श्री साईगाव पालखीचे आ.आशुतोष काळेंच्या हस्ते विधिवत पूजन
कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहात श्रीराम नवमी उत्सव साजरा करून दरवर्षी प्रमाणे श्री साईगाव पालखी व मुंबादेवी तरुण मंडळ यांच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त कोपरगाव शहरातून शिर्डीला जाणाऱ्या श्री साईगाव पालखीची विधिवत पूजा आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी आ. आशुतोष काळे हे देखील श्री साईगाव पालखी सोहळ्यात सहभागी झाले यावेळी त्यांनी श्री साई पालखीतील सहभागी हजारो साई भक्तांना श्रीरामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. कोपरगाव शहरासह कोपरगाव तालुक्यात श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी अनेक ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव साजरा करून धार्मिक कार्यक्रमात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा असंख्य भक्तांनी लाभ घेतला. श्रीराम नवमी निमित्त दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी कोपरगाव शहरातून शिर्डी येथे श्री साईगाव पालखी काढण्यात आली. या पालखी सोहळ्यात आ.आशुतोष काळे यांनी सहभाग घेवून भक्तांचा उत्साह वाढविला.यावेळी मोठ्या संख्येने साई भक्त श्री साईगाव पालखी सोहळ्यात सहभागी झाले यावेळी श्रीराम व श्री साईंच्या गजरात श्री साईगाव प...