लक्ष्मीनगरच्या नागरिकांना उतारे मिळण्यासाठी पुढील कार्यवाही तातडीने सुरू करा - आमदार काळे
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : कोपरगाव नगरपरिषद हद्दीत असलेल्या लक्ष्मीनगर भागतील सर्वे नंबर ११३ व ११४ मधील शासकीय जागेवरील वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचे अतिक्रमण नियमानुकुल होवून ती जागा त्या कुटुंबांच्या नावावर होण्यासाठी पुढील कार्यवाही तातडीने सुरू करावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे दिलेल्या लेखी निवेदनात केली आहे. दिलेल्या निवेदनात आ.आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, मागील अनेक वर्षापासून कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगरच्या शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुकुल करण्याचा प्रश्न प्रलंबित होता.त्याबाबत सातत्याने केलेल्या पाठपुराव्यातून सर्वे नंबर ११३ व ११४ मधील लक्ष्मीनगर भागात अतिक्रमण नियमानुकुल करण्याबाबतचा प्रस्ताव कोपरगाव नगरपरिषदेकडून जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आला होता. यामध्ये लक्ष्मीनगर भागातील शासकीय जागेवरील अतिक्रमणे नियमानुकूल करून करणेबाबत सुधारित प्रस्ताव तयार करून त्यामधील रस्ता, रुंदी, खोली जागा, सुविधा क्षेत्र व भूखंड क्षेत्र या बाबीसाठी शिथिलता मिळण्याबाबत देखील विहीत मार्गाने सहाय्यक संचालक, नगर रचना अहमदनगर शाख...