्र देऊन पिंजरा लावण्याची मागणी साठी प्रयत्नशील आहे. तरीही परिसरातील नागरिकांनी सावध राहून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना नोकरी देणारे संजीवनी महाविद्यालय

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ६ : संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट डीपार्टमेंटच्या पुढाकराने हेक्सावेअर टेक्नाॅलाॅजी या माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील जगभर कार्य असलेल्या कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत घेतलेल्या मुलाखतींचे निकाल जाहिर केले असुन यात एकुण पाच नवोदित अभियंत्यांची सुरवातीस वार्षिक पॅकेज रू चार लाख देवु करून नोकरीसाठी निवड केली आहे. संजीवनीच्या प्रयत्नातुन ग्रामिण  विध्यार्थ्यांना  नोकरदार बनविण्यासाठी चांगले यश  मिळत असल्याचे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पसिध्दी पत्रकात म्हटले आहे.   पत्रकात पुढे म्हटले आहे की हेक्सावेअर ही  कंपनी जरी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असली तरी संजीवनीतुन विध्यार्थ्यांना  इंटर डिसीप्लिनरी एज्युकेशन दिल्या जात असल्यामुळे या कंपनीने  काॅम्प्युटर इंजिनिअरींग, इलेक्ट्राॅनिक्स अँड  टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरीग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग शाखांमधील विध्यार्थ्यांची  निवड केली आहे. यात सऊद  नशिर सय्यद, अंजली अविनाश  बोरणारे, आदित्य नानासाहेब डोईफोडे, हरीवर्धन व ऋतुजा सुभाष  कदम यांचा समावेश  आहे. हे स...

लग्नाची वरात मरणाच्या दारात...

व-हाड घेवून जाणारी पिक अप पडली विहीत, सातजन जखमी कोपरगाव प्रतिनिधी दि. ४: लग्नाचं व-हाड घेवून जाणारी पिक अप गाडी कोपरगाव तालुक्यातील  तळेगांव मळे येथील शिवारातील एका विहीरीत कोसळल्याने गाडीतील एका लहान मुलांसह  सातजन गंभीर जखमी झाले तर तिघे गंभीर जखमी असुन त्यांना कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.   या घटनेची अधिक माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील सोनार वस्ती येथील  अशोक पवार यांचा मुलगा आकाश अशोक पवार यांचे छञपती संभाजी नगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे गुरूवारी दुपारी साडेबारा  वाजता लग्न असल्याने लग्नासाठी चुलत भावासह जवळच्या नातेवाईकांची  व- हाडाची पिक अप गाडी सोनार वस्ती  तेथुन सकाळी खुलताबाद च्या दिशेने निघाली असता. मुंबई नागपूर महामार्गावरील कोपरगाव तालुक्यातील तळेगांव मळे शिवारात असताना  व-हाड घेवून जाणारी एम. एच. १५  जे. सी. १०२३ या  क्रमांकाची पिक अप  गाडीवरील चालक सचिन चव्हाण याने समोरुन येणाऱ्या गाडीला चुकवण्याच्या नादात आपल्या ताब्यातील गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता सोडून  रस्त्या शेजारी असलेल्या विहीत जावून कोसळली....

रेरा कायद्यानुसारच बांधकाम व्यावसायिकांनी ग्राहकांना सुविधा देणे गरजेचे - ॲड. मयुरा वाळींबे

कोपरगाव प्रतिनिधी दि.२ : नवीन घर, फ्लॅट घेणाऱ्या ग्राहकांची बांधकाम व्यावसायिकांकडून कोणतीही फसवणु होणार नाही किंवा  बांधकाम व्यावसायिकांनी रेरा व महारेरा कायद्याच्या नियमावलीत राहुन ग्राहकांना सुविधा पुरविणे अपेक्षीत आहे अन्यथा कायदेशीर गुन्हा दाखल होवुन शकतो अशी माहिती ॲड. मयुरा वाळींबे यांनी दिली.  कोपरगाव येथील हाॅटेल स्वस्तिकच्या सभागृहात कोपरगाव- शिर्डी परिसरातील बांधकाम व्यवसायीकांच्या  क्रेडाई संघटनेच्या वतीने बांधकाम व्यावसायिक व ग्राहकांच्या कायदेशीर समस्या या विषयावर कायदेतज्ञ ॲड. मयुरा वाळींबे यांच्या मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.   यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष प्रसाद नाईक, उपाध्यक्ष  विलास खोंड,सचिव चंद्रकांत कौले, मनोज अग्रवाल, राजेश ठोळे, मनिष फुलफगर, दिनार कुदळे, सचिन बोरावके,हिरेन पापडेजा, सिध्देश कपिले, किसन आसणे, किरण आसणे, अक्षय जोशी, प्रदिप मुंदडा, संदीप राहतेकर आनंद अजमेरे,आदींनी  या शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी कायदेतज्ञ ॲड. विद्यासागर शिंदे, ॲड. शंतनु धोर्डे, ॲड. बाबासाहेब पानगव्हाणे, ॲड. सुयोग जगताप, ॲड. दिपक जाधव, संतोष भट्टड, प्रदिप मुंदडा, चे...

सर्वसामान्यांना ६०० रूपयांत वाळू ब्रास देण्याचा शासनाचा क्रांतीकारीनिर्णय - महसूलमंत्री विखे

शिर्डी,दि.१ मे (उमाका वृत्तसेवा) – ‘‘सर्वसामान्य जनतेला ६०० रूपयात घरपोच वाळू ब्रास मिळणार आहे.‌ राज्यातील या निर्णयाची सुरुवात पहिल्या प्रथम अहमदनगर जिल्ह्यातून आजच्या महाराष्ट्र दिनापासून होत आहे. सर्वसामान्यांचे हितासाठी शासनाने घेतलेला हा क्रांतिकारी निर्णय आहे.’’ असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यसाय विकास मंत्री‌ तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्यातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन व वाळू विक्री ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण श्रीरामपूर तालुक्यातील नायगांव येथे महसूलमंत्र्यांच्या हस्ते आज झाले. यावेळी श्री.विखे-पाटील‌ बोलत होते. यावेळी श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी,अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, नायगांवचे सरपंच राजाराम राशीनकर, दीपक पठारे आदी उपस्थित होते. महसूलमंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले की,  ‘‘बेकायदेशीर वाळू उत्खनातून महाराष्ट्रात वाळू माफियांचे साम्राज्य  निर्माण झाले होते.अवैध वाळू विक्री वाढल...

कोपरगांव बाजार समिती निवडणुक बिपीनदादा कोल्हेंनी मानले मतदारांचे आभार

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २ :  कोपरगांव विधानसभा मतदार संघातील शेतक-यांच्या आर्थीक उन्नतीचे केंद्र असलेल्या कोपरगांव बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांसह शेतक-यांनी एकमुखाने विश्वास व्यक्त करून सर्व उमेदवारांना मोठया मताधिक्क्याने विजयी केले त्याबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी मतदारांचे जाहिर आभार मानले असुन बाजार समितीच्या माध्यमांतुन शेतकरी विकासाला सर्वांना बरोबर घेवुन सर्वोच्च प्रधान्य देण्याचे जाहिर केले.            त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, कोपरगांव बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वांनी आपसात मतभेद बाजुला ठेवुन शेतकरी विकासाला प्राधान्य देण्यांबाबत आपण सुरूवातीपासूनच विचार मांडला होता त्याला चांगल्याप्रमाणे यश देखील आले मात्र अंतिम टप्प्यात ही निवडणुक बिनविरोध होता होता राहिली.तरीही मतदार राजांने शेतकरी हित लक्षात घेवुन मतपेटीच्या माध्यमांतुन जो कौल दिला तो सर्वार्थाने योग्य असुन कोपरगांव कृषि उत्पन्न बाजार समिती व त्याअंतर्गत सुरू असलेला विकास असाच सर्वसंमतीने पुढे नेण्यासाठी अटोकाट प्रयत्न करू.  शेतकरी ब...