Posts

Showing posts from December, 2022

राष्ट्रीय महामार्ग समितीच्या अध्यक्षपदी अस्लम शेख

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३१ : सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या राष्ट्रीय पोलीस प्रोटेक्शन संघटनेच्या राष्ट्रीय महामार्ग समितीच्या बोर्ड कमिटीच्या अध्यक्षपदी तालुक्यातील चापडगाव येथील अस्लम हुसेन शेख यांची नियुक्ती जाहीर झाली आहे.       या बोर्ड कमिटीच्या माध्यमातून राष्ट्रीय व राज्यस्तरिय महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी तसेच अपघाताच्या घटना झाल्यांनतर अपघातातील जखमींना पोलीस दलाच्या सहकार्याने तातडीने योग्य ती वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी यासाठी संघटनेमार्फत आवश्यक उपायोजना राबविण्यासाठी जाणीव पूर्वक काम करण्याचा मानस असल्याचे शेख यांनी यावेळी व्यक्त केला.        शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या विविध भागात नँशनल अँटी करप्शन अँन्ड कंट्रोल क्राईम ब्युरो, राष्ट्रीय पोलीस प्रोटेक्शन आदी संघटनेच्या माध्यमातून पोलीस विभागाला योग्य ते सहकार्य उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरु असून या पुढील काळातही राष्ट्रीय महामार्ग बोर्ड कमिटीच्या माध्यमातून रस्ते अपघाताच्या घटनेत योग्य ती मदत व सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्नपूर्वक काम करण्याचे नूतन अध्यक्ष शेख यांनी सांगितले...

हंडेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाचे रामनाथ कोकाटे बिनविरोध

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३१ : तालुक्यातील हंडेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपा कोल्हे गटाचे रामनाथ निवृत्ती कोकाटे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याबददल त्यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.           उपसरपंच रामनाथ कोकाटे यांचा वेळी सत्कार करण्यांत आला. या निवडी प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शरद कोकाटे, सयाजी घुमरे, कमलाबाई घुमरे, रंजना पुरी, अनिता सोनवणे तसेच शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष संभाजीराव गावंड, हंडेवाडीचे ग्रामस्थ मधुकर कोकाटे, शिवाजीराव घुमरे, माधवबाबा पुरी, संतोष सोनवणे, सुभाष कोकाटे, केशवराव कोकाटे, संजय कोकाटे, सतिष कोकाटे, प्रसाद कोकाटे, संदिप कोकाटे, विठठल घुमरे, अमोल घुमरे, अनिल मोरे, प्रसन्न कोकाटे यांच्या सह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

श्रीगणेशचे १४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

कोपरगाव प्रतिनिधी, दि, ३१ :  आज प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल, जिज्ञासा, संशोधकृती आणि काहीतरी वेगळे करण्याची आवड निश्चितच आहे. परंतु हे सर्व गुण फुलवण्यासाठी, रुंदीगत करण्यासाठी आपणास आवश्यकता आहे प्रत्यक्षात प्रायोगिक कौशल्य व संशोधनात्मक कृती वाढवणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची ती संधी उपलब्ध करून देण्यासाठी जनसेवा प्रतिष्ठान अहमदनगर संचलित सर डॉ. सी.व्ही.रामण बालवैज्ञानिक स्पर्धा आयोजित करण्यात येते. बालवैज्ञानिक परीक्षेत श्रीगणेशचा कुमार दानिश शेख याने जिल्हास्तरावर २ रा क्रमांक पटकाविला, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे यांनी यांनी दिली.            सर डॉ. सी.व्ही.रामण बालवैज्ञानिक परीक्षेतील राज्य, जिल्हा, तालुका गुणवत्ता यादीतील विद्यार्थी इस्रो सहलीसाठी पात्र ठरविले जातात.राहाता केंद्रावर घेण्यात आलेल्या या परिक्षेमध्ये दानिश  शेख जिल्हा गुणवत्ता यादीत  द्वितीय क्रमांक, तसेच तालुका गुणवत्ता यादीत साईशा डांगे, सिद्धेश शिरोळे प्रथम क्रमांक, विवेक डांगे, श्रावणी जाधव, ओम मालुसरे,चैतन्य वाणी यांनी द्वितीय क्रमांक, हर्षवर्धन चौधरी, सार्थक गोसावी,पाविनी चौरे यां...

मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या तालुका सचिवपदी सोमनाथ राशिनकर

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३० : तालुक्यातील दहिगांव बोलका येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ सिताराम राशिनकर यांची मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या कोपरगांव तालुका सचिवपदी नुकतीच नियुक्ती करण्यांत आली आहे.           मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष उज्वलसिंह गायकवाड व राष्ट्रीय सरचिटणीस विजयराव कदम यांच्या संयुक्त स्वाक्षरीने त्यांच्या निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले आहे. याप्रसंगी अहमदनगर जिल्ह्याचे मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपकराव धट उपस्थित होते. मराठा क्रांती स्वराज्य संघटेनेचे महाराष्ट्र राज्यात मोठया प्रमाणात संपर्काचे जाळे असुन संघटनेने आतापर्यंत मराठा समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावून त्याची सोडवणुक केली आहे. या पदाच्या माध्यमातुन मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा देवुन तालुका स्तरावर असलेले प्रश्न सोडवुन समाजाचे संघटन वाढवू अशी प्रतिकिया नवनिर्वाचित सचिव सोमनाथ राशिनकर यांनी दिली. त्यांच्या निवडीबददल सर्वथरातून अभिनंदन होत आहे.

विविध गुणदर्शन स्पर्धेत ठाकूर निमगावची घोडदौड

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३० :  जिल्हा परिषद व शेवगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने  येथील त्रिमूर्ती पब्लिक स्कूलमध्ये आयोजित तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धामध्ये जि.प. प्रा. शाळा ठाकूर निमगावच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली.        या शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकासह एकूण सात स्पर्धेमध्ये यशस्वी कामगिरी केली. त्यामध्ये तेजल गणेश कातकडे हिने किशोर गट वेशभूषेसह सादरीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला असून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी ती पात्र ठरली आहे. याशिवाय वकृत्व  स्पर्धेत प्रतीक्षा निजवे व कल्याणी निजवे हीने, कथाकथन स्पर्धेत तेजश्री भगत, वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत वैष्णवी निजवे, हस्ताक्षर स्पर्धेत आरती गायकवाड या विद्यार्थ्यांनी आपापल्या स्पर्धा गटात यश मिळवले आहे.तसेच समूहगीत गायन स्पर्धेत मोठ्या गटाने यशस्वी कामगिरी केली आहे.      या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक बाबुराव मुटकुळे, दैवशीला राऊत, कल्पना बोडखे, शारदा डोईफोडे, कल्याण शिंदे, अविनाश काटे, श्रीकृष्ण शेळके, विशाल घोडसे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षण अधिकारी तृप्ती कोलते ,...

राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३० : राष्ट्रीय संरक्षण कायदा १९८६  व त्यात झालेल्या सुधारीत तरतुदी नुसार २०१९  पासून लागू झालेल्या नवीन कायद्याबाबत ग्राहकांनी जागरूक असणे आवश्यक आहे. दैनंदिन जीवनामध्ये ग्राहकांची जेव्हा फसवणूक होते तेव्हा त्यांनी रीतसर  ग्राहक निवारण कक्षाकडे तक्रार दिली तर  त्याची दखल घेतली जाते त्यासाठी ग्राहकांनी ग्राहक संरक्षण कायद्याचा आधार घेऊन आपला न्याय हक्क प्राप्त केला पाहिजे असे आवाहन  तहसीलदार छगनराव वाघ यांनी केले. अखिल भारतीय ग्राहक पंचायत शेवगाव तसेच अन्न व नागरी पुरवठा विभाग शेवगाव तहसील यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात ते बोलत होते.          यावेळी ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष अशोक शेवाळे, प्राचार्य शिवदास सरोदे, अर्जुनराव देशमुख, विनायक क्षेत्रीय आदींची भाषणे झाली. कार्यक्रमासाठी रवींद्र शेळके,रघुनाथ सातपुते, बन्सीधर आगळे, किसन माने विविध विभागांचे पदाधिकारी वितरक ग्राहक व प्रशासनाचे कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन निलेश मोरे यांनी केले तर वसुधा सावरकर यांनी आभार मानले. 

महेश फटांगरेची पोलिस उपनिरीक्षकपदासाठी निवड

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३० : तालुक्यातील भातकुडगाव येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील महेश आबासाहेब फटांगरे यांनी  पोलीस खात्याअंतर्गत दिलेल्या राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश मिळवून त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. याबद्दल शेवगावच्या राजीव राजळे मित्र मंडळाच्या वतीने नगरसेवक महेश फलके यांच्या कार्यालयात कृषक समाजाचे राज्याध्यक्ष, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले यांच्या हस्ते फटांगरे यांना सन्मानित करण्यात आले आहे.      या प्रसंगी राजीव राजळे मित्र मंडळाचे राहुल धस, किरण आहेर ,पत्रकार प्रा जनार्दन लांडे पाटील उपस्थित होते.     यावेळी नगरसेवक महेश फलके म्हणाले, जीवनात उत्कृष्ठ यश मिळविणाऱ्या व्यक्तिच्या पाठीवर थाप टाकून, परिस्थितीवर मात करत त्याने प्राप्त केलेल्या यशाचे कौतूक झाले पाहिजे. जेणेकरुन भविष्यातही त्याची जीद्द कायम रहावी. तसेच इतरांना देखील त्यांच्यापासून प्रेरणा घेता यावी. या उद्देशाने राजीव राजळे मित्रमंडळ  समाजातील अशा व्यक्तीची सातत्याने दखल घेत असते.    आबासाहेब  फटांगरे यांची परिस्थिती जेमतेम  असल्याने महेश यांना मामाकडे राहून प्राथमिक शिक्षण घ्यावे लागले.  भातकुडगा...

करंजी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महाविकास आघाडीचे शिवाजी जाधव विजयी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : कोपरगाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणुक काल शुक्रवारी पार पडली. या निवडणुकीत कोल्हे गटाचे उपसरपंच पदाचे उमेदवार सोमनाथ बहिरु फपाळे यांचा दोन मताने पराभव करत महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे शिवाजी कारभारी जाधव हे विजयी झाले. निवडणूक अधिकाऱ्यांनी उपसरपंच म्हणून त्यांना विजयी घोषित केले. निवडणूक प्रक्रियेचे कामकाज सार्वजनिक बांधकाम विभागाचे शिंदे यांनी पाहिले. तर त्यांना ग्रामसेवक बाबासाहेब गुंड यांनी मदत केली. निवड प्रक्रिया सरपंच रवींद्र आगमन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.शिवसेनेचे नेते नितिनराव औताडे, जिल्हा परिषद सदस्य कारभारी आगवन, काळे कारखान्याची माजी संचालक संजय आगवन यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. आमदार आशुतोष काळे व शिवसेना नेते नितीनराव औताडे यांना मानणारा मोठा वर्ग करंजी मध्ये असल्याने ही महाविकास आघाडी गावात स्थापन करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काळे गटाचे पाच तर शिवसेना पक्षाचे दोन सदस्य निवडून आले आहेत. उपसरपंच पदासाठी शिवाजी जाधव हे विजयी झाल्याने त...

बक्तरपूर, बहादरपूर, डाऊच बु., आणि करंजीचे उपसरपंचपदही काळे गटाकडे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० :  कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जनतेतून निवडून आलेल्या आ.आशुतोष काळे गटाच्या बक्तरपूर, बहादरपूर, डाऊच बु.च्या सरपंच पदाबरोबरच या ग्रामपंचायतीचे उपसरपंचपदही काळे गटाकडे आले असून करंजीचे उपसरपंचपद देखील काळे गटाने ओढून आणले आहे. २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जनतेतून निवडून आलेले सर्वाधिक १६ सरपंच आ. आशुतोष काळे गटाचे आहेत. या सर्व ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांची निवडणूक प्रक्रिया २९,३०,३१ डिसेंबर रोजी तीन टप्यात होत असून गुरुवार (दि.२९) झालेल्या १२ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांपैकी सर्वाधिक ८ उपसरपंच आ.आशुतोष काळे गटाचे निवडून आले आहेत. दुसऱ्या टप्यात देखील पार पडलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत बक्तरपूर, बहादरपूर, डाऊच बु. व करंजीचे उपसरपंचपद आ.आशुतोष काळे गटाकडे आले आहे. यामध्ये बक्तरपूरच्या उपसरपंचपदी सौ.कमलाबाई काशिनाथ सानप, बहादरपूरच्या उपसरपंचपदी रामनाथ रखमा पाडेकर, डाऊच बु. उपसरपंचपदी भिवराज मार्तंड दहे यांची निवड झाली असून करंजीच्या उपसरपंचपदी शिवाजी कारभारी जाधव यांची निवड झाली आहे. याबरोबरच आ.आशुतोष काळे गटाकडे २७ ग्रामपंचायतीच्य...

समृध्दी महामार्गाच्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीला सुरवात

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० :  तालुक्यातून गेलेल्या नागपुर मुंबई या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते खराब झालेले आहे. सदरचे रस्ते तातडीने दुरुस्त करण्याची आवश्यक्ता असून ही कामे मार्गी लावण्यासाठी भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिका-यांसमवेत बैठक घेतली. तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्यांची कामे सुरू करण्याच्या यावेळी सुचना दिल्या.            राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील समृद्धी महामार्गाचे काम नागपूर ते कोपरगाव पर्यंत पुर्ण झाले त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केले. या  मतदार संघातील 11 गावातून गेलेल्या 29 कि.मी. अंतराचा रस्ता तयार होत आहे. त्यामुळे समृध्दी महामार्गाच्या परिसरातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली असल्याचे सौ कोल्हे यांनी पालकमंत्री व संबंधित अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले होते, महामार्गाच्या कामासाठी लागणा-या साहित्याची वाहतुक करताना परिसरातील रस्त्यांचे मोठया प्रमा...

देशाच्या सुपुत्राचे मातृत्व हरपले - स्नेहलता कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३० : मातोश्री हिराबेन दामोदरदास मोदी यांच्या निधनाने भारत देशाचे सुपुत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मातृत्व हरपले अशा शब्दात भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे यांनी श्रध्दांजली वाहिली. कोपरगांव शहर व तालुका भारतीय जनता पक्ष तसेच संजीवनी उद्योग समुह, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यावतीने शहरातील गुरुद्वारा रोडवरील पक्ष कार्यालयात. स्व. हिराबेन मोदी यांना श्रध्दांजली वाहण्यांत आली त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.   कोल्हे पुढे म्हणाल्या की, २०१४ आणि २०१९ लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतृत्व स्विकारून भारत देशाला जागतिक पातळीवर सर्वोच्च सन्मान मिळवून दिला त्यामागे मातोश्री हिराबेन यांचा समर्थ आर्शिवाद होता. आईचे स्थान प्रत्येकासाठी अलौकीक असून मातोश्री हिराबेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेली शिकवण गौरवपुर्ण आहे. त्यांच्या निधनाने आपण सुसंस्कारीत मातृत्वाच्या नेतृत्वाला हरपलो आहोत असे त्या म्हणाल्या.             याप्रसंगी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, तालुकाध...

ठोळे उद्योग समुहाचे वतीने कोनपा शाळेला एलसीडी भेट

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : आजकाल कौटुंबिक आर्थिक समस्या वाढल्याने शालाबाह्य मुलांची समस्या निर्माण झाली आहे. शालेय शिक्षण घेणारी अनेक विद्यार्थी शाळा सोडून आर्थिक उत्पन्नासाठी रोजगार करताना वा ईतर मार्गाने कुटुंबास आर्थिक मदत करताना दिसतात. शालाबाह्य मुलांची गळती रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत असे विचार कैलास ठोळे यांनी व्यक्त केले.      ठोळे उद्योग समुहाचे वतीने कोपरगाव नगरपालिका शाळा नंबर एक साठी एल सी डी प्रदान समारंभ आयोजित केला होता. स्वागत ऊपशिक्षीका भालेराव यांनी केले. प्रास्ताविक विजय बंब यांनी केले. शाळेच्या वतीने जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या अध्यक्षा सौ सुधा भाभी ठोळे यांचा, कैलास ठोळे यांचा, जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या सभासदांचा सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापिका सौ तरवडे ( बिबवे ) यांनी शाळेच्या ऊपक्रमाची माहिती दिली. समारंभासाठी लायनेस क्लबच्या माजी अध्यक्षा शोभना ठोळे, दिपा ठोळे, जेष्ठ नागरिक सेवा मंचचे उपाध्यक्ष दत्तोपंत कंगले, वसंत तात्या आव्हाड, उत्तम भाई शहा, सुवालाल भंडारी, हभप जगन्नाथ महाराज थोरे, पेंटर दारुवाला, संजय को-हाळकर, सुभाष जोशी, माजी उपनगराध्यक्षा मिन...

साकरवाडी येथील सोमैया विद्या मंदिरमध्ये रोबोटिक्सचे प्रशिक्षण

कोपरगाव प्रतिनिधी, दि.३० : रोबोटिक्स हा आता केवळ भविष्याचा सिद्धांत राहिलेला नाही, तर तो सध्याच्या आपल्या वास्तवाचा एक भाग बनलेला आहे. विविध उद्योगांमध्ये त्याच्या विविध उपयोगांव्यतिरिक्त, रोबोटिक्स हे एक नाविन्यपूर्ण शिक्षण साधन आहे जे अधिकाधिक लक्षणीय होत चालले आहे. रोबोटिक्स शिक्षणामध्ये परिवर्तन घडवून आणू शकते तसेच विद्यार्थ्यांसाठी एक अनुकूल वातावरण तयार करू शकते ज्यामुळे STEM पद्धतीचे शिक्षण घेण्यास विद्यार्थ्यांना सहज सोपे होते. हाच उत्तम विचार प्रत्यक्षात साकारण्यासाठी तसेच सोमैया ट्रस्ट चे माजी अध्यक्ष स्व.डॉ. शांतीलाल करमशी सोमैया यांच्या १३ व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या विचारांची पुनरावृत्ती करण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील  साकरवाडी वारी येथील सोमैया विद्या मंदिर व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना सोमैया विद्याविहार ट्रस्ट अंतर्गत असलेल्या के. जे. सोमैया इन्स्टिटयूट ऑफ इन्फॉर्मशन टेकनॉलॉजि, मुंबई यांच्यातर्फे १५ व १६ डिसेंबर रोजी दोन दिवशीय कार्यशाळा भरवून रोबोटिक्सचे प्रशिक्षण देण्यात आले. स्व.डॉ. शांतीलाल सोमैया यांच्या विचारांच्या नुसार प्रत्येक खाजगी क्षेत्र...

सृष्टी निर्मितीची स्त्रीला मिळालेली दैवी देणगी - राजश्री मालेगावकर

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : स्त्रीच्या मासिक पाळीतूनच गर्भधारणा होऊन सृष्टी उभी राहू शकते. असे असतानाही मासिक पाळीला प्रॉब्लेम, अडचण, विटाळ असे शब्द वापरले जातात. ही शब्द योजनाच मासिक पाळीविषयीचा दूषित दृष्टिकोन दाखविणारी आहे. खरे तर, स्त्रीला मिळालेली सृष्टी निर्मितीची शक्ती व त्यासाठी आवश्यक मासिक पाळी म्हणजे स्त्रीला नवनिर्मितीची मिळालेली दैवी देणगीच आहे” असे प्रतिपादन सम्राट फाउंडेशनच्या अध्यक्ष आणि सोशल अवेअरनेस मिशनच्या राजश्री मालेगावकर यांनी केले.           येथील एस.एस.जी.एम. कॉलेजमध्ये नुकताच ‘महिला कल्याण व  स्त्री सबलीकरण’ आणि ‘अंतर्गत तक्रार निवारण समिती’ द्वारे आयोजित ‘महिला आरोग्य  जागृती’ कार्यक्रम संपन्न झाला. त्याप्रसंगी मालेगावकर बोलत होत्या. विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना त्यांनी पुढे सांगितले की, महिलांची तडजोडवादी वृत्तीच त्यांना स्वतःकडे दुर्लक्ष करायला शिकविते. परिणामी महिला वेगवेगळ्या आजारांना बळी पडतात. सध्या महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण अधिक असून अशा आजारांची लागण महिलांमध्ये विषाणूंमधून होते. त्यात सॅनिटरी पॅडच्या वापराचा मोठा ...

पाहिल्या टप्यात बारा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडी संपन्न

शेवगाव प्रतिनिधी, दि. २९ : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पाहिल्या टप्यात झालेल्या बारा ग्रामपंचायतीच्या  उपसरपंच पदाच्या निवडी आज झाल्या. यात बारा पैकी १० पंचायतीमध्ये उपसरपंच पदाच्या निवडी बिनविरोध झाल्या.  फक्त दोन ठिकाणी उपसरपंच पदासाठी उमेदवारांना निवडणुकीला सामोरे जावे लागले. यावेळी जनतेतून झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत १२ पैकी दहा ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच निवडून आल्या तर आज पार पडलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत १२ पैकी सहा ग्रामपंचायतीत महिला उपसरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. या निवडणुकीवरून आता महिला गावकीच्या राजकारणात सक्रीय झाल्याचे अधोरेखित झाले.        अमरापूर ग्रामपंचायतीत भाजपाच्या महिला तालुका अध्यक्षा आशाताई गरड यांनी सरपंचपदासह सदस्यपदी अशा दोन्ही ठिकाणी चांगल्या मतांनी विजय मिळविला. त्यांनी निकालानंतर लगेच सदस्यत्वाचा राजीनामा दिला. उर्वरित ९ सदस्य दोन गटाचे असल्याने येथे उपसरपंचपदासाठी दुरंगी लढत झाली. त्यात गणेश बोरुडे विजयी झाले. त्यांना सहा मते मिळाली तर विरोधी उमेदवार समीर रफिक शेख यांना चार मते मिळाली. एक मत बाद झाले. सरपंच आशाताई गरड यांचे अध्...

१२ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीत सर्वाधिक काळे गटाचे ८ उपसरपंच बिनविरोध

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नुकत्याच पार पडलेल्या २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जनतेतून सर्वाधिक १६ सरपंच आ. आशुतोष काळे गटाचे निवडून आले आहेत. या सर्व ग्रामपंचायतीपैकी १२ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांची निवडणूक नुकतीच पार पडली असून यामध्ये सर्वाधिक काळे गटाच्या ८ उपसरपंचांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यामध्ये माहेगाव देशमुख, कोळपेवाडी, भोजडे, सडे, रांजणगाव देशमुख, वडगाव, मोर्विस, शहापूर, शिंगणापूर, वेस-सोयगाव, पढेगाव, खिर्डी गणेश या गावांच्या उपसरपंच पदाची निवडणूक नवनिर्वाचित सरपंचांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणुकीत काळे गटाचे बिनविरोध निवडून आलेले उपसरपंच पुढील प्रमाणे – माहेगाव देशमुख-भास्करराव किसनराव काळे, कोळपेवाडी-आण्णा रखमा कोळपे, भोजडे-वाल्मिक शंकर सिनगर, सडे-अनिल गणपत बारहाते, रांजणगाव देशमुख- त्रिंबक रामभाऊ वर्पे, वडगाव-प्रवीण सुखदेव कांगणे, मोर्विस-पंडित पोपट पगारे, शहापूर-सागर किसन घारे हे ८ उपसरपंच आ. आशुतोष काळे गटाचे निवडून आले आहेत. या सर्व उपसरपंचांचे माजी आमदार अशोकराव काळे, आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस...

२६ ग्रामपंचायत पैकी १२ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांची निवडणूक संपन्न

सरपंचाच्या विशेष अधिकाराला आले महत्व कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : तालुक्यातील २६ ग्रामपंचायत  पैकी १२ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांची निवडणूक आज पार पडली असून यामध्ये आमदार आशुतोष काळे गटाचे सर्वाधिक सात उमेदवार उपसरपंचपदी बिनविरोध निवडून आले. माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवानेते विवेक कोल्हे यांच्या गटाचे तीन, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे व अपक्ष यांचे प्रत्येकी एक उपसरपंच निवडून आले.  जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या   २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकी संपन्न झाल्या. येत्या तीन दिवसामध्ये विविध ग्रामपंचायत उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आज १२ ग्रामपंचायतचे नूतन सरपंचाच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणुक झाली. बहुतांश ठिकाणी उपसरपंच बिनविरोध निवडून आले आहे. नवनिर्वाचित सरपंचांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. आमदार आशुतोष काळे गटाचे बिनविरोध निवडून आलेले उपसरपंच ग्रामपंचायत निहाय पुढीलप्रमाणे माहेगाव देशमुख- भास्करराव किसनराव काळे, कोळपेवाडी-आण्णा रखमा कोळपे, भोजडे-वाल्मिक शंकर सिनगर, सडे-अनिल गणपत ब...

रुग्णवाहिका उपलब्ध करून जनसेवा करणारी पोहेगांव ग्रामपंचायत आदर्शवत - इंदुरीकर

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२९ : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना तळागाळाच्या नागरिकापर्यंत पोहोचविण्याचे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नितीनराव औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीस वर्षापासून पोहेगावांत अविरत चालू आहे. त्यामुळेच येथे विकास कामे पाहायला मिळत आहे. पोहेगांव पंचक्रोशीतील रुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी ग्रामपंचायतीने रुग्णवाहिका खरेदी करत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. तालुक्यात रुग्णवाहिका खरेदी करणारी ही एकमेव आदर्शवत ग्रामपंचायत आहे असे प्रतिपादन समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले.ते कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे श्री झोटिंग बाबा मंदिर परिसरात रुग्णवाहिकेचे लोकार्पण करताना बोलत होते. पंचायत समिती सदस्य बाळासाहेब रहाणे यांनी १५ वा वित्त आयोग सन.२०२१-२२ (पं.स.स्तर) चे स्थानिक विकास निधीतून जी रक्कम उपलब्ध करून दिली होती त्यात  ग्रामपंचायतीने स्व निधी वापरून जनसेवेसाठी जवळपास नऊ लाख रुपये किंमतीची रुग्णवाहिका खरेदी केली. तिचे लोकार्पण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते नितीनराव औताडे, प.स.सदस्य बाळासाहे...

एक दिवस घरकुलासाठी अभियाना अंतर्गत १७८३ लाभार्थ्यापर्यंत पोहोचले प्रशासन

शेवगावात प्रभावी अमंलबजावणी प्रारंभ : गटविकास अधिकारी डोके शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : राज्य शासनाचे ‘अमृत महा आवास अभियान ‘शेवगाव पंचायत समितीनेअत्यंत प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार केला असून त्या अंतर्गत पंचायत समितीच्या वतीने ‘एक दिवस घरकुलासाठी’ उपक्रम आज बुधवारी ( दि.२७ ) सुरू करण्यात आला. या दिवशी पंचायत समितीचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळता इतर सर्व अधिकारी, कर्मचारी तालुक्यातील सर्व ९४ ग्रामपंचायतमध्ये  भेट देऊन लाभार्थ्यांसी संवाद साधला. गटविकास अधिकारी महेश डोके यांनी स्वतः लाभार्थी मेळावे व सभा घेतल्या. वैयक्तिक भेटी देऊन घरकुल बांधकाम तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. आज तालुक्यातील ९४ ग्राम पंचायतीमधील घरकुलाची अपूर्ण कामे असणार्‍या प्रधान मंत्री आवास योजनेच्या एक हजार ३८१ लाभार्थी, रमाई आणि  शबरी आवास योजनेच्या एकूण ४०२ असे दोन्ही मिळून एकूण एक हजार ७८३ लाभार्थ्यां पर्यन्त एकाच दिवशी प्रशासन पोहचले.      लाभार्थ्यांसी संवाद साधला असता घरकुल मंजूरी नंतर मिळालेला हप्ता घेवून तो इतरत्र अन्य कामांसाठी खर्च करण्यात आल्याचे प्रमाण जास्त असल्याने घरकु...

शिबिरार्थीच्या संस्कारांने शिस्त व धाडसाचे घडविले दर्शन

शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ :  शेवगावात नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण नगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आयोजित तीन दिवसीय हेमंत (हिवाळी ) शिबिराने शेवगावकरांच्या डोळ्याचे पारणे फेडले तसेच संस्काराने काय घडू शकते हे बालगोपाल शिबीरार्थीच्या शहरात झालेल्या  पथ संचलनाच्या शिस्तीने  व त्यानंतरच्या साहसी खेळाद्वारे अवघ्या तीनच दिवसात निर्माण झालेल्या धाडसाचे प्रत्यंतर घडले.       शिबिराच्या शेवटच्या दिवशी शिबिरार्थीनी शहरातून शिस्तबद्ध शानदार पथसंचलन केले. शिबिर स्थळापासून निघालेल्या या संचलनात  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे २५ बुलेट स्वार पदाधिकारी व ज्येष्ठ स्वयंसेवक अग्रभागी होते. त्यांच्या मागे शिबिरार्थी व अन्य स्वयंसेवक होते. त्यामागे दिमाखदार  घोष पथक व घोडेस्वार व उंट स्वार स्वयंसेवक आणि सजविलेला भगव्या ध्वजाचा रथ होता, असे लहान थोर मिळून अडीच हजारावर स्वयंसेवकांचे दीड किलोमीटर लांबीचे  पथसंचलन संघाच्या गणवेशात, घोषाच्या तालात शिस्तबद्ध पुढे सरकत होते .तीन तासानंतर संचलन शिबीर स्थळी पोहोचले. शहरातून पथसंचलन  होत असताना शेवगावकरांनी या स्वयंसेवकावर ठिकठिकाणी पुष्प वृष्टी करून त्याचे स्वागत केले. स...

उपसरपंच पदाच्या निवडीसाठी चुरस

शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ :   तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून झाली. त्यामुळे त्या अत्यंत चुरशीच्या  झाल्या. या निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्वाधिक ७, भारतीय जनता पक्षाने ३, तर जन शक्ती विकास आघाडी व अपक्षाने एकेका ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर विजय मिळविला. आता आज  गुरुवारी (दि.२९ ) या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडी होणार असल्याने काही ठिकाणी चुरस निर्माण झाली आहे.         तालुक्यातील दहीगाव ने, खानापूर, आखेगाव, अमरापूर, जोहरापूर, रांजणी, भायगाव, खामगाव, सुलतानपूर खुर्द, रावतळे–कुरुड्गाव, वाघोली व प्रभूवाडगाव या १२ ग्रामपंचायतीपैकी आखेगाव, अमरापूर व खामगाव  या ग्रामपंचायतीमध्ये  सरपंच  एका मंडळाचे तर सदस्य  दुसऱ्या मंडळाचे निवडून आल्याने या ठिकाणी उपसरपंच पदाच्या निवडणुकीला विशेष महत्व आहे. उपसरपंचाच्या निवडी सरपंचाच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून संबधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे सहाय्यक म्हणून काम पाहणार आहेत. तसेच या निवडणुकांसाठी प्रत्येक गावी निवडणूक विभागाने निरीक्षकांच्या नियुक्त्या ...

विरोधकांचा अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याचा अतिउत्साह जनतेसमोर उघड - महेश परजणे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२८ : भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच कोपरगाव तालुक्यातील ३४१८ कर्जदार शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारच्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळाले आहे. याबाबतीत विरोधकांनी चुकीच्या बातम्या प्रसिध्द करून फुकटचे श्रेय घेऊ नये. विनाकारण कागदपत्र जमा करण्याचे संदेश पसरून शेतकरी आणि जनतेत संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न करणारे लोकप्रतिनिधी आणि त्यांचे लाभार्थी यांनी खरे अज्ञान कुणाचे हे आता उघड झाले आहे त्यामुळे भविष्यात असे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याचा अतिघाईचा प्रकार विरोधकांनी करू नये असा टोला संवत्सर ग्रामपंचायतचे सदस्य महेश परजणे यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे यांना नाव न घेता लगावला आहे. दिलीपराव बोरनारे यांनी विवेक कोल्हे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संवत्सरचे ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आमदार आशुतोष काळे यांना एकही...

संजीवनीच्या सार्थकची राष्ट्रीय पातळीवरील तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २८ : संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सार्थक निलेश बडजाते याने तलवारबाजीच्या इप्पी या प्रकारात प्रथम जिल्हा व नंतर विभागीय पातळीवर यश संपादीत करत थेट जम्मु-काश्मिर मध्ये घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय  पातळीवरील आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी व तलवारबाजीचे कौशल्य दाखविण्यासाठी सज्ज झाला आहे, अशी माहिती संजीवनी अभियांत्रिकीच्या महाविद्यालयाच्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. सार्थकने प्रथम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये श्रीरामपुर येथिल स्पर्धेत यश मिळविले व त्यानंतर पुणे येथे आबासाहेब गरवारे महाविद्यालयात घेण्यात आलेल्या विभागीय स्पर्धेमध्येही यश संपादन करून पुणे विद्यापीठ अखत्यारीतील सर्व प्रकारच्या महाविद्यालयांमधुन अव्वल स्थान मिळवुन सा. फु. पुणे विद्यापीठात बहुमान मिळविला. सद्य परीस्थितीत सा.फु. पुणे विद्यापीठाचा कार्यविस्तार पुणे, अहमदनगर व नाशिक  या तीन जिल्ह्यात  असुन सुमारे ७०५ असे पारंपारीक व व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या  संलग्नीत संस्था...

सोनारी पाणी पुरवठा योजना कामाचे स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

 कोपरगांव प्रतिनिधी, दि. २८ : तालुक्यातील सोनारी येथील ८७ लाख रूपये खर्चाच्या जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजनेचे भूमिपुजन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते बुधवारी संपन्न झाले. अध्यक्षस्थानी मोहन शेलार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर जल योजनेची कोपरगांव विधानसभा मतदार संघात परिपुर्ती होत असल्याचे सौ. कोल्हे यावेळी बोलताना म्हणाल्या.            प्रारंभी धोंडीबा कारभारी सांगळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सरपंच सौ. शालिनी ब्रदीनाथ सांगळे यांनी प्रास्तविकात सदर योजनेच्या कामाची माहिती दिली. ग्रामविकास अधिकारी भानूदास दाभाडे यांनी सोनारी ग्रामपंचायतीमार्फत केलेल्या विकास कामांची माहिती दिली. उपस्थित मान्यवरांचा सोनारी ग्रामस्थांनी सत्कार केला. गणेश कुटे, धारणगांवचे सरपंच दिपक चौधरी यांची यावेळी भाषणे झाली.    कोल्हे पुढे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोपरगांव विधानसभा मतदार संघातील वारी कान्हेगाव, कोळपेवाडी, कुमारी, जेउरकुमारी, सुरेगांव, मळेगांवचडी, मायगांवदेवी, शिंगणापुर, रांजणगांव देशमुख व सहा गांवे, धारणगांव...

केंद्रीय शिक्षक सखाहरी मेहेखांब यांचे निधन

शनिवार ३१ डिसेंबर २०२२ रोजी जलदान विधी   कोपरगाव प्रतिनिधी दि.२८: कोपरगाव तालुक्यातील सुरेवगाव येथील केंद्रीय क्रीडा शिक्षक सखाहरी ञ्यंबक मेहेरखांब यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने सोमवारी नाशिक येथे निधन झाले. स्व.सखाहरी मेहेरखांब यांनी देशभरातील हजारो विद्यार्थांना विविध खेळांचे धडे शिकवून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पटलावर चमकावले आहेत. तालुक्यातील नामवंत क्रीडा शिक्षकापैकी एक असलेल्या सेवा निवृत्त क्रिडा शिक्षकाच्या निधनाची माहीती कळताच पंचक्रोशीतील नागरीकांनी शोक व्यक्त केला. स्व. सखाहरी मेहेरखांब यांच्या पाश्चात दोन मुलं, चार मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे. पञकार सिध्दार्थ मेहेरखांब यांचे ते वडील होते. स्व. मेहेरखांब यांच्या निधनाबद्दल आमदार आशुतोष काळे, माजी आमदार अशोकराव काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते स्नेहलता कोल्हे, पंचाय समितीच्या माजी सभापती पौर्णिमा जगधने, पञकार संघाचे अध्यक्ष प्रा. साहेबराव दवंगे यांनी शोकव्यक्त केला आहे. शनिवार दि. ३१ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ९.३० वा. मेहेरखांब वस्ती सुरेगाव रोड, ता. कोपरगाव येथे जलदान विधी संपन्न होणार आहे.

कोपरगाव शहराचा पाणी पुरवठा होणार सुरळीत – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : काही दिवसांपासून कोपरगाव शहराचा विस्कळीत झालेला पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी पाटबंधारे विभागाला तातडीने आवर्तन सोडण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या सूचनेनुसार ठरलेल्या वेळापत्रकाच्या पाच दिवस अगोदरच गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांना आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोपरगाव शहराचा विस्कळीत झालेला पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. आमदार काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मागणी केल्याप्रमाणे गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांना एक रब्बी व तीन उन्हाळी आवर्तन देण्यात येणार आहे. यातील पाहिले आवर्तन हे १ जानेवारी रोजी सोडण्यात येणार होते. मात्र कोपरगाव शहरातील विस्कळीत झालेल्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना विशेषतः महिला भगिनींना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे लवकरात लवकर आवर्तन सोडण्याच्या केलेल्या सूचनेनुसार बिगरसिंचनासाठी व सिंचनासाठीचे आवर्तन मंगळवार (दि.२७) रोजी पाच दिवस अगोदरच डाव्या-उजव्या कालव्यांना सोडण्यात आले आहे.  आवर्तन सुरु असतांना कोपरगाव नगरपरिषदेने व आवर्तनावर अवलंबून असणाऱ्या...

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या लढ्याला आमदारांचे बळ - कोयटे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : पतसंस्थांसमोरील विविध प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी सोमवारी सर्वपक्षीय आमदार एकवटले. अधिवेशनासाठी उपस्थित सुमारे १५ आमदारांनी या प्रश्नावर तातडीने लक्षवेधी मांडण्याचा निर्णय घेत या चळवळीला बळ देण्याचा निर्धार केला.   महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत पतसंस्था चळवळीशी संबंधित १५ आमदारांची बैठक सोमवारी सायंकाळी नागपूर येथे पार पडली. या बैठकीला माजी विधानसभाध्यक्ष आमदार हरिभाऊ नाना बागडे, आमदार सुभाषबापू देशमुख (सोलापूर), आमदार प्रकाश आबिटकर (राधानगरी), आमदार आशुतोष काळे (कोपरगाव), आमदार सौ. श्वेताताई महाले (चिखली), आमदार सुभाष धिटे (राजुरा), आमदार अतुल बेनके (जुन्नर), माजी आमदार शरद सोनवणे, आमदार विकासभाऊ कुंभारे (नागपूर), माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार कृष्णाभाऊ खोपडे (नागपूर), आमदार प्रताप अडसड (अमरावती), आमदार अॅड. अभिजित वंजारी (नागपूर), आमदार रणधीर सावरकर (अकोला), आमदार डॉ. सुधीर तांबे (संगमनेर) उपस्थित होते. फेडरेशनच्या वतीने काकासाहेब कोयटे, माजी कार्याध्यक्ष राजुदास ...

कोपरगाव जनावरांच्या बाजारात १० लाखाची उलाढाल - नानासाहेब रणशुर

 लम्पी आजाराच्या धसक्यानंतर भरला बाजार  कोपरगाव प्रतिनिधी दि.२८ : करोनाने माणसांचे आरोग्य धोक्यात आणल्यामुळे दोन वर्षे लाॅकडाऊन करुन जनजीवन विस्कळित झाले होते. त्यानंतर जनावरामध्ये लम्पी आजाराने थैमान घातल्याने जनावरांचा जीव धोक्यात आला होता, तर पशुधनावर अवलंबून असलेल्यांचे आर्थीक गणित बिघडले होते. गेल्या तीन महीण्यापासुन जनावरांचा आठवडी बाजार संसर्गामुळे बंद ठेवल्याने जनावरांच्या खरेदी विक्रीची उलाढाल ठप्प झाली होती. अखेर २६ डिसेंबर रोजी कोपरगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्यावतीने जनावरांचा बाजार सुरू केल्यानंतर पहील्याच बाजारात तब्बल १८० जनावरांची आवक होवून त्यात ७५ जनावरांची खरेदीविक्री झाली. या झालेल्या व्यवहारातुन  सरासरी १० लाखाची आर्थीक उलाढाल झाल्याची माहीती. कोपरगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशुर यांनी दिली. रणशुर पुढे म्हणाले. लम्पी आजाराच्या प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून जनावरांचा आठवडे बाजार शासकीय नियमाप्रमाणे बंद करण्यात आला होता. सध्या संसर्ग कमी झाल्यामुळे पुन्हा शासनाच्या निर्णयानुसार बाजार सुरु केला. माञ विक्रीसाठी आलेल्या जनावरांची...

प्रभाग ५ मधील शिवकालीन ‘वेस’ चे नुतनीकरण करावे - राष्ट्रवादीची मागणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : ऐतिहासिक, पौराणिक वारसा असलेल्या कोपरगाव शहरातील प्रभाग क्र. ५ मधील ‘वेस’ ची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून या ‘वेस’ चे कोपरगाव नगरपरिषदेने शिवकालीन पद्धतीचे बांधकाम करून नुतनीकरण करावे. अशी मागणी आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. दिलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, कोपरगाव शहरातील प्रभाग क्र. ५ मध्ये कोपरगाव शहरातील मानाची व धार्मिक महत्व असलेल्या पुरातन ‘वेस’ ची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी या वेसचे शिवकालीन पद्धतीचे बांधकाम करण्यात यावे अशी प्रभाग ५ मधील नागरिकांची मागणी आहे. त्या मागणीचा विचार करून तातडीने या ‘वेस’ चे काम सुरु करावे असे म्हटले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, रमेश गवळी, कृष्णा आढाव, फकीर कुरेशी, दिनकर खरे, ...

पत्रकार आगळे यांच्यावर कोयत्याने वार

शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ : तालुक्यातील भायगाव येथील वहिवाटीच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता खुला करण्यासंदर्भात शेवगावचे तहसीलदार छगनराव वाघ यांचे समोर दाखल असलेल्या दाव्याच्या पुढील सुनावणीच्या तारखेला उपस्थित राहू नये अन्यथा तुमचे बरे वाईट करू. आमच्या नादी लागल्यास एकेकाचा खून करू अशी धमकी देऊन कोयत्याने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील भायगाव येथे घडली. शेवगाव पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे.           या संदर्भात अधिक माहिती अशी की, पत्रकार शहाराम चंद्रभान आगळे ( वय ३९ रा. भायगाव ) यांनी बाबूराव लक्ष्मण सामृत, विजय बाबुराव सामृत यांनी काठीने व कोयत्याने मारहाण केल्याची, तुमचे बरेवाईट करु अशी तक्रार दाखल केली आहे. आगळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आम्हाला आमचे शेतातील घरी व शेतात जाण्यासाठी विजय बाबुराव सामृत यांचे शेताचे बांधावरून जाण्यासाठी रस्ता आहे. परंतु आम्हाला रस्त्यावरून जाणे साठी सामृत नेहमी आमच्याशी वाद घालत असतो. त्यामुळे आम्ही तहसीलदार यांचेकडे कायदेशीर रस्ता मिळावा यासाठी अर्ज केला असून सध्या त्यांची कार्यवाही चालू आहे.    ...

राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा आयोजनाचा समताला मान - संदीप कोयटे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : महाराष्ट्रात समता पॅटर्नने शैक्षणिक दृष्ट्या उंच भरारी घेतली आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांनी यात यशाची शिखरे गाठलेली आहे. शैक्षणिक क्षेत्रात घेत असलेल्या या उंच भरारी बरोबरच शारीरिक दृष्ट्या विविध क्रीडा प्रकाराच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना सक्षम बनवत आहोत. समताच्या अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध खेळांचे नेतृत्व केले असून त्यात करिअर ही केले आहे. भारतीय जम्प रोप असोसिएशनच्या वतीने घेण्यात येत असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा आयोजनाचा मान समता इंटरनॅशनल स्कूल ला मिळालेला आहे. त्यामुळे देशातील खेळाडू कोपरगावात येऊन समताला भेट देणार आहे. ही स्पर्धा अहमदनगर जिल्ह्यात पहिल्यांदा होत असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा जम्प रोप असोसिएशनचे अध्यक्ष संदीप ओमप्रकाश कोयटे यांनी दिली.     समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व.मोहनलाल आनंदराम झंवर सभागृहात अहमदनगर जिल्हा जम्प रोप असोसिएशनचे अध्यक्ष संदीप कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला भारतीय जम्प रोप असो.चे समन्वयक अशोक दुधारे, महाराष्ट्र जम्प रोप असो.चे सरचिटणीस दि...

शेवगावात एक दिवस घरकुलासाठी

शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ : बेघरांना घरकुल देणाऱ्या विविध योजना राबविल्या जातात. त्यातील अनेक घरकुले अपूर्ण अवस्थेत राहत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने अपूर्ण घरकुले लवकर पूर्ण व्हावीत म्हणून, ‘सर्वांसाठी घरे २०२४ ‘हे धोरण शासनाने घेतले. या धोरणांतर्गत केंद्र पुरस्कृत विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात २० नोव्हेंबर २२ ते ३१ मार्च २३ या कालावधीत ‘महा आवास ग्रामीण’ हे अभियान राबविण्यात येत आहे.       या अभियानान्तर्गत पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना याशिवाय इंदिरा आवास  योजने मधील जी घरकुले अपूर्ण आहेत, अशा संबंधित लाभार्थ्यांची भेट घेऊन, प्रत्यक्ष घरकुलाची पाहणी करायची असून  ३१ मार्च २३चे आत सर्व घरकुल पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करावयाचे आहे.       शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी पंचायत समितीच्या सर्व सहकाऱ्यासह ‘आवास दिवस एक दिवस घरकुलासाठी ‘उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी पंचायत समिती मधील संपूर्ण स्टाफ हा अपूर्ण घरकुल पाहणीच्या...

कोपरगावकरांना गढुळ पाणीसुध्दा वेळेवर मिळत नाही

धरणं काठोकाठ भरले तरी कोपरगावकरांना आठवड्यातुन एकदाच पाणी कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : शोषित कोपरगावच्या नागरीकांची कहानीच वेगळी आहे. देशाला स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्षे झाली. एका बाजुला शासनाच्यावतीने संपूर्ण देशात आजादी का अमृतमहोत्सव साजरा करुन आनंद साजरा केला जातोय. नागरीकांच्या मुलभूत गरजा पुर्ण करण्यासाठी नवनवीन योजनांचा पाऊस पाडला जात असताना कोपरगाव शहरातील नागरीकांना आजही केवळ पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय.  कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणारे सर्व धरणं काठोकाठ भरलेले असताना आजही आठवड्यातुन एकवेळ पिण्याचे पाणी मिळते हेच कोपरगावच्या नागरीकांचे दुर्देव आहे. कोणाचे चुकते कोणाचे बरोबर यावर बोलण्यापेक्षा कोणाच्या प्रयत्नातुन दररोज स्वच्छ पिण्याचे पाणी मिळते का याचा विचार कोपरगाव शहरातील नागरीक अधिक करीत आहेत.  सध्या आठ दिवसाड केवळ अर्धातास पाणी नळाला येत असल्याने नागरीकांना उन्हाळा येण्या आगोदरच घाम फुटला आहे. रोगराईचे प्रमाण वाढत आहे. साठवलेल्या दुषित पाण्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण दिल्यासारखे आहे. आठ दिवसाड पाणी मिळते तेही मुबलक नसल्याने नागरीकांची उन्हाळ्याच्या अगोदरच त...

सावळीविहीर ते कोपरगांव रस्ते कामास सुरूवात, नागरिकांनी मानले कोल्हेचे आभार

  कोपरगांव प्रतिनिधी, दि. २७ : केंद्रीय रस्ते वाहतुकमंत्री नामदार नितीन गडकरी यांनी वाहतुकीसाठी महत्वाचा असलेला नगर मनमाड महामार्गाच्या प्रत्यक्ष कामास सुरूवात केली त्याबददल कोपरगांव मतदार संघातील रहिवासी तसेच वाहनधारकांच्यावतीने मंत्री नितीनजी गडकरी व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांना धन्यवाद दिले आहेत.               नगर मनमाड महामार्गाची दुरावस्था इतकी भीषण झाली होती की दिवसेंदिवस अनेकांचे अपघात होऊन मृत्य घडत होते, शालेय विद्यार्थी व नागरिक हकनाक या रस्त्याचे बळी होत असल्याचे चित्र दूर करण्यासाठी सदर महामार्ग केंद्राकडे हस्तांतरण झाला व कामाला गती मिळाली. केंद्रीय रस्ते वाहतुकमंत्री नितीन गडकरी हे अहमदनगर येथे ऑक्टोंबर २०२१ रोजी आले असता त्यावेळी निवेदन देवुन नगर मनमाड महामार्गावर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे साईबाबा शिर्डी देवस्थानासह अन्य विविध धार्मिक ऐतिहासिक पर्यटकीय महत्वाची स्थानावर खड्डेमुक्त रस्ता तयार करावा म्हणून मागणी केली होती,त्याआधीही सौ.स्नेहलता कोल्हे यांनी वारंवार सदर महामार्ग दुरुस्ती बाबत आग्रही मागणी केली होती. य...

आपत्तीतील मदत कार्यामुळे समाज एकसंघ – सुर्यवंशी

जिल्ह्यात तयार होणार ५०० आपदा मित्र प्रशिक्षणास सुरूवात कोपरगाव  प्रतिनिधी, दि.२७ : आपत्तीच्या काळात मानवतेच्या दृष्टीकोनातून केलेली मदत समाजाला एकसंघ ठेवण्याचे काम करते. असे प्रतिपादन कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी केले. नवी दिल्लीच्या राष्ट्रीय व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने आयोजित ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रम कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रमात आयोजित करण्यात आला आहे. २६ डिसेंबर २०२२ ते ६ जोनवारी २०२३ पर्यंत चालणाऱ्या १२ दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन कोकमठाण येथील आत्मा मलिक ध्यानपीठ येथे सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा आप्पती व्यवस्थापन अधिकारी डॉ.विरेंद्र बडदे, अहमदनगर महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी शंकर मिसाळ, शिर्डीचे माहिती अधिकारी सुरेश पाटील, ‘यशदा’ पुणेचे मास्टर ट्रेनर योगेश परदेशी, कादर महाजन गिरिष उपाध्याय, लखन गायकवाड, राहूल शिरसाठ आदी याव...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेमंत शिबीराचा उत्साहात शुभारंभ

शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, दक्षिण नगर, आयोजित हेमंत (हिवाळी ) शिबिराचा शुभारंभ काल शुक्रवारी (दि. २३ )  येथील शेवगाव पाथर्डी रस्त्यावर उभारण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ नगर मध्ये सद्गुरु जोग महाराज संस्थानचे प्रमुख हभप राम महाराज झिंजुर्के यांच्या हस्ते  उत्साहात कारण्यात आला.       याप्रसंगी  शिबीर अधिकारी चंद्रकांत काळोखे, शिबीर कार्यवाह रणजीत सुराणा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे जिल्हा कार्यवाह वाल्मिकराव कुलकर्णी , यांचे सह अमोल आगाशे, पी. डी. कुलकर्णी, वेदक केळकर, अनुप कुलथे, ज्येष्ठ स्वयंसेवक जगदीश धूत, डॉ. नीरज लांडे पाटील, डॉ. कृष्णा देहाडराय व जिल्हयाच्या विविध भागातून आलेले बाराशे शिबीरार्थी उपस्थित होते.        यावेळी राम महाराज झिंजुर्के यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचा गौरव करून बालपणापासूनच प्रेत्येकाच्या मनात देशभक्ती आणि हिंदू धर्माचे प्रेम निर्माण करण्यासाठी या शिबिराचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला.      जिल्हा सहकार्यवाह दिनेश करंडे  यांनी शिबीराची सविस्तर  माहिती दिली.ज्या प्रमाणे आपल्या देशाचे सैनिक सिमेचे रक्षण करतांना ...

सावळीविहीर फाटा ते कोपरगाव रस्त्याच्या १९१ कोटीच्या कामास प्रारंभ – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ :  कोपरगाव विधानसभा मतदार संघातुन जात असलेल्या जुन्या अहमदनगर-मनमाड राज्यमार्ग सावळीविहिर पासून तोडण्यात येवून सावळीविहीर फाटा, कोपरगाव ते मनमाड या मार्गाला एन.एच.७५२ जी क्रमांक देण्यात आला आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या सावळीविहीर ते कोपरगाव पर्यंतच्या रस्त्याच्या कामास तातडीने सुरुवात करावी यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून या रस्त्याच्या १९१ कोटीच्या कामास प्रत्यक्षात प्रारंभ झाला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोपरगाव मतदार संघातील सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या जवळपास १० कि.मी. मार्गावर लहान-मोठे अनेक खड्डे पडल्यामुळे रस्त्याची चाळण होऊन सावळीविहीर फाटा ते कोपरगाव परिसरात अपघातांची संख्या वाढली होती. सावळीविहीर फाटा, कोपरगाव ते मनमाड या मार्गाला एन.एच.७५२ जी क्रमांक देण्यात आल्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी आ.आशुतोष काळे यांनी  केंद्रीय रस्ते विकास मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांची समक्ष भेट घेऊन व वेळोवेळी पाठपुरावा करून या रस्त्यासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्य...

बाल आनंद मेळाव्यातून विध्यार्थ्यामध्ये व्यवहार ज्ञान वाढते - परजणे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ :   तालुक्यातील संवत्सर येथिल जनता  इंग्लिश स्कूल मध्ये बाल आनंद मेळाव्याचे उदघाटन   शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मधुकर साबळे यांच्या हस्ते झाले. त्याचप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाट्न कार्यक्रच्या अध्यक्षा संवत्सरच्या सरपंच, सौ सुलोचना दिलीप ढेपले यांचे हस्ते दिपप्रज्वलन करून झाले. यावेळी उपसरपंच विवेक परजणे आपल्या भाषणात म्हणाले की, बाल आनंद बाजारात छोटासा बाजार तयार करून खरोखर विविध खाण्याचे पदार्थ व विविध भाजीपाला विक्री करण्याचे ज्ञान, व्यवहार या माध्यमातून कळतो. म्हणजेच मुले व्यवहारिक होतात. त्याचप्रमाणे मुलामुलींनी विविध सामुदायिक गीत सादर करून सर्वाना मंत्रमुग्ध केले. यातून मुलांना अभिनय व कलेची प्रेरणा मिळते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन पाटील संवत्सर सौ. लिनाताई विकास आचारी, स्थानिक सल्लागार समितीचे  सदस्य अशोक लोहकणे, विधिज्ञ शिरीष लोहकणे,  महेश परजणे पा.  मुकुंद काळे, बाळासाहेब बारहाते, युवराज शिंदे, मारुती लोखंडे, बापू तिरमखे, ज्योतीताई कोल्हे, पोपट बोरनारे, तुषार ससाणे, चांगदेव मैंद, कैलास पांडव, बबन भाकरे, बाबुराव माईन्ड, दिलीप ढेपले तसेच श...

ज्ञान माऊली इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव

महिला पालकांच्या क्रीडा स्पर्धेचा अनोखा फंडा शेवगाव प्रतिनिधी, दि .२३ :  येथील उमाचंद्र एज्युकेशन फाउंडेशन संचलित ज्ञानमावली इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये प्री प्रायमरी व प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी शालेय अंतर्गत वैयक्तिक तसेच संगीत स्पर्धा अशा विविध स्पर्धाचे नियोजन करण्यात आले. या तीन दिवसीय क्रीडा महोत्सवात आज शुक्रवारी शेवटच्या दिवशी महिला पालकांसाठी संगीत खुर्ची व लिंबू चमचा या स्पर्धांचे अनोखे आयोजन करण्यात आले.       यावेळी विद्यार्थ्यांनी उत्साह पूरक वातावरणामध्ये सहभागी होऊन विविध खेळांचा आनंद लुटला. क्रीडा महोत्सवाचा आज शुक्रवारी समारोप झाला. शेवटचा दिवस हा महिला पालकांसाठी ठेवण्यात आला. महिला पालकांसाठी संगीत खुर्ची व लिंबू चमचा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. क्रीडा महोत्सवात महिला पालकांना देखील सहभागी करुन घेण्याचा अनोखा फंडा येथे राबविव्यात आला. त्यास पालकवर्गाने उत्तम प्रतिसाद देऊन क्रीडा महोत्सवाची शोभा वाढवली. त्यानंतर  उपस्थित पालकांच्या हस्ते विजेत्या  खेळाडूंना बक्षीसे देऊन त्यांना सन्मानित करण्यात आल...

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा व्हॉलीबॉल संघ प्रथम

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २४ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत अहमदनगर जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने अहमदनगर येथे घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन मुलींच्या व्हालीबॉल सामान्यांमध्ये संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाने  प्रथम विजेते पद जिंकून क्रीडा क्षेत्रातही विजयी पताका कायम ठेवली, अशी  माहिती संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रसिध्दी पत्रकात दिली आहे. पत्रकात पुढे म्हटले आहे की अहमदनगर जिल्ह्यातील  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अखत्यारीतील विविध वरिष्ठ  महाविद्यालये, अभियंत्रिकी महाविद्यालये, फार्मसी महाविद्यालये, अशा  विविध महाविद्यालयांमधिल एकुण १५ संघांनी या जिल्हास्तरीय मुलींच्या व्हॉलीबॉल सामन्यांमध्ये सहभाग नोंदविला. अंतिम सामन्यात संजीवनीच्या संघाने एस.एस.जी.एम. कॉलेज, कोपरगांवच्या संघावर २-० सेटने विजय मिळविला, व जिल्ह्यात  अव्वल असल्याचे सिध्द केले. या संघामध्ये साईशा  अंबोरे, समिक्षा बाविसकर, दिशा  चंद्रे, ऋतुजा घनघाव,हर्षदा  दराडे, दर्शना  नागरे, उन्नती अव्हाड व ऋतुजा दरपेल यांनी उत्कृष्ट  खेळाचे प्रदर्शन केले. सर्व अहमदनगर जिल्ह्यातील  खेळा...

वारीच्या श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मंजूर – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : आमदार आशुतोष काळे यांनी मागील तीन वर्षात श्री क्षेत्र मयुरेश्वर गणपती देवस्थान पोहेगाव, श्री.लक्ष्मीमाता मंदिर देवस्थान कोकमठाण, श्री जगदंबा माता मंदिर देवस्थान ब्राम्हणगावया तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग दर्जा मिळविला आहे. यामध्ये कोपरगाव विधानसभा मतदार संघातील तालुक्याच्या पूर्व भागातील वारी व परिसराचे श्रद्धास्थान असलेल्या वारी येथील श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थानाचा देखील समावेश करण्यात आला असून श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.   कोपरगाव तालुक्यातील वारी व पंचक्रोशीतील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मिळावा व या तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा अशी भाविकांची मागणी होती. त्या मागणीची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मिळावा यासाठी शासनदरबारी प्रस्ताव दाखल करून त्याबाबत त्यांचा पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. शनिवार (दि.२४) रोजी  जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल मंत्...

युवराजांनी अपुरी माहिती प्रसिद्ध करू नये - दिलीपराव बोरनारे

अजूनही ६००० शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित  कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : प्रोत्साहनपर अनुदानापासून जवळपास ६००० शेतकरी वंचित असून त्यांना हे अनुदान मिळवून देण्यासाठी आ. आशुतोष काळे पाठपुरावा करीत असून त्यासाठी वंचित पात्र शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेतले जात आहे. मात्र याची पूर्ण माहिती नसणाऱ्या युवराजांनी अपुऱ्या माहितीच्या आधारावर चुकीच्या बातम्या प्रसिद्ध करू नये असा उपरोधिक सल्ला कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन दिलीपराव बोरनारे यांनी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांना नाव न घेता दिला आहे.  त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेवून नियमित कर्जफेड करणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ५० हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते. त्या निर्णयाची अंमबजावणी होवून १ हजार ३२३ शेतकऱ्यांना हे अनुदान यापूर्वीच मिळाले आहे. मात्र अजूनही जवळपास ६००० शेतकरी या प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित आहेत. त्यासाठी आ. आशुतोष काळे पाठपुरावा करीत असून त्यासाठी अनुद...

नायलॉन धागा कारवाई करण्याच्या नाशिक विभागीय आयुक्तालयाच्या सूचना

शिर्डी प्रतिनिधी, दि.२३ : कोपरगाव येथील पर्यावरण प्रेमी व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांच्या पत्राची दखल घेत नाशिक विभागीय आयुक्तालयाने नायलॉन धागा विक्रेते यांचेवर कारवाई बाबत लेखी सूचना दिल्या आहेत. नाशिक विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त रमेश काळे यांनी नाशिक, जळगांव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर या जिल्ह्यात जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्त आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना नायलॉन धागा विक्रेते यांचेवर कारवाई बाबत लेखी सूचना दिल्या आहेत. मकरसंक्रांत निमित्ताने पतंगबाजी करुन उत्सव साजरा केला जातो. आपलाच पतंग दिर्घकाळ हवेत राहावा या स्पर्धेतून गत १५ वर्षापासून नायलॉन धागा वापरण्यास पतंगोत्सवात सुरूवात झाली आहे. यामुळे मनुष्य, पशू-पक्षी यांना गंभीर शारीरिक इजा तथापि काही ठिकाणी जीव गमविण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. पतंगासह ते सर्व तुटलेले नायलॉन मांजाच्या धाग्याचे तुकडे जमिनीवर पडतात. हे तुकडे विघटन होण्याजोगे नसल्याने गटारे व नदी-नाल्यासारख्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण करतात, तसेच गाय अथवा तत्सम प्राण्यांनी नायलॉन मांजाचे तुकडे समाविष्ट असलेले खाद्य सेवन केल्यामुळे त्यांना ग...

तालुक्यातील १ हजार ३२३ शेतक-यांना अनुदानाचा लाभ - विवेक कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २३ : कोपरगांव तालुक्यातील १ हजार ३२३ शेतक-यांनी नियमीत कर्जफेड केल्याबददल त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासनाने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रत्येकी पन्नास हजार रूपयांचे अनुदान जाहिर केले असुन सदरची रक्कम शेतक-यांच्या खात्यावर ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर तात्काळ जमा होणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी दिली. कोल्हे पुढे म्हणाले की, कोपरगांव तालुक्यात ७ हजार ४७७ कर्जदार शेतक-यांपैकी १ हजार ३२३ शेतक-यांनी नियमित शेती कर्ज भरले असुन त्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. सदर कर्जदार शेतक-यांना पन्नास हजार रूपयांचे अनुदान रक्कम मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आपण सातत्याने पाठपुरावा केला होता.

माजी आमदार कोल्हे यांच्या मध्यस्तीने बाजार समिती व्यवहार पूर्ववत सुरू

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : कोपरगांव बाजार समिती येथील शेतक-यांची हक्काची संस्था असून सध्या खरीप हंगामातील पीके काढुन ती मोठया प्रमाणांत बाजार समितीत शेतकरीवर्ग विक्रीसाठी घेवुन येतात मात्र काही कुरबुरीमुळे शुक्रवारी शेतमाल विक्री व्यवस्था बंद करण्याच्या मार्गावर होती, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी शेतकरीदिनी येथील शेतकरी, व्यापारी आणि हमाल बांधवांशी चर्चा करून समेट घडवून आणला आणि शेतमाल विक्री व्यवस्था पुन्हा सुरू करण्यात आली त्यामुळे शेतक-यांनी सौ. कोल्हे यांना धन्यवाद दिले आहे.           गेल्या दोन वर्षापासुन कोरोना आपत्ती संकटाशी आपण सर्वचजण दोन हात करतो आहोत, पर्जन्यमान ब-यापैकी आहे, खरीप हंगाम ऐन पीक काढणीत असतांना शेतक-यांना अतिवृष्टीमुळे दणका दिला त्यामुळे जी पिके शेतक-यांच्या हाती लागली होती ती त्यांनी कोपरगांव बाजार समितीत विक्री व्यवस्थेसाठी आणली पण स्थानिक पातळीवर भावावरून शुक्रवारी संघर्ष सुरू झाला होता. ही विक्री व्यवस्था पुन्हा आठ-दहा दिवस बंद पडली तर शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळेल, त्यांना रब्बी पीक लागवडीसाठी आर्थीक नियोजन करता येणार नाही अशा एक ना अनेक अ...

भारतीय सैन्य दलात निवडीबददल मोर्विस ग्रामस्थांनी केला सत्कार

 कोपरगांव प्रतिनिधी, दि. २३ :  भारतीय सैन्याची प्रतिमा जगात उंचावलेली असुन भारतमातेच्या रक्षणार्थं असंख्य सैनिक डोळयात तेल घालून आपले कर्तव्य बजावत असतात तालुक्यातील मोर्विससह अन्य गावातील आठ सैनिकांची भारतीय सैन्यात निवड झाल्याबददल त्यांचा मोर्विस ग्रामस्थांच्यावतीने गुरूवारी सत्कार करण्यांत आला. अध्यक्षस्थानी पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव होते.              याप्रसंगी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाचे प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्यावतीने सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी सत्कार करून सदिच्छा व्यक्त करत माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामिण भागातील मुला मुलींना सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण मिळावे यासाठी संजीवनी प्री कॅडेट ट्रेनिंग सेंटर व संजीवनी सैनिकी शाळा सुरू करून त्याबाबतचे ज्ञान दिले आहे. त्याचाच परिपाक म्हणून संजीवनी सैनिकी स्कुलचा मयुर गोरक्षनाथ कोकाटे हा विद्यार्थी भारतीय सैन्यदलात निवडला गेल्याचे ते म्हणाले.              याप्रसंगी सर्वश्री. मयुर गोरक्षनाथ कोकाटे, सा...

कोपरगावच्या ग्रामीण रस्त्यासाठी जिल्हा नियोजनमधून ८० लाख निधीं मंजूर- आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ :  कोपरगाव  मतदार संघाच्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून  ८० लाख रुपये निधीला मंजूरी देण्यात आल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. मतदार संघाच्या रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु असून या पाठ्पुराव्यातून मतदार संघातील ग्रामीण रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन समितीने करंजी, वडगाव व वेस येथील ३.०५ किलोमीटर रस्त्यासाठी व कोळपेवाडी येथील सी.डी. वर्क कामासाठी पुन्हा ८० लाख रुपये निधी दिला असून लवकरच या रस्त्याच्या कामास सुरुवात होणार आहे.  यामध्ये वडगाव येथील दौलत बाबुराव सोनवणे घर ते संजय सोनवणे घर १.०५ किलोमीटर रस्ता डांबरीकरण करणे, करंजी येथील करंजी ग्रा.मा. ७५ ते बोकटा जिल्हा हद्द ०१ किलोमीटर रस्ता डांबरीकरण करणे, वेस येथील वेस ग्रा. मा. ५२ ते जालिंदर कोल्हे घर ते बहादराबाद हद्द ०१ किलोमीटर रस्ता डांबरीकरण करणे व कोळपेवाडी येथील रा.मा. ७ ते कोळपेवाडी (ग्रा.मा. १०१) वरील दीपक ढोणे घराजवळील नाला सि.डी. वर्क करणे या सर्व कामांसाठी एकूण ८० लाख रुपये निधी दिला आहे. या सर्वच रस्त्याच्या कामांच्या निविदा प्रक...

शेवगावात राष्ट्रवादी काँग्रेसने केला सरकारच्या दडपशाहीचा निषेध

शेवगाव प्रतिनिधी, दि. २३ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, विधीमंडळातील पक्षनेते  जयंत पाटील यांना दडपशाहीचे राजकारण करत विधानसभा सभागृहात निलंबित करण्यात आले. याबद्दल शेवगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचा आज शुक्र्वारी जाहीर निषेध नोंदवण्यात आला. तसेच त्यांचे निलंबनत लगेच मागे घेण्यात यावे अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांकडे देण्यात आले.       निवेदनात म्हटले आहे की, जनतेच्या प्रश्नांवर सभागृहात चर्चा झाली तर सरकारचे अपयश उघड होईल या भीतीपोटी अध्यक्षां मार्फत ही दडपशाही केली गेली आहे. जनतेच्या प्रश्नांना सामोरे न जाणाऱ्या डरपोक सरकारच्या या दडपशाहीचा  आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो.       यावेळी ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब नरवडे, अरूण पाटील लांडे, राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, तालुकाध्यक्ष कैलास नेमाणे, युवक तालुकाध्यक्ष ताहेर पटेल, शहरध्यक्ष कमलेश लांडगे, नाना मडके, कैलास तिजोरे, संतोष जाधव, वाहाब शेख, समिर शेख, तुफैल मुलानी, महेश दातीर, संकेत वांढेकर, गोविंद किंडमिचे, अशफाक पठाण, गणेश साळवे आदि कार्...

पाटील यांच्या निलंबना बाबद कोपरगावात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने निषेध

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ :  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांना नागपूर अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आल्याच्या निषेधार्थ कोपरगाव येथे शुक्रवार (दि.२३) रोजी आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध आंदोलन करून नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारला उद्देशून केलेले वक्तव्य विधानसभा अध्यक्षांना जोडून करण्यात आलेली अन्यायकारक निलंबनाची कारवाई विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रकार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केल्या. यावेळी बोलतांना राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे म्हणाले की, राज्याच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात राज्याच्या जनतेच्या अतिशय महत्वाच्या विषयाला वाचा फोडून सरकारला धारेवर धरले. सीमा प्रश्न, राष्ट्रपुरुषाचा अपमान करणाऱ्या प्रवृत्ती, अतिवृष्टी नुकसान भरपाई आदी विषयांना हात घातला. त्यावेळी सरकारला घेरले जाण्याच्या भीतीपोटी अभ्यासू व्यक्तींना बाजूला ठेवण्याच्या उद्देशातून विरो...