Posts

Showing posts from October, 2022

देशाच्या दरडोई उत्पन्नात किराणा व्यापारी महत्वाचा घटक - तनसुख झांबड

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३१ : किराणा व्यापारी त्यांच्या व्यवसायात सकारात्मक दृष्टीकोन, व्यवहारात पारदर्शकता आणि प्रगतीसह भारतीय अर्थव्यवस्थेला गती व दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहे. किराणा व्यापारी हा शहराच्या नावलौकिकाबरोबरच स्वतःच्या व्यवसायाची देखील ओळख करून देत असतो. स्वतःची ओळख करून देण्याची सकारात्मक मानसिकता किराणा व्यापाऱ्यांकडे आहे. आजचा युवा किराणा व्यापारी कोपरगाव शहराची कॅलिफोर्निया अशी असलेली ओळख पुन्हा मिळवून देतील. आपल्या जिद्द व कल्पनाशक्तीने मॉल संस्कृती कडून सकारात्मक गोष्टी स्वीकारून, डिजिटल तंत्रज्ञानाद्वारा बदलत्या काळानुसार व्यवसायातही बदल करावेत. असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे व्हा.चेअरमन तनसुख झांबड यांनी केले. समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व.यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनच्यावतीने युवा किराणा व्यापारी प्रोत्साहन सोहळा आणि दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी तनसुख झांबड बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राम बंधू मसालेचे चेअरमन हेमंत राठी, कार्यक्रमाचे अध्यक्ष किराणा मर्चंट असोसिएशनचे संस्थ...

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचा बुधवारी गळीत हंगाम प्रारंभ

  कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३१ : सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२२/२३ च्या ६८ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ बुधवार (दि.०२) रोजी दुपारी ०३.०० वाजता कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक, जेष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे व त्याच्या सुविद्य पत्नी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांचे अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे यांनी दिली आहे.             कारखाना विस्तारीकरणाचे पहिल्या टप्प्यातील काम प्रगतीपथावर आहे. पैकी नवीन बॉयलरचे काम पूर्ण झाले असून २०२२-२३ गळीत हंगाम हा नवीन मिल व नवीन ११० मे.टन बॉयलरवरच घेतला जाणार आहे. कारखान्याच्या गाळप हंगाम २०२२/२३ च्या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्यावर व उद्योग समुहावर प्रेम करणारे हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रभारी कार्य...

शिर्डी - पंढरपुर रेल्वे तातडीने सुरू करावी - वारक-यांची मागणी

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३१ : शिर्डी आणि पंढरपुर या दोन तीर्थक्षेत्रांना जोडणारी रेल्वेगाडी अचानकपणे बंद झाल्याने वारकरी भक्तांसह प्रवाशांनी ही रेल्वेगाडी तातडीने सुरू करावी या मागणीचे निवेदन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांना दिले असुन त्यांनीही रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र पाठवुन मागणी केली आहे.   बाजीराव शिंदे, रामकृष्ण गुरव, राजेंद्र वाबळे, ह. भ. प. दशरथ उर्किडे, ह. भ. प. गणपत महाराज लोहाटे, ह. भ. प. दत्तात्रय महाराज जोर्वेकर, ह. भ.प. धोंडीराम महाराज टेंगळे यांच्यासह अन्य वारकरी बांधव व प्रवाशांनी याबाबत निवेदन दिले असुन तमाम महाराष्ट्रवासियांचे आराध्य दैवत असलेले विठोबा रूक्मीणीचे दर्शन यानिमीत्ताने होत होते. आंतरराष्ट्रीय देवस्थान साईबाबांची शिर्डी आणि पंढरपुर ही दोन तीर्थस्थाने रेल्वेने जोडली होती मात्र दररोज धावणारी सदरची रेल्वेसेवा बंद असल्याने वारकरी बांधवासह प्रवाशांची मोठया प्रमाणांत गैरसोय होत आहे. ही गैरसोय दुर करावी व पुन्हा शिर्डी ते पंढरपुर रेल्वेगाडी सुरू करून प्रशासनाने वारक-यासह सर्व प्रवाशांना दिलासा द्यावा असेही निवेदनकर्त्यांन...

केंद्र शासनाने साखर विक्रीला ३६०० रुपये हमीभाव द्यावा - विवेक कोल्हे

Image
सहकारमहर्षी कोल्हे साखर कारखान्याचा ६० वा गळीत हंगाम शुभारंभ संपन्न कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३० :  पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी व त्यांच्या सहका-यांनी साखर उद्योगाला आर्थीक स्थैर्यता प्राप्त करण्यांसाठी साखर विक्रीचा हमीभाव ३ हजार १०० रूपयावरून ३ हजार ६०० रुपये करावा व देशात याही वर्षी विक्रमी उसाचे गाळप होणार असल्याने उच्चांकी साखर उत्पादनाला ओजीएल खाली साखर निर्यातीची तात्काळ परवानगी द्यावी त्याचा सर्वाधिक फायदा शेतक-यांना होईल अशी मागणी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केली.            येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या साठाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ बिपीनदादा कोल्हे, खासदार सदाशिवराव लोखंडे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे, कारखान्यांचे अध्यक्ष, युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक रमेशराव आभाळे सौ. निलमताई रमेशराव आभाळे या उभयतांच्या शुभहस्ते झाला त्याप्रसंगी ते...

युवकांनी शरीर सुदृढ, निरोगी बनवावे – आमदार काळे

Image
कोपरगाव  प्रतिनिधी, दि. ३१ : युवक हि देशाची संपत्ती असून युवकांचे आरोग्य निरोगी व शरीर सुदृढ राहावे यासाठी कोपरगाव मतदार संघातील युवकांच्या मागणीवरून अनेक गावात जिम साहित्य दिले असून या जिम साहित्याचा फायदा घेवून युवा वर्गाने शरीर सुदृढ व निरोगी बनवावे असा मौलिक सल्ला आ. आशुतोष काळे यांनी दिला आहे. पैलवानांचे माहेरघर असलेल्या कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर गावातील युवकांच्या मागणीवरून आ. आशुतोष काळे यांनी बंदिस्त जिम साहित्य दिले. या जिमच्या साहित्याचे लोकार्पण नुकतेच त्यांच्या शुभहस्ते पार पडले यावेळी तरुणाईशी संवाद साधतांना ते बोलत होते. काळे म्हणाले की, आजच्या धावपळीच्या जीवनात दिवसाचे २४ तास सुद्धा कमी पडत असून प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन असल्यामुळे तरुणाईचे शरीराकडे थोडेसे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विविध नोकरीच्या भरतीवेळी शारीरिक तंदुरुस्तीच्या नियमात न बसल्यामुळे नोकरीच्या संधीला मुकावे लागते. त्यामुळे युवा वर्गाने जिमच्या साहित्याचा पुरेपूर फायदा घेवून आपली शरीर संपत्ती कमवावी जेणेकरून करिअरच्या संधी हातातून जाणार नाही. युवा वर्गाच्या मागणी वरून जिम साहित्य दिले असून युवका...

आदिवासी मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात?

आदिवासी विभागाकडून शैक्षणिक संस्थांची आर्थिक कोंडी राज्यातील १४८ नामांकित शाळा प्रकल्पाच्या शाळामध्ये ४९ हजार विद्यार्थी इंग्रजी माध्यमांचे शिक्षण घेत आहे. आता ४९ हजार मुलांचे शिक्षण आदिवाशी विभाग अधांतरी ठेवणार काय याकडे लक्ष लागले आहे. कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३०: आदिवासी बांधवांची भावी पिढी दर्जेदार शिक्षणापासुन वंचित राहणार नाही याची दक्षता घेवून राज्य सरकारने आदिवाशी बांधवांच्या मुलांना केवळ मराठी माध्यमातुनच नव्हे तर बदलत्या जगाचा विचार करुन इंग्रजी माध्यमातून उच्च शिक्षण देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यस सुरुवात केली माञ लालफितीत आडकलेल्या निर्णयामुळे आदिवासी मुलांना दर्जेदार इंग्रजी माध्यमांचे शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थांना संबधीत आदिवासी विभागाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे शुल्क न दिल्यामुळे राज्यातील शेकडो शिक्षण संस्था आर्थीक आडचणीत सापडल्या आहेत. आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी व इतर संबंधीत अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करुनही शिक्षण संस्था चालकांना शुल्क न दिल्याने अखेर राज्यातील शेकडो संस्था चालक कर्जबाजारी झाले आहेत. आदिवासी विभागाने येत्या काही दिवसात शिक्षण शु...

माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, ऋषीकेश ढाकणे करोनायोद्धा पुरस्काराने सन्मानित

शेवगIव प्रतिनिधी, दि. २९ : येथील शाहू, फुले, आंबेडकर साठे, कलाम सामाजिक विचारमंचच्या वतीने माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे व संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे साखर कारखान्याचे तज्ञ संचालक ऋषीकेश ढाकणे यांना करोनायोद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.       यावेळी संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. प्रकाश घनवट ,जिल्हा परिषद माजी सदस्य प्रभावती ढाकणे राष्ट्रवादीचे पाथर्डी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे , नगरसेवक बंडू बोरुडे, खरेदी विक्री संख्याचे संचालक विकास घोरतळे,माजी सरपंच रामजी अंधारे, भाऊराव भोंगळे, भगवान मिसाळ, शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचाचे अध्यक्ष अशोक शिंदे, वसीम  मुजावर,  पोषाण्णा कडमिंचे, बाबा बेलापूरकर, राहुल कांबळे,दत्तू मिसाळ यांचे सह पदाधिकारी उपस्थित होते. टोपे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात  करोना महामारी परिस्थिती चांगल्या प्रकारे  हाताळली. स्वताची आई मृत्यूच्या दारात  असताना देखील त्यांनी मातृभुमीच्या सेवेला प्राधान्य  दिले. तर ढाकणे यांनी देखील करोना  काळात शेवगाव आणि पाथर्डी येथे दोन कोविड सेंटर सुरू करून अनेक रोग्यांचा  जीव वा...

जगात अशक्य असे काही नाही - गणेश शिंदे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : उरासी उच्च ध्येय बाळगा, आपल्यातील आत्मविश्वास जागवून मार्ग क्रमण करा. जगात अशक्य असे काही नाही. असा सल्ला प्रबोधनकार वक्ते गणेश शिंदे यांनी युवक वर्गाला दिला आहे. आव्हाणे बु. ग्रामपंचायतीच्या वतीने दिवाळी पाडव्याच्या निम्मिताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,याप्रसंगी ‘जीवन सुंदर आहे ‘ या विषयावर गणेश शिंदे  बोलत होते. यावेळी सभापती डॉ क्षितिज  घुले पाटील , सरपंच संगिताताई कोळगे,पंचायत समिती सदस्य मनिषाताई कोळगे,अनिता तागड, शोभाताई पठाडे,वंसतदेवा भालेराव,बबनराव भुसारी, अंबादास कळमकर, सुभाषराव वाणी, सुधाकर चोथे, मोहनराव कोळगे, नानासाहेब खैरे, सुभाष दिखे,शिवाजी तळेकर, राहुल गोर्डे, यासह मोठ्या संख्येन महिलावर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते.   शिंदे यांनी हागणदारीमुक्त गाव, व्यसनमुक्ती,स्त्री भ्रूण हत्या,अंधश्रद्धा,जुन्या रूढी परंपरा,बचत गटाच्या माध्यमातुन संघटन  अशा विविध  विषयांस स्पर्ष करत मुलां मुलीमध्ये भेदाभेद करु नका. मुलींना देखील उच्च शिक्षण द्या.  मोबाईलचा अनावश्यक उपयोग टाळा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नात्यात सुसंवाद ठेवा असे अवाह...

माजी विद्यार्थ्यांची वर्ग मित्राला ६१ हजाराची मदत

Image
कोपरगांव प्रतिनिधी, दि. २९ : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या १९९७-९८ सालच्या ‘अ’ आणि ‘ड’ तुकडीत शिकणा-या माजी विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमीत्त एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला देवुन एक हात मदतीचा माध्यमांतुन आपल्याच अडचणींत असलेल्या वर्गमित्राला ६१ हजार रूपयांची मदत केली आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.            लहानपणापासुन एकत्रीत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेवून नोकरी व्यवसायानिमीत्त बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना समाजमाध्यमांतून सोमनाथ परजणे यांनी दिवाळीनिमीत्त एकत्र केले व त्यांचे स्नेहसंमेलन घेतले.            त्यात कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय कोपरगांव येथे इयत्ता दहावीमध्ये १९९७-९८ मध्ये अ आणि ड तुकडीत शिकणा-या विद्यार्थ्यांनी आपल्या ख्याली खुशालीची एकमेकांना माहिती दिली. कोणी डॉक्टर, वकील, मेजर, नोकरदार, व्यावसायिक झाले. त्यात माजी विद्यार्थी रहिम शेख यांच्या पत्नी आजारी असल्याची माहिती समोर आली त्यावर या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एक हात मदतीचा ग्रुप स्थापन करत स्नेहसंमेलनात काही कामानिमीत्त उपस्थित राहु न शकलेल्या सहकारी मित्र...

कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा रविवारी गळीत हंगाम शुभारंभ

Image
कोपरगांव प्रतिनिधी, दि.२९ : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या ६० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ संचालक रमेश रंगनाथ आभाळे त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. निलम रमेश आभाळे या उभयतांच्या शुभहस्ते, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यावेळी भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे, शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे, सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे व कारखान्यांचे अध्यक्ष, युवानेते विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक ३० ऑक्टोंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता होत असल्याची माहिती उपाध्यक्ष रमेश घोडेराव सर्व संचालक, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी दिली. तरी सर्व उस उत्पादक सभासद शेतकरी बांधवांनी या गळीत हंगाम शुभारंभासाठी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यांत आले आहे.

रेंगाळलेली कामे तातडीने पूर्ण करा, कारणे देवू नका - आमदार काळे

Image
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : कोपरगाव शहराच्या विकासासाठी दिलेल्या निधीतून रेंगाळलेली विकास कामे तातडीने पूर्ण करा व कामांना वेग द्या कारणे देवू नका अशी तंबी आ.आशुतोष काळे यांनी ठेकेदार व कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना दिली. कोपरगाव शहरात सुरू असलेल्या विकास कामांची आ. आशुतोष काळे यांनी अधिकारी व ठेकेदार यांच्या समवेत पाहणी केली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेवून रेंगाळलेल्या विकास कामांबाबत सूचना दिल्या.  कोपरगाव शहरातील अमरधामसाठी दिलेल्या एक कोटी निधी, मोहनिराज नगरच्या स्मशानभूमी साठी दिलेला ५० लाख रुपये निधी तसेच १३१ कोटी रुपये निधीतून सुरू असलेल्या कोपरगाव बेट भागातील पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाकीच्या कामाची पाहणी आ.आशुतोष काळे यांनी यावेळी केली व निर्धारित वेळेत चांगल्या दर्जाची विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करा अशा सूचना  अधिकारी व ठेकेदार यांना आ.आशुतोष काळे यांनी दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, रमेश गवळी, फकीर कुरेशी, दिनकर खरे, राजेंद्र वाकच...

शिंगणापुरात ३२५ लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप - साहेबराव रोहोम

Image
कोपरगांव प्रतिनिधी, दि. २८ : तालुक्यातील शिंगणापुर परिसरातील ३२५ गोर गरीब स्वस्त धान्य दुकानदार लाभार्थ्यांना सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कामगारांच्या पतपेढीमार्फत चालविल्या जाणा-या स्वस्त धान्य दुकान क्रमांक दहा अंतर्गत दिवाळसणानिमीत्त शिंदे फडणवीस शासनाने दिलेल्या आनंद शिधाचे वाटप भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांच्या हस्ते नुकतेच करण्यांत आले. अध्यक्षस्थानी कोल्हे कारखान्यांचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव होते. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची विचारधारा कायम गरीबांना मदत करण्याची राहिलेली आहे असेही रोहोम यावेळी म्हणाले.             प्रारंभी शिंगणापुर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सुनिता भिमा संवत्सरकर प्रास्तविक करतांना म्हणाल्या की, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी तालुक्यावर आलेल्या प्रत्येक संकटात सर्वप्रथम मदत केली आहे. जिल्हा बँकेचे संचालक, युवानेते विवेक कोल्हे यांनी शिंगणापुर परिसरातील वंचित घटकांना दिवाळसणानिमीत्त मदत करून आनंद शिधा व्यवस्थीतरित्या वाटप होतो की नाही याबाबतची काळजी घेतली आणि या लाभार्...

कोपरगांव रोटरी क्लबच्यावतीने उस तोडणी कामगार महिलांना भाऊबीजेनिमीत्त साडी, मिठाईचे वाटप

Image
कोपरगांव प्रतिनिधी, दि. २८ : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील उस तोडणीसाठी आलेल्या कामगारांच्या महिलांना भाऊबीजेनिमीत्त रोटरी व रोटरॅक्ट क्लब कोपरगांवच्या सहकार्याने कारखान्यांचे अध्यक्ष, युवानेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते साडी व मिठाईचे वाटप करण्यांत आले. अध्यक्षस्थानी संजीवनी फाउंडेशनचे सचिव व रोटरी क्लबचे सदस्य सुमित  कोल्हे होते.           प्रारंभी रोटरी क्लबचे अध्यक्ष वीरेश अग्रवाल प्रास्तविक करतांना म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी वंचितांचे अश्रु पुसून त्यांच्या जीवनांत ख-या अर्थाने आनंद निर्माण करण्यासाठी अवितरत संघर्ष केला. रोटरी क्लबही विविध कामातुन सामाजिक उपक्रम राबवित आहे. सचिव राकेश काळे म्हणाले की, शेकडो मैल दुर घरदार सोडुन उसतोडणी कामगार तांडयावर येतात त्यांच्या माता भगिनींना दिवाळसणाचा भाऊबीजेचा आनंद घेता यासाठी यासाठी रोटरी क्लब कोपरगांवने या कार्यक्रमाचे आयोजन केले.    कोल्हे पुढे म्हणाले की, जगभरातील ९० हजार केंद्राच्यापुढे रोटरी क्लबचे कार्य सुरू असून प्रत्येक संकटातील सामाजिक सेवा ही वा...

'चला जाणूया नदीला' मोहिमेची कोपरगावातुन सुरुवात

Image
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : महाराष्ट्र शासनाच्या चला जाणूया नदीला या मोहिमेअंतर्गत देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ नद्या अमृतवहिनी करण्याची मोहीम हाती घेतली असून त्या अंतर्गत अगस्ती या नदीच्या परिक्रमासाठी कोपरगाव येथील गोदावरी नदी किनारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार दि २१ ऑक्टोबर रोजी कलश पूजन होऊन सुरुवात झाली. महाराष्ट्र शासनाच्या चला जाणूया नदीला या उपक्रमा अंतर्गत जलबिरारदरी आणि महाराष्ट्र शासन संयुक्त विद्यमाने देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ नद्यां अमृतवाहिनी करण्याचा मोहिमेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अगस्ती ऋषीच्या अंकाई टंकाई या डोंगरावर उगम पावणाऱ्या व पुढे चालून कोपरगाव तालुक्यातुन वाहणाऱ्या पवित्र अशा दक्षिण गंगा गोदावरी नदीस सोनारी येथे मिळते. अगस्ती नदीची परिक्रमा आणि अभ्यास दौरा करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील गोदामाई प्रतिष्ठानचे आदिनाथ ढाकणे व नदी अभ्यासक डॉ. वासुदेव साळुंखे यांची निवड करण्यात येऊन वर्धा येथे जल आभ्यासक डॉ. राजेंद्र सिंग यांनी कलश व तिरंगा देऊन या मोहिमेला सुरुवात करून दिली असुन या  अगस्ती नदी प...

राज्यशासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी - नामदार विखे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : शेवगाव तालुक्यातील तब्बल साठ हजार हेक्टर क्षेत्रातील विविध पिके अतिवृष्टीमुळे बाधित झाले. त्यात कपाशीचे क्षेत्र जास्त असून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून येत्या आठ दिवसात सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या असून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याची ग्वाही राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री  राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. आज मंत्री  विखे  यांनी तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव, लाड जळगाव, बालमटाकळी आदी भागातील  शेतकऱ्यांकऱ्याच्या झालेल्या नुकसणीची पहाणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. संकटाच्या काळात शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत उपलब्ध करण्यात येईल. यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यात वार्षिक सरासरी पर्जन्यमानाच्या दुपटीने नोंद झाली आहे.      तालुक्याच्या पूर्व भागात जवळपास ९० टक्के नुकसान झाल्याच्या तक्रारी आहेत. तालुक्यातील ४१ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी होऊन जवळपास २० लाख रुपयांचा पीकविमा उतरविला. पीक विम्याचे स्वरक्षित क्षेत्र २१ हजार हेक्टरच्या आसपास अ...

शेवगावात भाजप पक्षीय नाराजी विकोपाला गेल्याचे संकेत?

शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ :  राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रथमच तालुक्यात आले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. नामदार विखे यांचा  तालुक्यासी तसा दांडगा संपर्क असल्याने ते कुठेही असले तरी लोक त्यांचे जवळ मोहोळा सारखी गर्दी करतात हा आतापर्यंतचा अनुभव आहे.     आज  नामदार विखे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आले. हा कार्यक्रम तसा सर्वपक्षीय असतानाही त्यांच्या दौऱ्याचे नियोजन जमले नसल्याने  त्यांच्या सभेला म्हणावी तेवढी गर्दी आढळली नाही. काही दिवसापूर्वी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचाही शेवगावी दौरा झाला, त्यावेळीही नियोजनाचा मोठा अभाव जाणवला. त्यांच्या कार्यक्रमात तर खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तरीही बहुतेक खुर्च्या मोकळ्या होत्या. अलीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अवमेळ झाल्याचे जाणवते. पक्षाचे कॅबिनेट मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले नामदार विखे  तालुक्यात येतात याची कल्पना पक्षाच्या तालुका पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना नसावी काय? अशी शंका येते. या का...

शिंदे-फडणवीस सरकारने गरीबांची दिवाळी गोड केली - दत्ता काले

Image
कोपरगांव प्रतिनिधी, दि. २५ : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गोर गरीब स्वस्त धान्य लाभार्थ्यांना साखर, रवा, चनादाळ आणि गोडेतेल या चार वस्तु अवघ्या शंभर रूपयांत देवुन त्यांची दिवाळी आनंदाच्या शिध्याने गोड केली आहे असे प्रतिपादन कोपरगांव भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता काले यांनी केले.             शहरातील टिळकनगर भागातील सौ. एम. डी. लहिरे यांचे स्वस्त धान्य दुकान क्रमांक १२० मध्ये गोर गरीबांना आनंदाचा शिधा वाटप व्यवस्थीत व्हावा याबाबतची पाहणी भाजपाच्यावतीने करण्यांत आली त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे होते.            प्रारंभी भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक प्रास्तविक करतांना म्हणाले की, कोपरगांव शहरासह मतदार संघावर चार दिवसापुर्वी अतिवृष्टी झाली त्यात गोर गरीबांचे प्रचंड हाल झाले संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान यांनी रातोरात संजीवनी आपत्ती व्यवस्थापनाच्या मार्फत घटन...

कोल्हे साखर कारखाना कर्मचारी वारसास दोन लाख रूपयांचा विमा धनादेश प्रदान

Image
कोपरगांव प्रतिनिधी, दि. २५ : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे कर्मचारी कै. बाळासाहेब दौलतराव वल्टे यांचे रस्ते अपघातात निधन झाले होते त्यांच्या वारस पत्नी श्रीमती निर्मला बाळासाहेब शेटे यांना कारखान्यांने न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीकडुन उतरविलेल्या अपघात विमा योजनेचा दोन लाख रूपयांचा धनादेश कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांच्या हस्ते नुकताच वितरीत करण्यांत आला. बाजीराव जी. सुतार याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या विशालदृष्टीकोनातुन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व कारखान्यांचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सर्व सभासदांसह कामगारांचा प्रत्येकी दोन लाख रूपयांचा अपघाती विमा उतरविलेला आहे. अचानक उदभवलेल्या संकटात विम्याची मदत होते. संकट कधीही सांगुन येत नाही. कारखाना व्यवस्थापनाने कै. बाळासाहेब शेटे यांच्या अपघाताची सर्व कागदपत्रे पुर्तता करून न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीकडे सादर केली त्यातून दोन लाख रूपयांचा धनादेश श्रीमती निर्मला शेटे व गिरीष बाळासाहेब शेटे यांच्याकडे सुपूर्द करण्यांत आला. शेवटी लेखा शाखेचे देवराम...

दिवाळीचा मुहूर्त साधत बक्तरपुरचे भाजपा कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल

Image
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे विकासाभिमुख नेतृत्व आ.आशुतोष काळे यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होवून कोपरगाव तालुक्यातील बक्तरपूर येथील भाजपा कार्यकर्त्यांनी सोमवार (दि.२४) रोजी दिवाळीचा मुहूर्त साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यामध्ये राजेंद्र बंडू सानप, विजय चिंधू सानप, सुरेश माधव नागरे, गणेश वाळीबा नागरे, प्रवीण प्रभाकर गंभिरे या भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या कार्यकर्त्यांचे आ. आशुतोष काळे यांनी स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक डॉ. मच्छिंद्र बर्डे, श्रीराम राजेभोसले, सुधाकर रोहोम, गौतम बँकेचे संचालक  खंडेराव सोनवणे, तसेच सोमनाथ सानप, गणेश सानप, शरद गरुड, अरुण डोंगरे, विलास सानप आदी मान्यवर उपस्थित होते.   मागील काही महिन्यांपासून कोपरगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इतर पक्षातून येणाऱ्या कार्यकर्त्यांचे इनकमिंग जोरात सुरु आहे. ना. आशुतोष काळे यांनी तीन वर्षाच्या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विकासाच्या बाबतीत मतदार संघाचा चेहरा-मोहरा बदलला आहे. मत...

ग्रीन फोरमच्या वृक्ष लागवडीने कोपरगावमध्ये दरवळला सप्तपर्णीचा सुगंध

Image
वृक्षांमुळे कोपरगावकरांची दिवाळी झाली सुगंधी    कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : दिवाळीच्या उत्सवाची लगबग सुरु झाली नागरीकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली.  मोठमोठी दुकाने, कार्यालये बॅंका पतसंस्था, बंगले, बहुमजली इमारती आणि सर्वसामान्य नागरीकांची घरे आकर्षक विद्युत रोषणाई सेली, रंगीबेरंगी आकाशीदिवे लावल्याने कोपरगाव शहराची रोषणाई अधिक खुलुन दिसत असताना संपूर्ण शहराच्या मुख्य रस्त्यावरू जाताना सर्वञ  मंद सुगंध दरवळत असल्याने  कोपरगाव शहरातील वातावरण अतिशय प्रफुल्लित व सुखदायक झाले आहे. शहराच्या रस्त्यालगत ग्रीन कोपरगाव फोरमच्या माध्यमातून लावलेल्या सप्तपर्णी वृक्षाला सध्या सुगंधी फुलांचा बहर आला आहे. सप्तपर्णी फुलांचा सुगंध शहराच्या अनेक रस्त्यांवर दरवळत असल्याने शहरातील वातावरण सायंकाळच्या दरम्यान अधिक सुगंधी होत असल्याने नागरीकांना सुखदायक वाटु वागले आहे.   दिवाळीच्या सणाला नागरीक सुगंधी उटण्याने अंघोळ करुन आपलं शरीर सुगंधी करण्याचा प्रयत्न करता. माञ कोपरगाव शहरातील अनेक वृक्षांनी आपल्या नैसर्गिक रुपातुन अर्थात फुलांच्या माध्यमातून सुगं...

वचनपूर्तीबद्दल शिंदे-फडणवीस यांचे जिल्हाध्यक्ष मुंढेनी केले अभिनंदन

शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने  घेतलेल्या निर्णयाची लगेच अंमलबजावणी सुरू करून सात लाख शेतकऱ्यांना हा प्रोत्साहन निधी त्यांच्या बँक खाती जमा दिला. या वचनपूर्तीबद्दल शिंदे – फडणवीस सरकारचे भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी आभिनंदन केले आहे.        पत्रकारांसी वार्तालाप करतांना मुंढे म्हणाले, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांपूर्वी केली होती. तसेच दोन्ही अर्थसंकल्पांत देखील त्याचा उल्लेख केला होता. परंतु, त्याची अंमलबजावणी केली नाही. विरोधी पक्ष असताना भाजपाने या विषयावर आंदोलनही केले होते. अखेर गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना युती सरकारने याची अंमलबजावणी सुरू केली व सहा लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अडीच हजार कोटी रुपये सरकारने जमा केले. शिंदे – फडणवीस सरकारने पहिल्याच बैठकीत नियमित कर्जफेड करणा...

'आनंदाचा शिधा' उपक्रमाच्या कीटचे तालुक्यात वाटप सुरु

खास पिशव्यांच्या ४२ हजार २४३कीटचे होणार वाटप शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : सर्व सामन्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘आनंदाचा शिधा’ या अभिनव उपक्रमाच्या ४२ हजार २४३ कीट शेवगाव तालुक्यात पोहचल्या असून तालुक्यातील काही रेशन दुकानातून या शिधा वाटपास आज सुरुवात झाल्याची माहिती तहसीलदार छगनराव वाघ यांनी दिली. शहरातील दादेगाव रस्त्यावरील शासकीय गोदामातून तहसीलदार वाघ, तालुका पुरवठा निरीक्षक विजय चव्हाण, यांच्यासह पुरवठा विभागातील अधिकारी कर्मचा-यांच्या उपस्थितीत आज शुक्रवारी  सकाळीच तालुक्याच्या विविध गावात शासकीय वाहनातून ‘आनंदाचा शिधा ‘ योजनेच्या कीट पाठविण्यात आल्या. या किटच्या माध्यमातून गरीब व गरजू शिधापत्रिका धारकांना शंभर रुपयात प्रत्येकी एक किलो साखर, रवा, चनाडाळ  व एक लिटर पामतेल या साहित्याच्या कीटचे वाटप केले जाणार आहे. शेवगाव तालुक्यात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचे लगेच वाटप करण्याच्या सूचना संबधित रेशन दुकानदारांना देण्यात आल्या असून शासनाने दिवाळी पूर्वी आम्हाला आन...

खंदकनाल्याचे रूंदीकरण करताना सापडला जूना पूल, पालीकेच्या कर्मचाऱ्यांसह सर्वांना आश्चर्याचा धक्का

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २१ : मुसळधार पावसाच्या पाण्याने कोपरगावच्या खंदक नाल्याची खरी अवस्था उघड केली. आणि शुक्रवारी तर चमत्कार घडला. शहराच्या मुख्य रस्त्याजवळील अर्थात समता पतसंस्थेच्या समोर एका जून्या पूलाचा पुन्हा उदय झाला. खंदकनाल्याचे साचणारे पाणी सुसाट वेगाने गोदावरी नदीकडे झेपावू लागले.  खुप वर्षापुर्वी नाल्याचे पाणी नदीकडे जाण्यासाठी दगडी पुल बांधण्यात आला होता माञ काही अति तज्ञ अभियंत्यांनी किंवा तत्कालीन अधिकाऱ्यांनी कोपरगावच्या या महत्वाच्या पुलाला बुजवून नाल्याची खोली कमी करण्यासाठी व इतरांना त्यावर अतिक्रमण करण्यासाठी सोपे व्हावे या उदात्त हेतुने हा महत्वाचा पूल व त्याच्या नळ्या बंद करुन त्याच्या वरती तीन नळ्या टाकुन नवा पुल बांधण्यात आला. कालांतराने दरवेळी नदीला पाणी आले की कोपरगाव शहरात याच खंदक नाल्यातुन  नागरी वस्तीत व मुख्य रस्त्यावर पाणी येत असल्याने कोपरगाव शहराची पूररेषा केवळ या खंदक नाल्यामुळे वाढवण्यात आली. या पूररूषे संदर्भात लोकसंवादने आवाज उठवल्या नंतर कदाचीत वरूणराजालाही वाटले असावे कि पूररेषा चुकीची आहे आणि गुरुवारी राञी मुसळधार पाऊस पडल्याने पुन्हा खंदक न...

शेतकऱ्यांना शंभर टक्के पिकविमा नुकसान भरपाई द्यावी - कोपरगाव तालुका भाजपची मागणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २१ : कोपरगावसह संपूर्ण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने खरीप व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले असे असतानाही विमा कंपनीने शेतकऱ्यांना अत्यल्प नुकसान भरपाई देऊन त्यांची बोळवण केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स व अन्य विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम व सर्व शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार विजय बोरुडे यांच्याकडे केली आहे.अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. दिवाळीसणाच्या तोंडावर शेतकऱ्यांमध्ये विमा कंपनी विरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष आहे.             याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, दीपक चौधरी, डॉ. राजकुमार दवंगे, हरिभाऊ लोहकणे, संदीप देवकर, अण्णासाहेब शिंदे, सुदाम करपे, किसनराव गव्हाळे, वसंतराव मिस्त्री, बाळासाहेब सोनवणे, चंद्रभान आढाव, संदीप चौधरी, गणेश थोरात, श्रीकांत वहाडणे, अनिल चौधरी, दिनेश थोरात, महेश थोरात, नानासाहेब ...

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त नागरिकांना आमदार काळेंकडून मदतीचा हात

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : कोपरगाव तालुक्यात गुरुवार (दि.२०) रोजी मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची माहिती मिळताच आ. आशुतोष काळे यांनी मदतीचा हात देतांना तातडीने आपल्या यंत्रणेमार्फत मदत पोहोचविली. गुरुवार (दि.२०) रोजी मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या परतीच्या पावसाने कोपरगाव शहरासह ग्रामीण भागात देखील हाहाकार उडवून दिल्यामुळे पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात घुसले. यामध्ये कोपरगाव शहरातील कर्मवीरनगर, बैलबाजार रोड, गोकुळनगरी, खंदकनाला, स्टेशनरोड, खडकी, जुनीगंगा देवी मंदिर, जनार्दन स्वामी आश्रम, टाकळी रोड, आदी परिसर तसेच ग्रामीण भागातील जेऊर पाटोदा, चांदेकसारे, आनंदवाडी, कोकमठाण (माळवाडी), शहाजापूर, टाकळी, माहेगाव देशमुख, खिर्डी गणेश (भास्कर वस्ती) आदी ठिकाणी नागरी वस्तीत मोठ्याप्रमाणावर पाणी शिरले होते. पावसाच्या या पाण्यामुळे नागरिकांना निर्माण होणाऱ्या अडचणीमध्ये मदत करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी तातडीने आपली यंत्रणा पाठवून नागरिकांना मदत केली. अनेक ठिकाणी पाणी वाहून जाण्...

संजीवनी आपत्ती व्यवस्थापन पथक धावले कोपरगावकरांच्या मदतीला

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : कोपरगाव शहर आणि परिसराला गुरुवारी मध्यरात्री पावसाने अक्षरश: झोडपून काढले. कोपरगावच्या इतिहासात यापूर्वी झाला नव्हता इतका जोरदार पाऊस पडल्यामुळे सगळीकडे हाहाकार उडालेला असताना सर्वात प्रथम संजीवनी आपत्ती व्यवस्थापन पथक, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक तसेच भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिकांच्या मदतीला धावून गेले. त्यांनी शहरातील विविध भागातील नागरिकांच्या घरांमध्ये, दुकानांमध्ये शिरलेले पाणी उपसले तसेच नाश्ता व भोजनाची व्यवस्था करून आपदग्रस्त नागरिकांना धीर दिला. संजीवनी उद्योग समूहाचे मार्गदर्शक बिपीनदादा कोल्हे, भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते विवेक कोल्हे यांच्या सूचनेनुसार संजीवनी आपत्ती व्यवस्थापन पथकासह संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कोपरगाव शहरातील विविध भागात तात्काळ धाव घेत घरांमध्ये, दुकानांमध्ये शिरलेले पाणी उपसून बाहेर काढले. आपदग्रस्त नागरिकांना नाश्ता आणि भोजन पुरवून त्यांना दिलासा दिला. ...

कोपरगावची पूररेषा खंदक नाल्यामुळेच वाढल्याचे पावसाने सिध्द केले

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २०: गोदावरी नदीच्या पूराच्या पाण्यामुळे फार कमी प्रमाणात कोपरगाव शहरातील नागरीकांच्या घरात पाणी शिरते नदीकाठी वसलेला काही ठराविक भाग वगळला तर शहराला महापूराची स्थिती शक्यतो निर्माण होत नाही माञ शहराचा सर्वात मोठा खंदक नाला महापूराला कारणीभूत आहे आणि त्याच्यामुळे शहरात पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे प्रशासनाने शहराची पूररेषा नदीच्या पाण्या ऐवजी नाल्याच्या पाण्यावरुन निश्चित केली आहे ही पूररस्थिती मानवनिर्मित आहे. खंदक नाल्याची रुंदी, खोली दिवसेंदिवस कमी होत गेली. काही ठिकाणी नाला लुप्त झाला त्यामुळे वरच्या भागा तील पावसाच्या पाण्याचा प्रवाह नदी पाञापर्यंत जात नसल्याने ते पाणी शहरातील उपनगरात राहणाऱ्या नागरीकांच्या घरात घुसते. पाटबंधारे विभागाने अंदाजे व पाणी गेलेल्या भागातील नागरीकांच्या सांगण्यावरून स्थानिक प्रशासनाने चिन्हांकित केल्याने पूर रेषा निश्चित करणे चुकीचे आहे त्यामुळे निम्मे कोपरगाव पूररेषेत ओढून विकास कामाला आडकाठी आणले जात आहे. गेल्या १४ वर्षापासुन शहराच्या अनेक योजना पूररेषेतील नागरी वस्तीत अपेक्षीत प्रमाणात राबवता आल्या नाही. मालमत्ताधारकांना ...

पावसाचा झाला कहर, राञभर पाण्यात कोपरगाव शहर

गोदावरी नदी शांत, पण खंदक नाल्याला पूर    कोपरगाव प्रतिनिधी दि.२०: कोपरगाव शहरासह तालुक्यात राञभर मुसळधार पाऊस पडल्याने कोपरगाव जलमय झाले. शहरातील खडकी येथील शेकडो नागरीकांच्या घरात पाणी घुसल्याने त्यांना राञ जागुन काढावी लागली तर  गोकुळनगरी, बैलबाजार रोड परिसर संजयनगर, कर्मवीवीर नगर, शंकरनगर, गवारेनगर आदी भागातील नागरी वस्तीत पाणी घुसल्याने नागरीकांची बेहाल झाली. खंदक नाल्याला प्रमाणापेक्षा अधिक पाणी आल्याने शहराच्या मुख्य रस्त्यावरील वाहतुक विस्कळीत झाली होती तर नागरीकांनी आपली वाहने पाण्यातून काढत मार्गस्थ होत होते. दरम्यान तालुक्यातील चांदेकसारे, आनंदवाडी या भागातील ओढ्याचे पाणी घरात शिरल्याने अनेकांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पहाटे पासुन तालुक्याची प्रशासकीय यंञणा बचाव व मदत कार्यात सक्रीय झाली आहे. तर राञी उशिरापासुन  आमदार आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या यंञणा मदतीसाठी धावत आहेत. शहरातील बाजार तळ भागात विज पडल्याने एक गाय व कुञ्याचा मृत्यु झाला आहे. अनेकांच्या घरात पाणी गेल्याने दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने भरलेले साह...

कोल्हे कारखान्यात आयएसओ प्रणाली अंतर्गत तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १९ : मुक्त अर्थव्यवस्थेत प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा सुरू झाली आहे. त्यानुरूप सहकारी साखर कारखानदारीतही आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि बदल अत्यावश्यक असुन गुणवत्तेत निरंतर सुधारणा होण्यांसाठी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यांचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत आयएसओ प्रणाली अंतर्गत तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली. टी. यु. व्ही. एस. यु. डी. संस्थेच्या नाशिक कार्यालयाचे मुख्य प्रशिक्षक बालकिशन पांचाळ यांनी अंतर्गत मुल्यांकन या विषयावर कारखान्यांचे सर्व खाते प्रमुख, उप खातेप्रमुख यांना तीन दिवस प्रशिक्षण दिले.            या कार्यशाळेचे उदघाटन करतांना कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी साखर कारखानदारीत जागतिक स्तरावर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचा नांवलौकीक वाढविला असुन आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घ्यायचे हा ध्यास त्...

पंचनाम्याचा नुसता फार्स नको, सरसकट नुकसान भरपाई मिळावी - माजी आमदार घुले

शेवगाव प्रतिनिधी, दि. १९ : शेवगाव तालुक्यासह नजीकच्या नेवासा व पाथर्डी तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात वार्षिक सरासरी पेक्षा जास्त पाउस झाल्याने खरीप पिकांसह फळ बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतक-यांचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे. सोमवारी व मंगळवारी शेवगाव तालुक्यातील विविध मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे शासनाने वरील तिन्ही तालुक्यात तात्काळ ओला  दुष्काळ जाहीर करून शेतक-यांना सरसकट नुकसान भरपाईचा अहवाल शासनाकडे सादर करण्याचे व याबाबत विधान सभेत पाठपुरावा करण्याचे साकडे  माजी आमदार डॉ.नरेंद्र घुले पाटील यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्य्याकडे सादर केले.           विरोधी पक्ष नेते पवार हे नुकतेच जिल्हा दौऱ्यावर असताना नेवासा तालुक्यातील भानसहिवरे परिसरात आले असता. माजी आमदार डॉ.घुले यांनी शेतक-यांच्या शिस्तमंडळासह त्यांची भेट घेवून गेल्या काही दिवसापासून वरील तिन्ही तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने या तिन्ही तालुक्यातील शेतक-यांच्या खरीप हंगामातील कापूस, तूर, मुंग, सोयाबीन, कांदा, उडीद आदी पिकांसह फळबागा तसेच शेतातील उभ्या उसाच्या नुकसानीबा...

अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे वाढलेली पूररेषा हटवण्यासाठी कोपरगावकर एकवटणार

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ :  कोपरगाव शहराच्या विकासाला बाधा आणणारी पूर रेषा तत्कालीन संबंधित विभागाच्या  अधिकाऱ्यांनी कामात निष्काळजीपणा केल्यामुळे कोपरगाव शहराची पूररेषा वाढवण्यात आली. वाढलेल्या पूररेषेचा परिणाम शहराच्या बाजारपेठेवर झाला. नागरीकांच्या मालमत्तेचे मुल्य कमी झाले. शहराच्या मध्यभागी असलेल्या भूखंडावर नागरीक पूररेषेमुळे अपेक्षित इमारती बांधण्यास धजावत नाहीत. पालीका प्रशासन त्या जागेतील बांधकामांना पूररेषेचा नियम लावून त्या त्या प्रमाणात व नियमात बांधकामाची परवानगी देतात. सन २००६ साली गोदावरी नदीला पूर आला होता त्यानंतर तब्बल दोन वर्षांनंतर म्हणजे २० नोव्हेंबर २००८ साली  पूररेषेचा अहवाल पाटबंधारे विभागाने कोपरगाव नगरपालीकेचे तत्कालीन मुख्याधिकारी यांच्याकडे पाठवला. त्या अहवालात संबधीत पाटबंधारे विभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्याने सांगितले की, कोपरगाव नगरपरिषदेच्या हद्दीतील गोदावरी नदीची सन २००६ ची पूररेषा आखणी बाबत सहाय्यक संचालक नगर रचाना विभाग अहमदनगर यांचे पञ प्राप्त झाले त्यानुसार कोपरगाव शहरातील अनेक भागात पुराचे पाणी घुसले होते. त्यानंतर संबंधित विभागाने पुराचे पाणी घुसल्...

लक्ष्मण देवकर यांना अपघाती विम्याचा धनादेश प्रदान

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १९ : तालुक्यातील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे सभासद व कर्मचा-यांचा कारखाना व्यवस्थापनाने प्रत्येकी दोन लाख रूपयांचा अपघात विमा न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीकडुन उतरविला असुन कारखान्यांचे सभासद लक्ष्मण आनंदा देवकर यांचा रस्ते अपघात झाला असता त्यांना वैद्यकिय उपचारार्थ पन्नास हजार रूपयांचा विमा धनादेश संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यांत आला.  बिपीनदादा कोल्हे याप्रसंगी म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद, कामगारांसाठी कारखान्याने न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीकडून अपघात विमा पॉलीसी उतरविली आहे. अपघात समयी विमा प्रत्येकाला एक महत्वाचा आधार असतो. आतापर्यंत या योजनेतुन असंख्य सभासद कर्मचा-यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवुन दिला आहे. टाकळी येथील कारखान्यांचे सभासद श्री. लक्ष्मण आनंदा देवकर यांचा रस्ते अपघात झाला होता, त्याबाबत कारखाना व्यवस्थापनाने आवश्यक ती कागदपत्रे पुर्ण करून न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीकडे त्याचा पाठपुरावा केला व त्यांना विमा पॉलीसीच्या माध्यम...