Posts

Showing posts from September, 2022

घोटण वीज उपकेंद्रात आगीने नुकसान

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३०: तालुक्यातील घोटण येथील ३३ केव्हीए उपकेंद्रातील ५ एम व्ही ए पावर ट्रान्सफार्मरला बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.  आग विझविण्यासाठी पाथर्डी नगरपरिषद व गंगामाई साखर कारखान्याचे अग्निशामन बंब घटनास्थळी दाखल झाले. सुमारे दोन तासानंतर  आग आटोक्यात आणण्यात संबधितांना यश मिळाले. आग व धुराच्या प्रचंड लोटामुळे परिसरात काही काळ चिंतेचे व घबराटीचेवातावरण पसरले होते.      या उपकेंद्राच्या परीसरात ५ एमव्हीए चे ४ ट्रान्सफार्मर कार्यान्वीत असून पैकी ५ एमव्ही ए च्या एका ट्रान्सफार्मरमध्ये ऑइल गळती होवून ही आग लागली असावी असा अंदाज वीज वितरण कंपनीचे शेवगावचे उपअभियंता एस.एम लोहारे यांनी व्यक्त केला. वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता काकडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता पाटील यांनी घोटण उपकेंद्रास भेट देवून घटनेची माहिती घेतली. लागलेल्या या आगीमुळे संबधित ट्रान्सफार्मर वरील वीज पुरवठा अन्य ट्रान्सफार्मरवर वळविण्यात येवून त्या गावात सुरळीत वीज पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती उपअभियंता लोहारे यांनी दिली. 

क्रांतिवीरांच्या शौर्यगाथा ने शेवगावचे रसिक भारावले

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३० : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनायाच्या वतीने आयोजित अनामवीर नाईक कृष्णाजी साबळे यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘क्रांतिवीरांची शौर्यगाथा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने शेवगावचे रसिक श्रोते भारावून गेले. येथील शिवशाहीर कल्याण काळे यांनी सादर केलेली क्रांती गीते, शाहिरी, पोवाडे व राष्ट्रीय भारुडकार हमीद सय्यद यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीते व प्रबोधन पर भारुडाने रसिकांच्या मनावर गारुड केले.       खालची वेस परिसरातील श्री पावन मारुती मंदिर देवस्थान ट्रस्टच्या आवारातील सभागृहात  ‘क्रांतिवीरांची शौर्यगाथा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. प्रारंभी सहाय्यक गटविकास अधिकारी दिप्ती गाठ यांच्या हस्ते शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्यास तसेच छत्रपती शिवाजी महाराज, अनामवीर  साबळे, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.         शिवशाहीर काळे यांनी आपल्या पहाडी आवाजात सादर केलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्राचा जयजयकार करणाऱ्या गीताने या कार्...

कोल्हे कारखान्याच्या बॉबी एम्बॉस नावाने बनावट दारू साठा जप्त

आर्थीक नुकसान भरपाई व फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा कोल्हे कारखान्याचा इशारा कोपरगांव प्रतिनधी, ३० :   श्रीरामपुर तालुक्यातील खंडाळा येथील देशी मद्य निर्मीती करणा-या चितळी बॉटलींग प्रा. लि.च्या श्रीरामपुर व अहमदनगर येथील गोदामावर छापा टाकुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या बॉबी एम्बॉस बॉटलचा मोठया प्रमाणांत साठा जप्त करण्यांत आला त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.             याबाबतची माहिती अशी की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत तयार होणारे देशी मद्य बॉबी या नावाने बाजारात लोकप्रिय असुन त्याचा मोठया प्रमाणांत ग्राहकवर्ग आहे. कारखान्यांने बॉबी एम्बॉस बॉटल कॉपी राईट व ट्रेड मार्क अॅक्ट खाली रजिष्टर करून घेतले असुन त्याचे सर्व अधिकार हे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याकडेच आहे. बॉबी एम्बॉस बॉटल वापरून त्यातुन अन्य देशीमद्य उत्पादकांना मद्य विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे.            श्रीरामपुरच्या खंडाळा येथील चितळी बॉटलींग प्रा.लि. मध्ये तयार होणारे मद्य त्यांनी बॉबी एम्बॉस बॉटल मध्ये...

कोपरगाव तालुक्यात भगर खाल्याने २२ व्यक्तींना विषबाधा

 बाधीत व्यक्तींची प्रकृती धोक्याबाहेर  कोपरगाव प्रतिनिधी दि.३० : नवराञौत्सवात बहुतांश महीलांना भगरीच्या पिठामुळे झाली विषबाधा भगरीच्या पिठाच्या भाकरी खाल्याने  कोपरगाव तालुक्यात गेल्या चार दिवसात तब्बल २२ महीलांना विष बाधा झाल्याने तालुक्यातील दुकानदांनी आपल्या दुकानातील भगरीचे पिठ गायब करुन आमचा याच्याशी काही संबंध नाही या अविर्भावत बसल्याचे चिञ पहावयास मिळत आहे.  कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन यादव यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता ते म्हणाले की, भगरीच्या पिठापासुन तयार केलेल्या भाकरी खाल्याने अनेक महीलांना विष बाधा झाल्याने त्यांना उपचारासाठी येथे आणण्यात आले होते. बाधीतांना चक्कर येणे, मळमळणे, उलट्या जुलाब होणे असा शाररीक ञास जाणवत होता. या विष बाधीतांवर तातडीने योग्य उपचार केल्यामुळे अनेकांची प्रकृती स्थिर झाली आहे. आत्तापर्यंत शहरातुन ९ व्यक्तींना विषबाधा झाली होती त्यापैकी चौघांना उपचार करून घरी सोडण्यात आले तर सध्या ग्रामीण रुग्णालयात  ५ महीलावर उपचार सुरू आहे. नागरीकांनी भगरीच्या पिठाच्या भाकरी खाताना योग्य ती खबरदारी न घेतल्याने तसेच कालबाह्य झाल...

भाजप महिला मोर्चाच्या वतीने आयोजित 'मिस कोपरगाव' पारंपरिक वेशभूषा स्पर्धेला उदंड प्रतिसाद

कोपरगाव प्रतिनिधी, दि.३० : शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त कोपरगाव येथील भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने आयोजित ‘मिस कोपरगाव’ आणि पारंपरिक वेशभूषा स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत स्वाती मुळे यांनी प्रथम क्रमांक पटकावत ‘मिस कोपरगाव’ होण्याचा बहुमान मिळविला, तर स्नेहा पंजाबी यांनी द्वितीय आणि चित्रा घुमरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे आणि संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी शारदीय नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून या अभिनव स्पर्धेचे आयोजन केले होते. कोपरगाव येथील कलश मंगल कार्यालयात गुरुवारी (२९ सप्टेंबर) ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.            कोमल झेंडे (मुंबई) यांनी खुमासदार सूत्रसंचालन करीत ही स्पर्धा उत्तरोत्तर अधिकच रंगतदार बनवली. या स्पर्धेत अनेक महिला पारंपरिक आणि हटके वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. त्यांनी गीत-संगीताच्या तालावर आपली कला सादर केली. ...

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १६ अभियंत्यांची बाॅश मध्ये निवड- अमित कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३० : संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित एमबीए, इंजिनिअरींग, पाॅलीटेक्निक, फार्मसी, सिनिअर काॅलेज मधिल विध्यार्थ्यांना  नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या  मिळवुन देवुन पालक व विध्यार्थ्यांची  नोकरदार होण्याची  स्वप्ने पुर्ण करण्यासाठी संजीवनीच्या माध्यमातुन अनेक प्रयत्न करण्यात येतात. याचाच एक भाग म्हणुन संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने एसएपी (सॅप) या प्रशिक्षण देणाऱ्या  जागतिक पातळीवरील कंपनीशी  सामंजस्य करार केला केला आहे. या कंपनीचे एक केंद्र संजीवनी मध्ये असुन या केंद्राद्वारे विध्यार्थ्यांना  प्रशिक्षण देवुन सक्षम केल्या जाते. अलिकडेच या केंद्रातुन प्रशिक्षण घेतलेल्या संजीवनीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १६ नवोदित अभियंत्यांची बाॅश  ग्लोबल साॅफ्टवेअर लि. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सेवा पुरविणाऱ्या  कंपनीने सुरूवातीस रू ५ लाखांचे वार्षिक पॅकेज देवुन निवड केली आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.          ग्लोबल साॅफ्टवेअर लि. या कंपनीने नि...

कोल्हे कारखान्याच्या उस तोडणी कामगारांच्या वारसांना तीन लाख रूपये विम्याचा धनादेश प्रदान

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३० :  संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व कारखान्यांचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने उसतोडणी कामगारांसाठी न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीकडुन गन्ना कामगार अपघात विमा योजना उतरवलेली आहे. त्यात २०२०-२१ गळीत हंगामात उसतोडणी कामगारांचा रस्ते अपघातात मृत्यु झाला होता त्याच्या वारसांना तीन लाख रूपयांचा धनादेश उपाध्यक्ष रमेश घोडेराव व कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यांत आला.            याबाबतची माहिती अशी की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना कार्यस्थळावर वैजापुर विभागातुन बैलगाडीच्या सहाय्याने विलास जिजाउ पवार हे उस वाहतुक करत असतांना त्यांच्या बैलगाडीस ट्रक टँकरने लौकी शिवारात संस्कृती हॉटेल जवळ धडक दिली त्यात त्यांचा व बैलाचा जागीच मृत्यु झाला होता. याप्रसंगी कारखान्यांचे अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांनी संबंधीत मृतांच्या वारसाकडुन आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करण्याच्या सुचना दिल्या व अमृत संजीवनी शु...

कोपरगांव पिपल्स 'बँक' पुरस्काराने सन्मानित

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : अहमदनगर जिल्हयातील नावलौकीक प्राप्त कोपरगांव पिपल्स बँकेने सन 2021-22 मध्ये रिझर्व्ह बँकेचे सर्व निकषांचे पालन करीत ग्रॉस एनपीए 5 टक्केचे आत ठेवल्याबद्दल अहमदनगर जिल्हा सहकारी बँक्स असोसिएशनचे वतीने नुकताच सन्मान करण्यात आला. अहमदनगर जिल्हा बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष चार्टर्ड अकौंटंट गिरीष घैसास यांचे उपस्थितीत मालपानी उदयोग समुहाचे सर्वेसर्वा राजेश मालपाणी यांचे हस्ते सदरचा पुरस्कार बँकेचे चेअरमन सत्येन सुभाष मुंदडा यांना सुपुर्द करण्यात आला. याप्रसंगी बँकेचे जेष्ठ संचालक व माजी चेअरमन कैलासचंद ठोळे, संचालक सुनिल बंब असोसिएशनचे उपाध्यक्ष नाथाजी राउत उपस्थित होते. सध्याच्या मंदीच्या वातावरणात थकबाकी वसुलीस येत असलेल्या अडचणींवर मात करीत तसेच रिझर्व्ह बँकेचे सर्व निकषांचे पालन करीत एनपीए चे प्रमाण 5 टक्केचे आत ठेवण्यात बँकेने यश मिळविले आहे. बँकेने मागील आर्थिक वर्षात सर्वच क्षेत्रात दैदिप्यमान प्रगतीची घोडदौड कायम ठेवून बँकेस लेखापरीक्षण वर्ग ‘अ’ कायम ठेवण्यात यश मिळविले आहे. नुकत्याच झालेल्या सभासदांचे वार्षिक सभेतही बँकेने सभासदांना 15 टक्के लाभां...

बाजारपेठेचे मुल्य निच्चांकी, पण कराचे मुल्य उच्चांकी

 कोपरगाव नगरपालीकेचा अजब कारभार ! कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : कोपरगावची बाजारपेठ असुन नसल्यासारखी आहे. काही ठराविक व्यापाऱ्यांच्या जोरावर व  तालुक्यातील काळे कोल्हे यांच्या ताब्यातील दोन सहकारी साखर कारखान्याच्या जोरावर कशी बशी बाजारपेठ तग धरुन आहे. सना सुदीला कधीतरी बाजारपूठेत गर्दी दिसते अन्यथा मुख्य बाजारपेठेतील व्यापारी ग्राहकांच्या प्रतिक्षेत दिवसभर दुकानातील धुळ झटकत बसतात. गुंतवणुकीच्या व दैनंदिन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित व्यवसाय होत नसल्याने अनेक बड्या व्यापाऱ्यांनी कोपरगाव शहराकडे पाठ फिरवली आहे. शहरातील काही नामवंत व्यवसायीकांनी शेजारच्या मोठ्या शहरात जावून मोठमोठी दुकाने थाटली. कोपरगाव शहरातील बहुतांश नागरीक येथील वातावरणाला कंटाळून स्थलांतर होण्याचा निर्णय घेत आहेत, तर काहींनी घेतला सुध्दा. शहराचा ८० टक्के भाग पुररेषेत असल्याने त्या भागाचा विकास करणे किंवा त्या जागेत इमारती बांधता येत नाहीत. जरी बांधल्या तरी त्यांना शासकीय नियमाप्रमाणे अपेक्षित मुल्य नाही. कोपरगाव शहरातील मालमत्तेला दैनंदिन व्यवहारात इतर शहरांच्या तुलनेत अतिशय कमी मुल्य आहे. इतर जिल्ह्यांतील व  तालुक्याती...

भोईराज मंडळाने घडवले साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन

शेवगाव प्रतिनिधी, दि.३० शेवगांवच्या मुख्या बाजारपेठेत भोईराज पंच मंडळाने तुळजापूरच्या देवीची प्रतिष्ठापना केली असून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ माहूरगडची रेणुकामाता, कोल्हापूरची जगदंबा माता, तुळजापूरची भवानी माता आणि वणी शप्तशृंगी माता यां सर्व देवीच्या दर्शनाचा देखावा उभारला आहे.      बाजारपेठेच्या मेनरोडवर भव्य सोनेरी प्रवेशद्वार उभारले असून  सर्वत्र आकर्षक विद्युत रोषणाई करुन त्यात किमती झुंबर लावले आहेत. भोईराज तरुण मंडळाला १२७ वर्षाची परंपरा आहे. माजी नगरसेवक दिगंबर काथवटे सामाजिक कार्यकर्ते ईश्वरसेठ गुणवंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्व. जगन्नाथ कांबळे, कैलास काटकर आणि स्व अरुण लांडगे यांच्या शुभाशीर्वादाने मंडळाचे अध्यक्ष रोहित काथवटे यांच्यासह  सुरेश हुशार, किरण भोकरे, दिलीप कांबळे, किशोर काथवटे , किरण काथवटे ,मनोज कांबळे, कमलेश लांडगे, अमोल घोलप ,संजय शिनगारे, बाळासाहेब काटकर आदि कार्यकर्ते  मंडळासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यात महिलाही  सहभागी असतात.         प्रसाद कांबळे, सिद्धार्थ शिनगारे, रोहन शिनगारे अभिषेक गवते, महेश गवते, आकाश भोकरे,अमोल शिनगारे, साई पटेल,राहुल शिनगारे, ...

तालुक्यात लम्पी सदृश आजाराने गायीचा मृत्यू

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३० : लुक्यातील भायगाव येथील रामनाथ आबाजी झेंडे यांच्या मालकीच्या गावरान गायीचा लम्पी सदृश्य आजाराने  उपचारादरम्यान  मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरातील शेतकरी पशुपालकात  घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात लम्पी सदृश्य आजाराला बळी पडल्याची ही पाहिली घटना आहे.     तालुक्यात गायप्रवर्गातील जनावरांची संख्या ७२ हजाराच्या दरम्यान असून तालुक्यात गुरुवार अखेर ६२ हजार ६९१ जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.  तालुक्यातील भायगाव येथे पहिल्या जनावराची मृत्यूची नोंद झाल्याने शुक्रवारी गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. चारुदत असलकर, दहीगाव येथील पशुधन विकास अधिकारी डॉ.महेंद्र लाड, भातकुडगाव येथील पशुधन पर्यवेक्षक डॉ.लक्ष्मन नाईक  व त्यांच्या सहका-यांनी भायगाव परिसरातील विविध गावांना भेटी दिल्या. गेल्या काही दिवसापासून उपचार सुरु असलेल्या व औषधोपचारानंतरही प्रतिसाद देत नसलेल्या जनावरांची माहिती घेवून गावागातील शेतकरी व पशुपालक यांचे प्रबोधन करून जनावरांवरील साथीच्या आजाराचा परिसरात प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी घ्यावयाच्या काळजी बाबत संबधिता...

शासनाने वाढीव दर देऊन दूध उत्पादकांना आधार देणाऱ्या सहकारी दूध संघांच्या पाठिशी उभे राहावे - राजेश परजणे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३० : अडचणीच्या काळात नफा – तोट्याचा विचार न करता शासनापेक्षा अधिकचा दर देऊन दूध उत्पादकांना आधार देणाऱ्या सहकारी दूध संघांच्या पाठिशी उभे राहून संरक्षण देण्याचे धोरण शासनाने स्वीकारावे अशी मागणी गोदावरी खोरे सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली. संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडण्यात आलेल्या या ठरावास सर्व सभासद व दूध उत्पादकांनी सहमती दर्शवली. गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या कार्यस्थळावर खेळीमेळीत पार पडली. यावेळी अध्यक्षपदावरुन राजेश परजणे पाटील यांनी संघाच्या कामकाजाविषयी व भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषीयीची माहिती दिली. प्रारंभी संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन अहवाल सालात निधन झालेल्या व्यक्तींना आदरांजली वाहण्यात आली. संघाचे कार्यकारी संचालक ...

साखळी उपोषणाची विरोधकांसह प्रशासनाला भरली धडकी - पराग संधान

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२९ : कोपरगाव नगरपालिकेने मालमत्ता कराच्या चुकीच्या सर्वेवरून आकारलेल्या अवास्तव घरपट्टीवरून शहरात भाजपा सेना रिपाई (आठवले गट) यांच्या वतीने सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद बुधवारी पालिका प्रशासनातही उमटले.मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी तडकाफडकी पाच लिपिकांना निलंबित केले. हा प्रकार म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी या कारवाईचा पराग संधान यांनी निषेध केला. आमच्या अवास्तव करवाढीच्या धडाक्याने विरोधकासह प्रशासनाला धडकी भरली असल्याची टीकाही पराग संधान यांनी केली. भाजपा सेना रिपाई (आठवले गट) यांचे पराग संधान यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखळी उपोषण सुरू आहे . मालमत्ताधारकांवर लादलेली अन्यायकारक घरपट्टी रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टी आकारणी करावी, मालमत्तांचे चुकीचे सर्वेक्षण करणाऱ्या आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीला नगर परिषदेने दिलेले ७५ लाख रुपये परत घ्यावेत, या कंपनीविरुद्ध नगर परिषदेने गुन्हा दाखल करावा, या कंपनीला दिलेले कंत्राट रद्द करून काळ्या यादीत टाकावे आदी प्रमुख मागण्या संधान यांनी केल्या आहेत. या आंदोलनाला शहरातील...

करवाढ संदर्भात आमदार काळेंनी उचलेलं पाऊल कायदेशीर – विधीज्ञ शंतनू धोर्डे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९: कोपरगाव नगरपरिषदेने कोपरगाव शहरातील नागरिकांवर लावलेली अवास्तव करवाढ हि बेकायदेशीर आहे. त्याबाबत कायदेशीर पद्धतीने त्यातून मार्ग निघणार असून आ. आशुतोष काळेंनी उचललेलं पाऊल कायदेशीर असून त्या माध्यमातून कोपरगावकरांना निश्चितपणे न्याय मिळेल असा विश्वास ज्येष्ठ विधीतज्ञ शंतनू धोर्डे यांनी व्यक्त केला आहे.  कोपरगाव नगरपरिषदेने खाजगी कंपनीकडून केलेल्या सर्व्हेतून केलेली केलेली करवाढ चुकीची त्याबरोबरच बेकायदेशीर आहे. त्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी बैठक घेवून नागरिकांचे म्हणणे ऐकून घेवून त्याबाबत कोपरगाव नगरपरिषदेने सविस्तर खुलासा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. नगरपरिषदेने खुलासा केल्यानंतर करण्यात आलेली करवाढ चुकीची व करवाढीच्या बजावण्यात आलेल्या नोटीसा देखील बेकायदेशीर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याचबरोबर करण्यात आलेली करवाढ करतांना मालमत्तेचा होणारा घसारा कुठेही धरण्यात आला नव्हता. अशा अनेक बेकायदेशीर बाबी आ. आशुतोष काळे यांच्या लक्षात येताच त्यांनी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून देताच नगरपरिषद प्रशासनाणे देखील चुका मान्य करून योग्य तो बद...

पालिकेचे कर विभागातील ५ कर्मचारी तडकाफडकी निलंबित

मुल्यांकन यादीची तपासणी न केल्याचा ठपका, मुख्याधिकारी यांची माहिती कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : शहरातील वाढीव घरपट्टी प्रकरणी ठेकेदाराने केलेल्या सर्व्हेक्षणाचे योग्य पद्धतीने तपासणी न केल्याचा ठपका ठेवत मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी कर विभागातील पाच कर्मचाऱ्याना निलंबित केले आहे. मुख्य लिपिक संजय तिरसे, रवींद्र वाल्हेकर, राजेंद्र शेलार, राजेंद्र इंगळे, रत्नप्रभा अमोलिक अशी आज निलंबित केलेल्या कर्मचार्यांची नावे आहेत. याबाबत मुख्याधिकारी गोसावी यांना विचारले असता ते म्हणाले कि, गेल्या दीड वर्षापासून शहरातील वाढीव हद्दीसह मालमत्ताधारकांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी आर.एस. कन्स्ट्रक्शन कंपनी (नागपूर) या ठेकेदाराने सर्व्हे करून कर निर्धारण यादी कर विभागाला सादर केली होती. मालमत्ता सर्व्हेक्षण करिता सादर केलेल्या फॉर्मची कर विभागातील संबंधित कर्मचाऱ्यानी त्याची तपासणी करावी आशा स्पष्ट सूचना१० मार्च २०२१ च्या पत्रान्वये कर अधिकारी यांनी दिल्या होत्या. तसेच ६ में २०२१ च्या आदेशानुसार प्रत्यक्ष दर्शी जागेवर जाऊन पाहणी करून ज्या मिळकती मध्ये त्रुटी आहेत त्याबाबतचा अहवाल सादर करणेबाबत कळविले ह...

साखळी उपोषणाला विविध संस्था, संघटनांकडून उत्स्फूर्त पाठिंबा

वाढीव घरपट्टी रद्द होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा उपोषणकर्त्यांचा निर्धार    कोपरगाव प्रतिनिधी, दि.२८ : कोपरगाव नगर परिषद प्रशासनाने सन २०२२-२३ साठी घरपट्टीमध्ये भरमसाठ वाढ केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ही अवास्तव घरपट्टी रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टी आकारणी करावी यासह इतर मागण्यांसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपाइं (आठवले गट) ने मंगळवार (२७ सप्टेंबर) पासून सुरू केलेल्या साखळी उपोषणाला नागरिकांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. विविध संस्था आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर दर्शवला. दरम्यान, आज दुसऱ्या दिवशी बुधवारीही हे उपोषण सुरूच होते. वाढीव घरपट्टी रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टी आकारणीचा निर्णय होईपर्यंत हे उपोषण चालूच ठेवण्याचा ठाम निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे. कोपरगाव नगर परिषद प्रशासनाने आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत शहरातील मालमत्ताधारकांचा सर्व्हे करून घेतला; परंतु आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीने चुकीचे सर्वेक्षण केलेले असताना त्याची दखल न घेता आणि या कंपनीने दिलेल्या सदोष अहवालाच्या आधारे सन २०२...

ऊस तोडणीसाठी काळानुरूप बदल स्विकारावे लागतील – आमदार काळे

  गोदावरी खोरे व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनीची वार्षिक सभा संपन्न    कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ :  मागील दोन ते तीन वर्षापासून समाधानकारक पर्जन्यमान होत असल्यामुळे कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यक्षेत्रात ऊस लागवडी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे ऊस आणण्यासाठी कार्यक्षेत्राबाहेर जावे लागणार नसले तरी ऊस तोडणी मजुरांची जाणवत असलेली टंचाई लक्षात घेता भविष्यात ऊस तोडणीसाठी काळानुरूप बदल स्विकारावे लागतील असे प्रतिपादन गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे. गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लि; गौतमनगर ची ५१ वी व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लिमिटेडची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कंपनीचे मार्गदर्शक संस्थेचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर शंकररावजी काळे व सौ. सुशीलामाई काळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेस प्रारंभ झाला. अध्यक्ष पदाची सूचना अशोकराव आहेर यांनी मांडल...

स्थानिक शेतकऱ्यांच्या ऊस गाळपास प्राधान्य द्यावे, वंचित आघाडीची मागणी

शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : परिसरातील साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामातील ऊस दर जाहीर करून कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांचा उस प्राधान्याने गळीपासाठी घेवून स्थानिक ऊस उत्पादक शेतक-यांना प्राध्यान्यक्रम देण्याच्या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने  राज्य उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेवगावच्या तहसीलदारांना देण्यात आले. तसेच मागणीच्या पाठपुराव्यासाठी  परिसरातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या शिष्टमंडळासह  ज्ञानेश्वर, वृद्धेश्वर, केदारेश्वर व गंगामाई साखर कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालकांना देखील याबाबतचे निवेदन देवून या हंगामात परिसरातील ऊस उत्पादक शेतक-यांना प्राधान्यक्रम देवून न्याय देण्याची मागणी केली.         निवेदनात  म्हंटले आहे की, मागील वर्षीच्या गळीत हंगामामध्ये शेवगाव पाथर्डी तालुक्यातील कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाल्याने ऊसाचे पीकही मोठ्या प्रमाणात घेण्यात आले. त्यामुळे कारखान्याच्या पूर्ण हंगामात गळीपाला पुरेल इतक्या प्रमाणात ऊस कार्यक्षेत्रात उपलब्ध असतानाही काही साखर कारखान्यांनी कार्यक्षेत्राबाहेरील ऊस गेटकेनने मोठ्या प्...

एफआरपी रक्कम कोणत्याही कपाती वीना दिवाळीपूर्वी मिळावी - दत्ता फुंदे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २९ : शेवगाव, नेवासा पाथर्डी तालुक्यातील साखर कारखान्यांनी त्यांना गेल्या वर्षीच्या २०२१-२२ च्या गळीत हंगामात ऊस देणाऱ्या ऊस उत्पादकांना दहा टक्काच्या पुढील साखर उताऱ्याची एफआरपी रक्कम कोणत्याही प्रकारची कपात न करता दिवाळी पूर्वी देण्याची मागणी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता  फुंदे यांनी केली आहे.      या संदर्भात त्यांनी परिसरातील साखर कारखान्यासह साखर संचालनालय, साखर उपायुक्त  अहमदनगर यांच्याकडे  निवेदने दिली आहेत. शासनाने मागील वर्षीच्या गळीत हंगामापासून एफआरपीच्या दहा टक्के रक्कम संबधित ऊस उत्पादकांचा ऊस तुटल्यानंतर १४ व्या दिवसाच्या आत संबधितांना अदा करण्याचा व त्यानंतर दहा टक्क्याच्या पुढील रक्कम संबधित कारखान्याच्या अंतिम साखर उतारा व उपपदार्थापासून मिळणाऱ्या लाभाची रक्कम जी काही होईल ती पुढील हंगामाच्या सुरुवातीला अदा करण्याचा दंडक जाहीर केला आहे.       आता यंदाचा गळीत हंगाम दि.१५ ऑक्टोंबरच्या दरम्यान दिवाळीच्या आसपास सुरु होणार असल्याने संबधित कारखान्यांनी संबंधित ऊस उत्पादक शेतक-यांना अंतिम साखर उताऱ्याची फरक रक्कम दिवाळी पूर्वी कोणत...

श्रीगणेशचा शुभम महाराष्ट्र सीईटीमध्ये राज्यात ११वा

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ :  शैक्षणिक वर्ष २०२२  मध्ये झालेल्या अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेमध्ये श्रीगणेशच्या विद्यार्थ्यानी यश संपादन केले आहे. या परीक्षेत औषधनिर्माण शास्त्र सीईटी मध्ये शुभम राजेंद्र येलमामे ९९.९७  गुण मिळवून  राज्याच्या  गुणवत्ता यादी मध्ये ११ वा  आला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे यांनी दिली.  महाराष्ट्र राज्य प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई तर्फे घेण्यात महाराष्ट्र सीईटी परिक्षा ३६ जिल्ह्यांमध्ये २२७ परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या बॅचेसमध्ये घेण्यात आल्या. या परिक्षेमध्ये संपुर्ण महाराष्ट्रातील जवळपास ४ लाख ६७ हजार १२ वी विज्ञानच्या विद्यार्थ्यांनी या परिक्षेला आपला सहभाग नोंदविला. या परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र व कृषी शिक्षण या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश दिला जातो.          शुभम बरोबरच सानिया मणियार ९९.७५ , श्रद्धा वाकचौरे ९९.२२, ऋषिकेश गावित ९९.००, प्रतीक्षा खालकर ९८.९६, अलिशा सपकाळ ९८.९२ , आदित्य जाधव ९८.४४, सुमित मेहेरखांब ९८.२० तर अ...

विविध कार्यकारी सहकारी संस्था ह्या ग्रामिण भागाचा अर्थीक कणा - विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८:   विविध कार्यकारी संस्थाची विकासाला मदत आजपर्यत झाली आहे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असल्याने सहकारला मदत होत आहे. केंद्राने सहकार मंत्रालय स्थापन करुन सहकाराला बळकटी दिली आहे. देशभरात लाखो सहकारी सोसायट्या आहेत या सर्व सोसायट्यांचे संगणीकरण करुन एकाच प्लाटफॅार्मवर आणण्याचे काम लवकरच होण्याचे चिन्हे आहेत. सोसायटी सक्षम झाली तरच पुढील उपाययोजना करता येतात. म्हणुन सर्वांनी सोसायटीचे हीत जोपासले पाहीजे. राजकारण हे निवडणुकीपुरते असले पाहीजे.भविष्यात सहकारी सोसायट्यांना फार्मर प्रोड्युसर कंपन्याचा दर्जा देण्याचा विचार केंद्र सरकारचा आहे. गावातील पैसा गावातच राहीला तर त्याचा फायदा गावाला होतो.सहकारी संस्थानी शास्वत उत्पादनाचे स्त्रोत शोधले पाहीजे. विविध कार्यकारी सहकारी संस्था ह्या ग्रामिण भागाचा अर्थीक कणा आहेत.असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी केले अंजनापुर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षीक सर्वसाधारण सभेत कोल्हे बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब गव्हाणे होते. यावेळी बबन महा...

आमदार काळेंच्या खंबीर भूमिकेमुळे चुकीची वाढीव कर कमी होण्याबाबत मोठा दिलासा – सुधीर डागा

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : कोपरगाव नगरपरिषदेने चुकीच्या सर्वेच्या आधारावर शहरातील नागरिकांना व व्यावसायिकांना बजावलेल्या वाढीव कराच्या पावत्यांचे वितरण होत असतानाच आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील नागरिक व व्यावसायिकांची संयुक्त बैठक घेऊन झालेल्या चर्चेतून नगरपरिषद प्रशासनाला त्याबाबत खुलासा करण्याचे सांगितले होते. त्यावेळी झालेल्या चर्चेतून खाजगी कंपनीकडून करण्यात आलेल्या सर्वेमध्ये चुका झाल्याचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी मान्य करून वाढीव कर कमी होणार असल्याचे नंतरच्या आढावा बैठकीत सांगितले आहे. वाढीव कर हे मोठे आर्थिक संकट होते. कोपरगाव शहरवासियांवर आलेले हे आर्थिक संकट आ.आशुतोष काळे यांच्यामुळे टळले असून नागरिक व छोट्या मोठ्या व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे कोपरगाव व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी सांगितले आहे. त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, शहरातील नागरिकांच्या मालमत्तेवर वाढीव कर लागू करून कोपरगाव नगरपरिषदेने एक प्रकारचा अन्याय केला होता. त्याची दखल घेऊन आ.आशुतोष काळे यांनी तातडीने शहरातील नागरिक व व्यावसायिक संघटनांशी सविस्तरपणे चर्चा करण...

विकासाचा हिशोब मागण्याचा अधिकार जनतेला, विवेकशुन्यांना नाही – सुनील गंगुले

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : अडीच वर्षात आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघाच्या विकासासाठी ११०० कोटीच्या वर निधी आणला आहे. त्या निधीतून मतदार संघात झालेली विकास कामे जनतेला दिसत आहे. मात्र विकासाची दृष्टी नसलेल्या विवेक शुन्यांना ती विकासकामे दिसत नाही हे मोठे दुर्दैव असून ज्यांचे कोणतेही कर्तुत्व नाही त्या विवेकशुन्यांना विकासाचा हिशोब मागण्याचा अधिकार नाही असा टोला कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी विवेक कोल्हे यांचे नाव न घेता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात लगावला आहे. प्रसिद्धी पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, मागील पाच वर्षात गल्लीपासून दिल्ली पर्यंत त्यांच्या पक्षाचे सरकार असतांना देखील त्यांना पाच वर्षात विकास करता आला नाही.जनतेला गाजर दाखवयाचे आणि निवडणुका जिंकायच्या अशी वृत्ती असलेल्यांचे मनसुबे २०१९ च्या निवडणुकीत उधळले गेले. मात्र आ. आशुतोष काळे यांनी निवडणुकीपूर्वी शहरातील जनतेला दिला शब्द पूर्ण करून निवडून येताच ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटीचा निधी आणून प्रत्यक्षात ५ नंबर साठवण तलावाचे काम देखील सुरु केल्यामुळे विरोधकांचे शहरातील...

सहकारमहर्षी कोल्हे साखर कारखाना उस भावात मागे राहणार नाही - विवेक कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २७ : सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांनी संघर्ष, संकटे आव्हाने समर्थपणे पेलुन सहकारी साखर कारखानदारी टिकवून ठेवली इतर कारखान्यांच्या तुलनेत संजीवनीने आजपर्यंत उसाला कधीही कमी भाव दिलेला नाही यावर्षीही सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना भावात मागे राहणार नाही असे प्रतिपादन अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांनी केले. केंद्र शासनाने एफआरपीची रक्कम ज्याप्रमाणे वाढविली त्याप्रमाणात साखर विकीच्या दरातही वाढ करावी तरच सहकारी साखर कारखानदारी टिकेल असेही ते म्हणाले.            सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची साठावी वार्षीक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर सोमवारी पार पडली त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. प्रारंभी अहवाल सालात दिवंगत झालेल्या सभासद शेतक-यांना श्रध्दांजली वाहण्यांत आली. शरद पोपटराव शिंदे आडसाली (शहा सिन्नर), बाळासाहेब माधवराव संधान पूर्व हंगामी (दहिवडी सिन्नर), पुंडलिक आनंदा गिते सुरू (संवत्सर), व एकनाथ कचरू गवांदे खोडवा (लक्ष्मणपुर सिन्नर), या सर्वाधिक उस उत्पादन घेणा-या शेतक-यांचा सत्कार करण्...

घरपट्टीवरून सर्व्हेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी

वाढीव घरपट्टीविरोधात भाजप, शिवसेना, आरपीआयचे साखळी उपोषण सुरु कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : जो पर्यंत शहरातील नागरिकांची नवीन घरपट्टी रद्द करून जुन्या घरपट्टी प्रमाणे आकारणी होत नाही तो पर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहणार आहे. पालिकेचे मुख्याधिकारी व सर्व्हेक्षण करणारे अधिकारी यांनी कामकाजात त्रुटी झाल्याची कबुली दिल्याने भाजप नेते पराग संधान, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई हे उपस्थित अधिकार्यावर चांगलेच भडकले. चुकीचे सर्व्हेक्षण झालेले असेल तर संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आम्ही कारवाई करू असा सज्जड इशारा भाजप, शिवसेना, आरपीआयच्या वतीने देण्यात आला. कोपरगाव शहरात सन २०२२ -२३ या आर्थिक वर्षाकरिता पालिका प्रशासनाने चारशे ते पाचशे टक्के वाढीव घरपट्टी आकारल्यामुळे नागरीकामध्ये असंतोष निर्माण झाला आहे त्याचा अनुषंगाने मंगळवारी सकाळी अकरा वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर भाजप, शिवसेना, आरपीआयच्या वतीने साखळी उपोषण सुरु करण्यात आले. या उपोषणस्थळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, सर्व्हेक्षण करणाऱ्या कंपनीचे अधिकारी आले असता भाजप नेते पराग संधान यांनी शहरातील मालमत्त...

दीनदयाळ उपाध्याय जयंती व मन की बातचे आयोजन

शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : शेवगाव मंडळ भाजपाच्या वतीने आज आमदार मोनिकाताई राजळे यांच्या संपर्क कार्यालयात भारतीय जनसंघाचे नेते पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.         यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे , शेवगाव तालुका अध्यक्ष ताराचंद लोढे , संघटन सरचिटणीस भीमराज सागडे, शहराध्यक्ष  रवींद्र सुरवसे, भाजपा कार्यालय प्रमुख कैलास सोनवणे, नगरसेवक सागर फडके, गणेश कोरडे, दिगंबर काथवटे, प्रा. अरुण धस, केशव आंधळे, संजय खेडकर,  मच्छिंद्र बर्वे, अमोल माने, संतोष कंगणकर, विक्रम बारवकर,  रामकिसन महाराज तापडिया, अजय डमाळ, काकासाहेब हरदास आदीनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे  प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.           पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमांमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जीवनगौरव देशासमोर ठेवला तसेच इंडियन शाईन लँग्वेज, योगाभ्यासचा उपयोग, प्लास्टिक निर्मूलन व स्वच्छते बाबत मार्गदर्शन केले. पंतप्रधानांनी देशवासीयांना दसरा व दिवाळीच्या शुभेच्छा देत स्थानिक वस्तू वापरा, लोकलसाठी व्होकल बना, लोकल वस...

शेतक-यांच्या बांधापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवावे - बिपीनदादा कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २५ : शेती आणि शेतक-यांचे प्रति हेक्टरी उत्पादन वाढविण्यांसाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाने शेतक-यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवावे असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले. येथील शेतकरी सहकारी संघाची ८६ वी वार्षीक सर्वसाधारण सभा रविवारी संपन्न झाली त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.              प्रारंभी अध्यक्ष संभाजीराव गावंड यांनी संघाचे मार्गदर्शक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्य कर्तृत्वाचा आढावा घेवुन त्यांच्यासह अहवाल सालात दिवंगत झालेल्या सभासद व महनीय व्यक्तींना श्रध्दांजली वाहिली. विषय पत्रिकेवरील सर्व विषय टाळयांच्या गजरात मंजुर करण्यांत आले. मागील सभेचे इतिवृत्त व्यवस्थापक हरिभाउ गोरे यांनी वाचले ते सभासदांनी कायम केले.            सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या अध्यक्षपदी युवानेते व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांची बिनविरोध निवड झाल्याबददल त्यांचा संघाच्यावतीने सत्कार करण्यांत आला.    कोल्हे याप्रसंगी बोलतांना म...

समता चॅरिटेबल ट्रस्टचा मोफत घरपोहोच भोजन डबा योजनेचा शुभारंभ

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : निराधारांना अन्नदान करणे हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. व्यक्तीला जर कोणत्या गोष्टीत समाधान असेल तर ते अन्नदानात आहे त्यामुळे समता चॅरिटेबल ट्रस्टचा हा उपक्रम समाजोपयोगीआहे. समाजात बोलणे खूप सोपे आहे,पण कर्तृत्व करणारे माणसे समाजात खूप कमी असतात.खरा परमात्मा मंदिरात नाही, तर तो तुमच्या आमच्या हृदयात आहे. याची जाणीव आज समता परिवाराने करून दिली आहे. धन खूप असते पण त्या बरोबरच हृदय पण असावे लागते.जेव्हा सूर्य नाही होता येत तेव्हा दिवा होऊन कर्तृत्व सिद्ध करण्याची कुवत काका कोयटे यांच्याकडे आहे.जो पर्यंत कर्तृत्व महान नसेल, तो पर्यंत जीवन महान होऊ शकणार नाही.याची प्रचिती आज समता चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने  वतीने मोफत घरपोहोच भोजन डबे वाटप योजनेच्या शुभारंभ करताना आली.असे मत कोकमठाण येथील आत्मा मालिक ज्ञानपीठाचे ज्येष्ठ संत विवेकानंद महाराज यांनी व्यक्त केले.     समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने समता नागरी सहकारी पतसंस्थेचे जेष्ठ संचालक गुलाबचंद खेमचंद अग्रवाल यांच्या ७५ व्या आणि कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा आणि समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुहासिनी ओमप...

प्रियदर्शनी महिला मंडळाच्या वतीने नवरात्रौत्सव निमित्त विविध कायर्क्रमांचे आयोजन – पुष्पाताई काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने मंडळाच्या सालाबाद प्रमाणे याहीवर्षी सोमवार (दि.२६) ते बुधवार (दि.५ ऑक्टोबर) पर्यंत “जागर स्त्री शक्तीचा” नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी दिली आहे.                 प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्र उत्सव साजरा केला जातो. परंतु मागील दोन वर्ष संपूर्ण विश्वावर जीवघेणी कोरोना महामारी असल्यामुळे सर्व सण-उत्सव साजरे करण्यावर सर्वसामान्य नागरिकांना मर्यादा होत्या. त्यामुळे मागील दोन वर्ष सर्व सण अतिशय साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले. त्यामूळे  मागील दोन वर्ष हा नवरात्र उत्सव ऑनलाईन पद्धतीने (डिजिटल नवरात्र उत्सव) साजरा करण्यात आला होता. मात्र मागील काही महिन्यांपासून कोरोना महामारी बऱ्याच अंशी आटोक्यात आली आहे. त्यामुळे सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले आहे. त्यामुळे उद्या (दि.२६) पासून सुरु होणारा नवरात्र उत्सव देखील साजरा केला जाणार असल्याचे सौ. पुष्पाताई काळे यांनी सांगितले आहे.                 उद्यापासून सुरु होण...

अमरापूर श्री रेणुका माता देवस्थानात नवरात्रोत्सवास प्रारंभ

शेवगाव प्रतिनिधी, दि. २६ : राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र अमरापूरच्या श्री रेणुका माता देवस्थानात आज विधिवत घटस्थापना करुन शारदीय नवरात्रोत्सवास मोठया उत्साहात प्रारंभ करण्यात आला.        गेल्या दोन वर्षात कोविडमुळे असलेले निर्बंध उठल्यामुळे  नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी भाविकांच्या आनंदाला उधाण आले आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा उच्चांक होणार असल्याचे संकेत आहेत.       येथील घटस्थापनेसाठी भाविकांनी श्री क्षेत्र माहूर गडहून पायी ज्योत आणली. काल रविवारी तीचे तालुक्यात आगमन होतांना ठिकठिकाणी स्वागत झाले. शेवगावात सहाय्यक पोलिस निरीक्षक  रविंद्र बागूल, श्रीमंत घुले आदि मान्यवरांनी क्रांती चौकातील पावन गणपती मंदिराच्या प्रांगणात ज्योतीचे स्वागत केले. तर अमरापूरच्या देवस्थानात श्री रेणुका भक्तानुरागी डॉ. प्रशांत नाना भालेराव यांनी सर्वांना महावस्त्रे देऊन स्वागत केले. देवस्थानचे पुजारी तुषार देवा यांनी पायी ज्योत आणणाऱ्या भाविकांची पाद्य पूजा केली.       वेदशास्त्र संपन्न सच्चिदानंद देवा व त्यांच्या ब्रह्म वृंदानी  आज सकाळी आई साहेबांना ...

भावीनिमगाव येथील जगदंबा मातेचा शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ

शेवगाव प्रतिनिधी, दि. २६ :  तालुक्यातील भावीनिमगाव येथील जगदंबा मातेच्या मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला असून गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठलनाथ महाराज, वैकुंठवासी कृष्णदेव महाराज काळे यांच्या कृपाशीर्वादाने बाल संन्याशी ह.भ.प. अशोक महाराज बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे.       या नवरात्र उत्सवकाळत अखंड हरिनाम सप्ताह, विष्णुसहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ व विनोदाचार्य उद्धव महाराज सबलस, प्रकाशगिरी महाराज देवगड, रामगिरी महाराज येळी, आदिनाथ महाराज लाड देवाची आळंदी, लक्ष्मण महाराज भावर कळसपिंपरी, पारस महाराज जैन जळगाव, विष्णू महाराज मिरझे देवाची आळंदी, दिनकर महाराज अंचवले यांचे सकाळी काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर भाविक मिलिंद नाना कुलकर्णी यांनी महाप्रसादाची व्यवस्था केली  आहे. या देवस्थानात खडी नवरात्र धरण्याची प्रथा आहे. 

काका कोयटे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यामुळे रक्तदात्याने केलेले रक्तदान हे गरजवंतासाठी अमृता सारखे असते. या सामाजिक दायित्वामुळे ‘रक्तदान करूया, एखाद्याला नवीन आयुष्य देऊया’ या सामाजिक उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करून गरजवंताला रक्ताची कमतरता पडू नये. कमतरता पडल्यास ती भरून काढण्याचा एक सामाजिक प्रयत्न या रक्तदान शिबिराच्या अनुषंगाने आम्ही केला. प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तदाते एक सामाजिक दायित्व पार पाडत असतात. मागील वर्षी देखील समता परिवाराचे संस्थापक अध्यक्ष काका कोयटे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे विविध संघटना मिळून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन आम्ही करत असतो. त्याचप्रमाणे या ही वर्षी रक्तदात्यांनी समता परिवार आणि इतर सामाजिक संस्थांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रत्येक वर्षी रक्तदान करणाऱ्यांची संख्या वाढत असून या ही वर्षी ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. असे प्रत...

कोपरगाव नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांची घरपट्टी करवाढीबाबत संशयास्पद भूमिका - सोनवणे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : कोपरगाव नगर परिषद प्रशासनाने घरपट्टी करामध्ये अवास्तव वाढ केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. घरपट्टी करवाढीबाबत नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी केलेल्या वेगवेगळ्या विधानांमुळे त्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कुणाला तरी श्रेय मिळवून देण्यासाठी प्रथम त्यांनी वाढीव घरपट्टीच्या नोटिसा मालमत्ताधारकांना पाठवून संपूर्ण कोपरगाव शहर वेठीस धरले आणि आता कुणाच्या तरी सांगण्यावरून ही करवाढ कमी करू, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आधी वाढीव घरपट्टीच्या नोटिसा देणे आणि नंतर घरपट्टी कमी करू, असे सांगणे हा फार्स कोणाच्या सांगण्यावरून केला याबाबत नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी त्वरित जाहीर खुलासा करावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी केली आहे.          आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीने शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करताना केलेल्या तांत्रिक चुकीमुळे घरपट्टीची अवास्तव आकारणी झाली असल्याचे मान्य करून मालमत्तांचे फेरसर्वेक्षण करणार असल्याचे म्हटले आहे; पण मग चुकीच्या सर्वेक्षणाला या कंपन...

आखेगाव येथे दोघा शेतमजुरांचा संशयास्पद मृत्यू

शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ : तालुक्यातील आखेगाव येथे कपाशीवर औषध  फवारणी करणाऱ्या दोघा शेतमजुरांचा काल शुक्रवारी सायंकाळी संशयास्पद मृत्यू झाला आहे. वैभव आबासाहेब बिडकर (वय २८,रा. आखेगाव तालुका शेवगाव )व कृष्णा बबन काकडे (वय ३० रा.सोमठाणे तालुका पाथर्डी )अशी मृतांची  नावे असून त्यांच्यासोबत असलेले  चार जण गायब झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी घातपातीचा संशय व्यक्त केला आहे.          शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास  औषध फवारणी नंतर ते सोमठाणा शिवारातील शेतात बसले होते.  घरी येण्यास उशीर झाल्याने घरच्यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता  त्यावर अन्य व्यक्तींकडून  दोघे तिथे पडल्याची माहिती समजल्यावर  नातेवाईक घटनास्थळी गेले. त्यांनी दोघांना शेवगाव रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने कृष्णा काकडे यास शेवगाव येथे तर वैभव बिडकर यास नगर येथे रुग्णालयात पाठविले होते. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. 

आरोपींना चोवीस तासात अटक करून अपहरण केलेल्या युवकाची सुटका

शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ : युवकाच्या अपहरणाच्या दाखल केलेल्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी पोलीस पथकाद्वारे तातडीने तपास केल्यामुळे तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या २४ तासात अपहरीत युवकाची सुटका करुन  गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात शेवगाव पोलिसांनी यश मिळविले आहे.       या संदर्भात पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की गुरुवारी दिनांक २२ रोजी रात्री पावणेदहा वाजता लक्ष्मण भीमराव बोरुडे  रा. शेकटे यांनी त्यांचे चुलते सोनाजी छबुराव बोरुडे ( वय ३० ) यांची बालमटाकळी शिवारातून  चार-पाच जणांनी  बोलेरो जीप  गाडीतून जबरदस्तीने अपहरण  केल्याची शेवगाव पोलिसात तक्रार दाखल केली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी सपोनी आशिष शेळके यांचे समवेत पथक तयार करून त्यांना  तपास कामी रवाना केले . तपास पथकाने प्रथम गेवराई येथे शोध घेतला. शुक्रवारी दि. २३ रोजी सकाळी साडेसातचे सुमारास आरोपींनी अपहरित तरुण सोनाजी बोरुडे यांचे चुलत भावाचे मोबाईलवर सोनाजी बोरुडे यास जबरदस्तीने चार-पाच लाख रुपये तयार ठेवा असा निरोप द्यायला भाग पाडले. तेव्हा गुन्ह्याच...

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फार्मसी कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील राष्ट्संत जनार्दन स्वामी फार्मसी कॉलेजमध्ये फार्मसिस्ट डे च्या निमित्ताने राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष चांगदेव कातकडे, श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटलचे  व्यावस्थापकीय संचालक प्रसाद कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात कोपरगाव शहरातून फार्मसिस्ट डे निमित्ताने आरोग्य जनजागृती रॅली काढण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी घोषणा देत कोपरगावात फिरून आरोग्य चांगले कसे ठेवावे हे समजावून सांगितले. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन व राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फार्मसी कॉलेजच्या वतीने रक्तदान शिबीर ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी जपत आपण समाजाचे देणे लागतो. या उद्देशाने फार्मसिस्ट वीक मध्ये फार्मसिस्ट डे च्या निमित्ताने एक हात मदतीचा, डोनेट ब्लड अँड सेव्ह लाईफ,’ म्हणून रक्तदान शिबीर आयोजित केले.कोपरगाव येथील संजीवनी ब्लड बँकेच्या मदतीने हे रक्तदान शिबीर पार पडले. यात 41 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात त्यामध्ये सर्व फार्मसी, नर्सिंग, होमिओपॅथिक, फिजिओथेरपी आणि आयुर्वेदिक म...

कोल्हे सहकारी कामगार पतपेढीला ४६ लाख ७२ हजाराचा नफा

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २४ :  तालुक्यातील शिंगणापुर येथील संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रेरणेतुन व बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील तसेच जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कामगार पतपेढीला ४६ लाख ७२ हजार रूपयांचा नफा झाल्याची माहिती उपाध्यक्ष दत्तात्रय दिनकर पवार यांनी दिली. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कामगार पतपेढीची ५८ वी वार्षीक सर्वसाधारण सभा संजीवनी कार्यस्थळावर शुक्रवारी पार पडली त्याप्रसंगी ते बोलत होते.           प्रारंभी इयत्ता दहावी व बारावी परिक्षेत ७० टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळविलेल्या ३५ सभासदांच्या गुणवंत पाल्याचा रोख स्वरूपात बक्षिस देवुन उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला. अहवाल सालात दिवंगत झालेल्या सभासद मान्यवरांसह संस्थेचे प्रमुख आधारस्तंभ माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्य कर्तृत्वाचा आढावा घेवुन त्यांना श्रध्दांजली वाहण्यांत आल...

तोटा झाला तरी चालेल, मात्र शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर मिळाला पाहिजे - आ.आशुतोष काळे

तिसरा हफ्ता प्रति मे.टन ५० रु. दर देऊन २६५० रुपये दर जाहीर कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ :  कारखान्याला तोटा झाला तरी चालेल मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर मिळालाच पाहिजे हि कर्मवीर शंकरराव काळे साहेबांची विचारसरणी होती. ती विचारसरणी डोळ्यासमोर ठेवून कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याने नेहमीच ऊसाला जिल्ह्यात एफआरपीपेक्षा जास्त दर दिलेला आहे. हि परंपरा कायम ठेवून तिसरा हफ्ता प्रती मे.टन ५० रु. देऊन (एकूण दर २६५०) व २०१०-११ मध्ये कपात केलेली पूर्व हंगामी प्रती. मे.टन ५० रुपये ठेव देखील देवून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार असल्याचे ६९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आ.आशुतोष काळे यांनी सांगितले व केंद्र शासनाने आयकराचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावून सहकारी साखर कारखानदारी वाचवावी अशी मागणी केली आहे. सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक, संचालक, माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत संपन्...