महाराष्ट्र दिनापासून अर्बन हेल्थ सेंटर नागरिकांच्या सेवेत – आमदार काळे
कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान व महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव शहरासाठी महाविकास आघाडी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव शहरासाठी मागील वर्षी तीन अर्बन हेल्थ सेंटर मंजूर झालेले आहेत. उद्या (सोमवार दि.०१) पासूनहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व दोन शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र अर्थात अर्बन हेल्थ सेंटर नागरिकांच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. दोन वर्ष कोरोना महामारीमुळे संपूर्ण विश्वाचे अस्तित्व धोक्यात आले होते. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत आपल्याला कायमस्वरूपी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे कोरोना महामारीने दाखवून दिले आहे. याचा धडा घेवून नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी आ. आशुतोष काळे यांनी महाविकास आघाडी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यातून ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होवून ग्रामीण रुग्णालयाला १०० बेडचा उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. कोपरगावकरांना अधिकच्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आ.आशुतोष काळे यांनी महाविकास आघाडी सरकारकडून मागील वर्ष...