Posts

Showing posts from November, 2022

संवत्सर येथील जनता हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली ग्रहांची स्थिती

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३० : कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील रयत शिक्षण संस्थेच्या जनता इंग्लिश स्कूलमध्ये पोलाद कंपनी लिमिटेड व वस्तू स्टील कोपरगांव यांच्या संयुक्त सहकार्याने तारांगण खगोलशास्त्र याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. सौरमंडळातील तारे, सूर्य, चंद्र, उल्का, आकाशगंगा, ग्रहांची स्थिती व त्यांचे नियम याबाबतच्या चित्रफीतीमधून प्रत्यक्ष अनुभव घेता आल्याने विद्यार्थी भारावून गेले. या कार्यक्रमासाठी शाळेच्या स्कूल कमेटीचे सदस्य राजेश परजणे पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मधुकर साबळे, उपसरपंच विवेक परजणे, वस्तू स्टीलचे व्यवस्थापक किशोर विभुते, तारांगणचे मार्केटींग ऑफीसर अजय कुलकर्णी, सिस्टीम ऑपरेटर अभिषेक ढवळे, सहाय्यक ऑपरेटर प्रशांत पंडीत, ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव साबळे, सोमनाथ निरगुडे, शिवाजीराव गायकवाड यांच्यासह पालक विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी मृख्याध्यापक रमेश मोरे यांनी स्वागत केले तर शिक्षक भगवान शिंदे यांनी प्रास्ताविक केले. मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल शाळेच्यावतीने राजेश परजणे पाटील ...

मनाच्या शांती व शुध्दीसाठी धार्मिक कार्यक्रम आवश्यक - उदागे महाराज

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३० :  गोपाळ काल्यामुळे मनातील सर्व प्रकारचे विकार दूर होण्यास मदत मिळते. जीवनात परस्पर प्रेम, बंधुता, एकता, आदी सदगुणांची वृद्धी होते. काल्याचे किर्तन म्हणजे प्रसादाचे किर्तन. प्रसाद कोणालाही सहजासहज मिळत नाही. प्रयत्नाशिवाय काहीही शक्य नसल्याने जीवनात संत संगत अतिशय महत्वाची असते. असे प्रतिपादन हभप राम महाराज उदागे यांनी येथे केले.         येथील खंडोबा मंदिराच्या प्रांगणात चंपाषष्ठीच्या निमित्ताने प्रतीवर्षीप्रमाणे  पार पडलेल्या अखंड हरीनाम सप्ताह, श्रीग्रंथराज   ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता, काल मंगळवारी हभप राम महाराज उदागे यांच्या  काल्याच्या कीर्तनाने झाली यावेळी ते बोलत होते.         या वेळी उदागे महाराज पुढे म्हणाले, सध्या भौतिक सुखाची रेलचेल दिसत असली तरी मनुष्य मनशांती गमावून बसला आहे. मनाच्या शुद्धीसाठी अखंड हरीनाम सप्ताह, प्रवचन, कीर्तन, अत्यंत आवश्यक असून अशा विविध धार्मिक उपक्रमातून आजच्या पिढीला आदर्श जीवन जगण्याचे परिपूर्ण मार्गदर्शन मिळत असल्याने धार्मिक उपक्रमाला महत्व आहे.      या सप्ताह काळात विविध नामवंत प्रवचन व कोर्तनकारांची उपस्थिती ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानाचा महासागर - विजय बोरुडे

गायिका कडुबाई खरात यांच्या गितांनी संविधान सन्मान सोहळा संपन्न  कोपरगाव प्रतिनिधी, दि.३० : जगातील विद्वानांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमांकाने घेतले जाते. जगविजेत्या सिकंदरला तलवारीच्या पात्याने जे जमले नाही ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पेनाच्या टोकाने करुन दाखवले. असे विचार कोपरगावचे  तहसीलदार विजय बोरूडे यांनी व्यक्त केले.  कोपरगाव येथील घटनापती प्रतिष्ठाण, कोपरे फौंडेशन व आरपीआय उत्तर नगर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान सन्मान सोहळा नहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्राची प्रसिद्ध गायिका कडुबाई खरात, भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष भिक्खू मिलिंद बोधी, भिक्खू संघाचे जिल्हा प्रभारी भिक्खू आनंद सुमनसिरी, सचिव भिक्खू कश्यपजी, आरपीआयचे दिपक गायकवाड,  आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुका अध्यक्ष जितेंद्र रणशुर, भिमा बागुल, बुध्दीस्ट यंगफोर्सचे राजेंद्र ञिभुवन यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.   कोपरगाव मध्ये प्रथमच संविधान दिन सोहळा इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला होता तर प्रसिद्ध ...

गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय मागे - कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : शासकीय गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईला सरकारने स्थगिती द्यावी, यासाठी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे न हटविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने घेतला असून, सरकारच्या या निर्णयामुळे गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याबाबत महसूल विभागाने नोटिसा बजावलेल्या कोपरगाव तालुक्यातील नऊशे कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.               गायरान जमिनीवरील गरीब लोकांनी बांधलेली घरे अतिक्रमण म्हणून काढली जाणार नाहीत, असा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत सरकार अनुकूल असल्याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंगळवारी (२९ नोव्हेंबर) स्पष्ट केले आहे.                उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गायरान जमिनीवरील अतिक्रम...

सक्षम अधिकारी बनायचे असेल तर संयम, चिकाटी व परिश्रमांची जोड आवश्यक - पंकज नाईकवाडे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : “एक सक्षम अधिकारी बनायचे असेल तर संयम आणि चिकाटी यांना सातत्यपूर्ण परिश्रमांची जोड दया स्पर्धापरीक्षेत तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.” असे प्रतिपादन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी पंकज नाईकवाडे यांनी केले. के. जे. सोमैया महाविद्यालयात “तयारी स्पर्धा परीक्षांची”या व्याख्यानात ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर जेष्ठ  प्राध्यापक के. एल. गिरमकर, प्रा. गणेश देशमुख डॉ. संतोष पगारे,डॉ. संजय अरगडे, डॉ. सुनील कुटे, डॉ. रवींद्र जाधव व डॉ. वसुदेव साळुंके उपस्थित होते. नाईकवाडे नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले असून विक्रीकर अधिकारी (STI) या पदावर निवड झाली आहे. ते महाविद्यालयच्या वाणिज्य शाखेचे माजी विद्यार्थी असून बेसबॉल या खेळाचे राष्ट्रीय खेळाडू आहेत. “अधिकारी म्हणून माझ्या जडणघडणी मध्ये महाविद्यालयातील क्रीडा विभाग वाणिज्य विभाग व स्पर्धा परीक्षा विभाग यांचे भरीव योगदान आहे.” असेही गौरवोदगार त्यांनी याप्रसंगी काढले. “स्वतःच्या क्षमतांना ओळखले तर स्पर्धापरीक्षेत तुम्ही नक्कीच यशस्वी होणार.”असे प्र...

रांजणगाव, तळेगाव परिसरवर अन्याय - नितीन शिंदे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : पन्नास वर्षापेक्षा जास्त अपेक्षाने निळवंडे धरणाचे पाणी मिळेल या आशेने जिरायती भागातील शेतकऱ्याला न्याय मिळू शकत नाही ही फार खेदाची बाब आहे. २००८ सालापासून निळवंडे धरणात अडवलेले पाणी जिरायत भागत मिळत नाही हा एक प्रकारचा त्यांच्यावर अन्याय होत आहे, कारण या जिराईत भागाला निळवंडे धरणातील पाण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. बाकीच्या जिल्ह्यातील बागायत भागाला अन्य पर्याय उपलब्ध आहेत. रांजणगाव तळेगाव या परिसराला निळवंडे व्यतिरिक्त कुठलाच पर्याय उपलब्ध नाही हा त्यांच्यावर एक प्रकारे फार मोठा अन्याय आहे. महाविकास आघाडीच्या काळात अत्यंत सुरळीत काम चालू असलेलं गौण खनिज मिळत नाही हे कारण फारच कमालीचं अस्वस्थ करणारा आहे, केंद्र व राज्य सरकारने या परिसरातील जनतेच्या सहनशक्तीची अधिक परीक्षा पाहू नये. राज्यातील शेतकरी विरोधी सरकार सुबुद्धी मिळो, शेतकरी हिताची म्हणजेच पिक विमा असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाई, कोपरगाव- संगमनेर – कोपरगांव व्हाया रांजणगाव रस्ता दुरुस्ती असो वा निळवंडे कालवे पूर्ण करणे कामी गौण खनिज उपलब्ध होऊन न देणे मुळे निर्माण झालेला प्रश्नांबाबत लवकरात लवकर ...

संजीवनी पाॅलीटेक्निकचा फुटबाॅल संघ विभागीय पातळीवर प्रथम

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३० : इंटर इंजिनिअरींग डीप्लोमा स्टुडंटस् स्पोर्टस् असोसिएशन (आयईडीएसएसए), महाराष्ट्र  राज्य प्रायोजीत ई १ झोन विभागीय सामन्यांमध्ये संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या फुटबाॅल संघांने प्रतिस्पर्धी संघांवर दणदणीत विजय मिळवुन वर्चस्व सिध्द केले. आता हा संघ संजय घोडावत पाॅलीटेक्निक, हातकणंगले, जि. कोल्हापुर येथे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धां जिंकण्यासाठी जोरदार तयारी करीत आहे, अशी माहिती संजीवनी पाॅलीटेक्निकने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात पुढे म्हटले आहे की, राक्षी ता. शेवगांव येथिल ढाकणे पाॅलीटेक्निक येथे विभागीय फुटबाॅल सामन्यांसाठी ई १ झोन मधिल विविध पाॅलीटेक्निक व डी. फार्मसी संस्थांमधिल एकुण १५ संघांनी सहभाग नोंदविला. यात संजीवनीचा कर्णधार निखिल रमेश पाटील याच्या नेतृत्वाखाली, महेश उमेश वाघ, उत्तम कुमार, स्मिथ राहुल भावसार, अथर्व भारत वाघमारे, भावी अनंत चव्हाण, स्मीथ भाऊसाहेब लवांदे, ओम अजय मोरे, कुणाल गणेश शिंदे, आशिष  चंद्रकांत साळुंखे, एम. डी. फैजानराजा, सिध्दार्थ राजेंद्र वाके, राजन आदर्श जाधव, चित्तरंजन कुमार व एम. डी. सैफुला यांनी सलग...

गोदावरी कालवे रब्बी हंगाम पाटपाणी अर्ज भरण्यास ३० डिसेंबर पर्यंत मुदतवाढ - कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३० : गोदावरी कालवे रब्बी हंगाम पाटपाणी नियोजनासाठी नमुना नंबर ७ पाणी मागणी अर्ज ३० डिसेंबर पर्यंत भरून द्यावे असे जाहिर प्रकटन नाशिक पाटबंधारे विभागाने प्रसिध्द केले असुन जास्तीत जास्त शेतक-यांनी मुदतीत पाणी मागणी अर्ज भरावेत असे आवाहन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी केले आहे.             बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांची सध्या रब्बी हंगामासाठीच्या शेती मशागतीची कामे सुरू असल्याने नाशिक पाटबंधारे विभागाने नमुना नंबर ७ वर पाणी मागणी अर्ज ३० नोव्हेंबर पर्यंत सादर करावे म्हणून प्रकटन प्रसिध्द केले होते त्यास मुदतवाढ मिळावी म्हणून आपण पत्रान्वये मागणी केली होती त्यास कार्यकारी अभियंता सागर शिंदे व उपकार्यकारी अभियंता सु. का. मिसाळ यांनी ३० डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली असुन त्याबाबतचे पत्र गोदावरी उजवा व डावा कालवा उपविभाग व शाखा कार्यालयांना पाठविले आहे. तरी जास्तीत जास्त शेतक-यांनी या वाढीव मुदतीचा लाभ घेवुन नमुना नंबर ७ वर पाणी मागणी नोंदवावी. गोदावरी कालवे सल्लागार समितीची बैठक निश्चित करून बारमाही गोदावरी कालवे सिंचन पाटपाणी आर्वतनांत...

आता तुकाराम मुंडे, शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी

मंदीराच्या नावाखाली चुकीची दुकानदारी करणाऱ्यांची उडाली झोप कोपरगाव प्रतिनिधी दि.२९ : संपूर्ण राज्यात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटावून कामचुकारांची झोप उडवणारे व नियमाला धरुन काम करणारे प्रामाणिक अधिकारी म्हणून ज्यांची ख्याती आहे, असे बेधडक अधिकारी तुकाराम मुंडे यांची नुकतीच शिर्डी साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आल्याने शिर्डी साईबाबा संस्थानच्या मंदीर प्रशासनातील कर्मचाऱ्यासह मंदीराच्या नावाखाली चुकीची दुकानदारी करणाऱ्यांची झोप उडाली आहे. राज्यातील विविध भागातील विविध विभागात धडाकेबाज काम करून शिस्तबद्ध नियोजन करणारे अधिकारी तुकाराम मुंडे यांची शिर्डी येथे नियुक्ती झाल्याने कही खुशी कही गम अशी अवस्था झाली आहे.  प्रशासकीय सेवेचा दांडगा अनुभव असलेले राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची मंगळवारी शिर्डी देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्य सरकारने दिले असून शिर्डीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी असलेल्या भाग्यश्री बानायत यांची नागपूर या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.  भाग्यश्री बानायत यांनी शिर...

वृंदावन नगर व सावित्रीबाई फुले नगरला भूमिगत गटार, रस्ते सुविधा द्या - राष्ट्रवादीची मागणी

कोपरगाव प्रतीनिधी, दि. २९ : कोपरगाव शहरातील वृंदावननगर व सावित्रीबाई फुलेनगर परिसरात भूमिगत गटारी व रस्ते सुविधा नसल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून तातडीने भूमिगत गटार व रस्ते सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी शांतारामजी गोसावी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कोपरगाव नगरपालिका हद्दीत येणाऱ्या वृंदावन नगर (शिंदे रोड ते खडकी रोड) व सावित्रीबाई फुलेनगर (निकम घर ते महाजन घर) या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत आहे. मात्र या ठिकाणच्या नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा कोपरगाव नगरपालिकेकडून मिळत नाहीत. या परिसरातील रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली असून भूमिगत गटारी नसल्यामुळे सर्वत्र सांडपाणी साचून सर्वत्र डासांचे साम्राज्य निर्माण होवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेवून वृंदावन नगर व सावित्रीबाई फुले नगरमध्ये भूमिगत गटार व रस्ते सुविधा ...

आण्णाभाऊ साठे डि.लीट पदवीने सन्मानित, शेवगावात जल्लोष

शेवगांव प्रतिनीधी, दि. २९ : महाराष्ट्राच्या जडणघडणीत साहित्य आणि विचाराच्या माध्यमातून एक परिवर्तनवादी चळवळ उभी करणारे लोकशाहीर, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना औरंगाबाद येथील एम.जी.एम. ( माहात्मा गांधी मेमोरीयल ) विद्यापिठाने पहिली मानद मरणोत्तर डि.लीट पदवी देऊन सन्मानित केल्याची  बातमी समजताच येथील त्यांच्या चाहत्यांनी शेवगाव मध्ये फटाके वाजवुन ढोल ताशाचा गजर करत पेढे वाटून जल्लोष साजरा केला.         साहित्य रत्न, लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर डि .लिट. पुरस्काराने सन्मनीत करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक, शास्त्रज्ञ, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर यांचे उपस्थितीत एमजीएमचे कुलपती डॉ. अंकुश कदम यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊच्या स्नुषा सावित्रीबाई मधुकर साठे यांनी डी लिट स्वीकारली. या आनंदा प्रित्यर्थ अण्णाभाऊंच्या चाहत्यांनी शेवगावात अण्णाभाऊ साठे पुतळ्यास पुष्पहार आर्पण करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.     यावेळी मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष विजयराव देशमुख यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्...

शेवगावात दुसऱ्या दिवशी सरपंचासाठी ८ तर सदस्यासाठी ३१ अर्ज

शेवगाव प्रतिनिधी, दि. २९ : तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी आज मंगळवारी सरपंचपदासाठी सहा गावातून आठ तर सदस्य पदासाठी ३१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.       निवडणूका होणाऱ्या गावापैकी – खानापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी सर्वाधिक ३ उमेदवारी अर्ज दाखल झाले तर आखेगाव, रांजणी ,वाघोली, अमरापूर, रावतळेकुरुडगाव येथे प्रत्येकी एकेक उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. ग्रामपंचायत सदस्य पदासाठी वाघोली येथे सर्वाधिक १० उमेदवारी अर्ज दाखल झाले तर खानापूर ८, आखेगाव ६, खामगाव ५ व रांजणी, रावतळेकुरुडगाव येथे प्रत्येकी एकेक अर्ज दाखल झाले आहेत.          येत्या शुक्रवार (दि.२ डिसेंबर ) अखेर उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असल्याने पुढील तीन दिवस मोठया संख्येने अर्ज दाखल होण्याचे संकेत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्राची जमवाजमव करण्यासाठी, तर उमेदवारांचे अनुकुल पॅनल तयार करण्यात नेत्यासह कार्यकर्त्यांची धामधुम जोरात सुरु असल्याने ऐन थंडीच्या कडाक्यात निवडणुका होणाऱ्या गावांचे राजकारण ढवळून निघाले आहे.      यावेळी सरपंच पद थेट जनते मध...

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयातील विद्यार्थानी अनुभवली थ्रीडी आकाशगंगेची सफर

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : पोलाद स्टील कंपनी व श्रेयस सिमेंट हाऊस कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तारांगण या उपक्रमातून श्रीमान गोकुळचंद विद्यालयात विद्यार्थ्यांनी थ्रीडी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आकाशगंगेची सफर केली. मार्केटिंग बरोबरच सामाजिक क्षेत्रात कार्याची भावना जोपासत पोलाद स्टील कंपनी व श्रेयस सिमेंट हाऊस यांनी ही संधी उपलब्ध करून दिली. यावेळी श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यां बरोबरच मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळळकर, उपमुख्याध्यापक श्री.रमेश गायकवाड व पर्यवेक्षक श्रीमती उमा रायते आणि सर्व शिक्षक वृंदांनी हा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद घेतला. आकाशगंगातील   खगोलीय वस्तू, त्याचबरोबर सूर्यमालेतील ग्रहांचा अभ्यास व त्याची माहिती घेताना विद्यार्थ्यांना आपण स्वतः अवकाशात असल्याची आभासी अनुभूती मिळाली.  यावेळी विद्यार्थ्यांनी याबाबतचे अनुभव कथन केले तसेच या माध्यमातून अशाप्रकारे अभ्यास करण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या प्रसंगी पोलाद कंपनीचे मार्केटींग आफीसर अजय कुलकर्णी, प्लनेटोरीयम ऑपरेटर अभिषेक ढवळे, मदतनीस श्री.प्रशांत पंडीत आदींचा सत्क...

जात पडताळणी व मतदार नोंदणीला उस्फुर्त प्रतिसाद

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ :  आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र व महाविद्यालयातील नवमतदारांना मतदार नोंदणी करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या अभियानास पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. कोपरगाव शहरातील ११ वी व १२ वी विज्ञान विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात पडताळणीसाठी येणाऱ्या अडचणींची दखल घेऊन जात पडताळणी कार्यालय अहमदनगर यांच्या माध्यमातून आ. आशुतोष काळे यांच्या सहकार्याने एस. एस. जी. एम. व के. जे. सोमैया महाविद्यालयात सोमवार (दि.२८) पासून जात पडताळणी सहाय्यता केंद्र व ज्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे १ जानेवारी २०२३ रोजी वय वर्ष १८ पूर्ण होणार आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे. हे अभियान गुरुवार (दि.०१) डिसेंबर पर्यंत सुरु राहणार असून पहिल्याच दिवशी या अभियानाला विद्यार्थ्यानी मोठा प्रतिसाद दिला. जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अभ्यास बाजूला ठेवून करावी लागणारी धावपळ वाचवून महाविद्यालयातच सुविधा उपलब्ध करून दिल्याबदल आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले...

धामोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अमिना शेख यांची बिनविरोध निवड

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २८ : तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या श्रीमती अमिना शेख यांची सरपंच जयश्री नारायण भाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी बिनविरोध निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक एफ. एन. तडवी यांनी काम पाहिले. या निवडीबददल भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.              याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री प्रभाकर मांजरे, शिवाजीराव वाघ, चंद्रशेखर माळी, द्वारकाबाई बाबासाहेब वाणी, बाबासाहेब गांगुर्डे, बबनराव भाकरे, श्यामसुंदर पवार, श्रीमती स्वाती किशोर आढाव, योगिता ढोमसे उपस्थित होते.      या निवडीसाठी सर्वश्री. अशोकराव भाकरे, कैलास माळी, प्रकाश वाघ, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक विलासराव माळी. राहुल वाणी, रोहिदास साळुंके, विलास भाकरे, बाळासाहेब अहिरे, सुनिल वाणी आदिंनी विशेष परिश्रम घेतले.            नवनिर्वाचित उपसरपंच अमिना शेख व माजी उपसरपंच चंद्रशेखर माळी यांचा यावेळी सत्कार करण्यांत आला. सत्कारास उत्तर देतांना अमिना शेख म्हणाल्या की, धाम...

सुशांत घोडके यांना राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने देण्यात येणारा मानाचा “छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार – २०१९ कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थापक आणि वृक्ष पर्यावरण प्रेमी, भारत सरकारचे स्वच्छतादूत सुशांत घोडके यांना जाहीर झाला आहे. यात राज्यस्तरीय व्यक्तींमध्ये दूसरा तर नाशिक विभागाचा प्रथम अशा दोन पुरस्कारांचा समावेश आहे.          महाराष्ट्र शासन वन विभागाने वृक्षारोपण आणि पर्यावरण क्षेत्रातील व्यक्ती, संस्था यांची यादी जाहीर केली आहे. राज्यात वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो. शिर्डी उपविभागासह कोपरगाव तालुक्यात स्वच्छतादूत आणि पर्यावरण प्रेमी म्हणून सुशांत घोडके यांचे कार्य अनेक वर्षांपासून सर्वांना परिचित आहे. हरित सेनेच्या माध्यमातून वृक्षारोपण आणि संवर्धन माध्यमातून सुशांत घोडके यांनी कोपरगावसह खेड्यापाड्यात रुजवलेली वृक्षारोपण चळवळ, विविध पक्षी, प्राणी यांना दिलेले जीवदान, वन्यजीवांच्या संरक्षणासाठी केलेली जनजागृती केली आहे.पक्षी व पर्यावरणास हानीकारक नायलाॅन धाग्यावर प्रखर जनजागृती त्यांनी ...

गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यास स्थगिती - आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याबाबत महसूल विभागाकडून गायरान जमिनीवर वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबांना नोटीसा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे हे सर्व प्रचंड कुटुंब दडपणाखाली होते. त्याची दखल घेवून या कुटुंबांना दिलासा मिळावा यासाठी आ. आशुतोष काळे यांनी पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून महसूल विभागाच्या नोटिसींना स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील गायरान जमिनीवर वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबांना दिलासा मिळाला असून त्यांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. गायरान जमिनीवर असलेली अतिक्रमणे काढण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महसूल विभागाच्या वतीने नोटीसा देण्यात आल्या होत्या. कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये सरकारी गायरानावर वास्तव्यास असलेल्या अनेक कुटुंबांना त्याचा फटका बसून त्यांचे संसार उध्वस्त होणार होते. मागील अनेक वर्षापासून वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबांची संख्या जवळपास ९०० एवढी होती. हि सर्व कुटुंब आर्थिक दृष्ट्या दुर्बल असून त्यांना राहण्यासाठी स्वत:च्या मालकीची जागा...

शेवगावात क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी

शेवगाव प्रतिनिधी, दि, २८ : क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी शेवगाव शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व शैक्षणिक संस्था, नगरपरिषद, पंचायत समिती, शिक्षण विभाग, तसेच विविध संघटनाच्या वतीने आज फुले जयंती हिरीरीने साजरी करण्यात आली.      येथील क्रांती चौकात शेवगाव नागरीकांच्या वतीने फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कौन्सिल सदस्य कॉ.संजय नांगरे म्हणाले, सर्वसामान्य माणूस शिक्षित व्हावा, स्त्रियांना देखील शिक्षण घेऊन पुरुषांच्या बरोबरीने काम करता यावे.  हा स्त्री पुरुष समानतावादी दृष्टिकोन समोर ठेवून शिक्षणाची कवाडे समस्त बहुजनांसाठी महामानव क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांनी खुली केली. सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करून समाजवादी ध्येयाची प्रेरणा सर्वसामान्य जनतेसमोर ठेवून मनुवादी वृत्तीला ठेचून काढण्याचे काम फुले यांनी केले.       यावेळी  शिवा आधाट, शेवगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. कारभारी गलांडे, खंडू  बुलबुले, गणेश डोमकावळे, राजेंद्र मगर , नंदू मोहिते , जावेद बागवान, बाळासाहेब गोरे, रमेश डाके, प्रदीप...

जिद्द, चिकाटी, अभ्यासातील सातत्याच्या जोरावर यश मिळतेच - नितीनराव औताडे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २८ : हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे महाविद्यालयात भारतीय संविधान दिन आणि महाविद्यालयाचा प्रथम वर्धापन दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून निवड झालेल्या मढी येथील कु. पुजा गवळी आणि डाऊच बुद्रुक येथील अक्षय पवार उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून माजी शिक्षण अधिकारी मा. नवनाथ औताडे साहेब उपस्थित होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब अंबाडेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. मा.पुजा गवळी यांनी स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्यातील न्यूनगंड दूर करून जिद्द व चिकाटीच्या जोरावर आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे. अक्षय पवार यांनी मी परिस्थितीवर कशी मात केली व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा केला या बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी वाचनात सातत्य ठेवावे ज्ञान मिळवण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करावा. कष्ट करण्याची जिद्द ठेवावी अपयशाने खचून न जाता जोमाने प्रयत्न करावे. महाविद्यालयाचे प्राचार्य ...

के. जे. सोमैया महाविद्यालयातील 108 विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : स्थानिक के.जे.सोमैया वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्यू मध्ये महाविद्यालयातील 108 विद्यार्थ्यांची पुण्यातील नामांकित कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव व प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रो.(डॉ.) एस.आर.पगारे यांनी दिली. यामध्ये रिलायन्स मार्ट पुणे, अल्ट्रस्ट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, फिन ड्राईव्ह सोलुशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मानव संसाधन विभागाचे प्रमुख श्री.संतोष स्वामी, श्री.तुषार मोरे व श्री.संतोष मोहिते यांनी विद्यार्थ्यांची लिखित व मौखिक तसेच ग्रुप डिस्कशन च्या माध्यमातून निवड केली आहे. या निवडीचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेपूर्वीच आपली नियुक्ती पत्रेही कंपनीच्या वतीने सुपूर्द करण्यात आली आहे. सदर विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या समाप्तीनंतर नियुक्त झालेल्या पदावर रुजू व्हायचे आहे. अशी निवड झालेले हे जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय आहे. यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील विविध विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ग्रामीण भा...

श्रीगणेश शैक्षणिक संकुलाने कुस्तीत मिळविले ६ सुवर्ण

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ :  जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राहाता तालुका शालेय क्रीडा कुस्ती स्पर्धेत श्री गणेश इंटरनॅशनल स्कुल व जुनिअर कॉलेज, कोऱ्हाळेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत ६ सुवर्ण पदके मिळविली.           यामध्ये १४ वर्षे वयोगटात यश बाबासाहेब थेटे वजन ३८ किलो विजेता ,सुजय वसंत शिरोळे वजन ४१ किलो विजेता , कृष्णा नारायण तासकर वजन ४४ किलो विजेता ,साई सुनील खकाळे वजन ५७ किलो विजेता, गौरव जालिंदर काकड वजन उपविजेता ५७ किलो, १७ वर्षे वयोगटात कृष्णा शिवाजी चव्हाण वजन ६८ किलो विजेता, शुभम जनार्धन मालुसरे वजन उपविजेता ५० किलो, ईश्वर संतोष डांगे वजन ५७ किलो उपविजेता, आयुष्य ईश्वर मांडवडे वजन ६५ किलो उपविजेता, अथर्व संजय गुंजाळ वजन ६० किलो उपविजेता, १९ वर्षे वयोगटात ऋषिकेश भारस्कर वजन ८६ किलो विजेता, सुजल राजेश बोरावके वजन ६३ किलो उप विजेता झाले आहेत. विजेता विद्यार्थी सुवर्ण पदकासाठी पात्र ठरले आहेत.हि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नेवासा येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.           सर्व खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ...

गौण खनिज तुटवड्यामुळे विकास कामे ठप्प - आमदार काळे

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ :  कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. या निधीतून बहुतांश विकास कामे पूर्ण झाली असून अनेक विकास कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र प्रगतीपथावर असलेल्या अनेक विकास कामांना मागील काही आठवड्यांपासून गौण खनिज तुटवडा जाणवत असून खडीचा देखील मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सद्यस्थितीला हि विकास कामे थांबलेली असून या विकास कामांना गौण खनिज व खडीचा नियमित पुरवठा व्हावा यासाठी तातडीने बैठक घ्यावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे. दिलेल्या निवेदनात आ. आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, कोपरगाव मतदार संघासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. या निधीतून कोपरगाव शहर, ग्रामीण भाग व मतदार संघात अनेक विकास कामे पूर्ण झाली असून अनेक  विकास कामे सुरू आहेत. यामध्ये प्रशासकीय इमारती, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची निवासस्थान, धार्मिक स्थळे, दळणवळणासाठी आवश्यक असणारे रस्ते निर्मिती व दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे. ही कामे मागील काही दिवसापासून गौण खनिज ...

कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका शिवसेना लढवणार

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२७ : कोपरगाव तालुक्यात होऊ घातलेल्या 26 ग्रामपंचायत निवडणुका शिवसेना पक्षाच्या वतीने लढवणार असून स्थानिक उपतालुकाप्रमुख गट गण प्रमुखांनी तातडीने बैठका घेऊन सरपंच व सदस्यांचे फॉर्म भरण्याचे नियोजन करावे. अशा सूचना उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे व तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे यांनी बैठकीत केल्या आहे.     त्यासाठी खर्डे कॉम्प्लेक्स येथे ऑनलाइन फॉर्म भरणे व इतर अडचणी सोडवण्याकरिता स्वतंत्र कार्यालय सुरू केले आहे. ग्रामपंचायत पातळीवर मोठ्या प्रमाणात गट तटामुळे विकास कामांना अडथळे येत असून ग्रामपंचायतचा कारभार पारदर्शक होण्यासाठी सदस्य व सरपंच म्हणून चांगल्या उमेदवाराची आवश्यकता आहे. अजूनही पाणी, रस्ते, वीज, सामान्य कुटुंबाच्या अडचणी केंद्र व राज्य शासनाच्या योजना थेट ग्रामपंचायतच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायतीला सक्षम व अभ्यासू सदस्य व सरपंचाची आवश्यकता आहे त्यामुळे गाव पातळीवर चांगले उमेदवार शिवसेनेच्या माध्यमातून निवडणुकीत उभे करून निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका सर्वांनी मांडली. या बैठकीत भाऊसाहेब शेळके ,कृष्णा अहिरे, अशोक कानडे, राहुल होन, विजय...

सर्व धर्मांच्या धर्मगुरुंची रथातुन मिरवणुक काढत संविधानातील एकतेचे दर्शन घडवले

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२६ : कोणत्याही धर्मातील व्यक्तींना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असो किंवा शिक्षण, नोकरी, सत्ता, संपत्ती, नाते संबंधापासुन साध्या कामगार, मजुरांना आपल्या न्याय हक्काच्या लढाईत संविधानाचे महत्व अधिक आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाचे संविधान कोण्या एका जातीधर्माला अनुसरुन किंवा मध्य ठेवून तयार केले नाही तर ते या देशातील तमाम नागरीकांच्या हितसंबंध व संरक्षणासाठी निर्माण केले आहे. माञ त्याच संविधानाची खरी ओळख सर्वसामान्य नागरीकांना नाही. आपल्या मुलभुत हक्काचा आधार संविधान आहे याची जाणीव करुन देण्यासाठी कोपरगाव येथील संविधान चौक फाउंडेशनचे संस्थापक नितीन शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी आज संविधान दिना निमित्ताने सर्व धार्मांच्या धर्मगुरुंना रथात बसवून देशाचा तिरंगा फडकावत संविधान रॅली कढत संपूर्ण कोपरगाव सह जिल्ह्याचे लक्ष वेधले. कोपरगावच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात संविधानाची जनजागृती करणारी रॅली निघाल्याने शहरातील बहुतांश नागरीही या रॅलीत सामील झाले होते. शहरातील टिळकनगर येथील संविधान चौकातुन शनिवारी सकाळी ११ वाजता सविंधान सन्म...

शेवगाव बसस्थानकात मरणयातना भोगणाऱ्या वृद्धाची सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली दाखल

शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : शेवगांव बसस्थानकात पायाला गंभीर जखम असल्याने एक वृद्ध बेवारस व्यक्ती गेल्या तीन दिवसापासून विव्हळत पडली होती. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कौन्सिल सदस्य संजय नांगरे, पत्रकार रवींद्र  उगलमुगले, एसटी युनियनचे सचिव दिलीप लबडे यांनी आज 108 रुग्णवाहिका बोलावून त्याला ग्रामीण रुग्णालयात पोहोच करुन वैद्यकीय मदत मिळवून दिली.        शेवगाव बस स्थानकात निवृत्ती आव्हाड हा बेवारस वृध्द गेल्या तीन दिवसापासून पायाच्या गंभीर जखमेमुळे मरणयातना भोगत होता .पायाच्या जखमेवर डास माशा बसून त्या घेत असलेला चावा सहन होत नसल्याने त्याने त्या जखमेवर दगड ठेवले होते. एका बाजूला पडून त्याचे विव्हळणे चालू होते. जखमेची दूर्गंधी परिसरात सुटली होती. मात्र आपल्या बसस्थानकात अशा अवस्थेत पडलेल्या या बेवारस वृद्धाकडे आगार व्यवस्थापक वा कोणा जबाबदार अधिकाऱ्याचे लक्ष गेले नाही.    मात्र बसस्थानक परिसरातील हातावर पोट असलेली फळविक्रेती महिला  भोरी खोडदे या गरीब महिलेने या काळात त्याला दोन वेळेस  जेवण देऊन माणुसकीचे दर्शन घडविले. तिनेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे  राज्य कौंसिल सदस्य काॅ.संजय नांगरे...

सक्तीची वीज बिल वसुली थांबवा, अन्यथा उग्र आंदोलन - राष्ट्रवादीचा इशारा

शेवगाव प्रतिनिधी, दि.२५ : वीज बील वसुलीसाठी राज्य सरकारने शेती पंपाचे वीज कनेक्शन कट करण्याचा घेतलेला निर्णय अन्यायकारक असून तो तातडीने रद्द करावा अन्यथा माजी आमदार डॉ. नरेंद्र पाटील घुले, माजी आमदार चंद्रशेखर घुले व माजी सभापती डॉ.क्षितिज घुले यांचे नेतृत्वाखाली तालुक्यात मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज तहसिलदार छगनराव वाघ व वीज केंद्राचे उपअभियंता एस.एम. लोहारे यांना देण्यात आला आहे.      या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील शेतकरी गेल्या दोन वर्षापासून कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशा दुहेरी संकटाचा सामना करीत आहे. महावितरण कंपनीने २२ नोव्हेबंर रोजी एक पत्रक काढून शेतक-यांचे वीज कनेक्शन वीज बिल वसुलीसाठी कट करण्याचा निर्णय राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. हा निर्णय अत्यत दुर्देवी आहे. शेतकरी अतीवृष्टीचा सामना करीत असातंना अशा प्रकारचे धोरण घेणे निश्चितपणे चुकीचे आहे. आतापर्यंत शेतक-यांना अतीवृष्टीचे अनुदान मिळालेले नाही. तसेच खरीप कपाशी, बाजरी, तुर व इतर पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. शेतक-यांनी शेतीसाठी केलेला...

शेवगाव रोटरी क्लबचा सायकल बँक हा अनोखा उपक्रम

शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : शेवगाव रोटरी क्लब व प्रांजल फाउंडेशन  यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीच्या लेकी या उपक्रमांतर्गत  शेवंगाव तालुक्यातील हुशार व गरजू विद्यार्थिनींसाठी पद्मभूषण बाळासाहेब भारदे विद्यालयात सायकल बँक हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे.       तालुक्यातून लांब अंतरावरून विद्यालयात येणाऱ्या हुशार व गरजु विद्यार्थिनींना त्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून एकूण नऊ विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. त्यामध्ये समिक्षा भारत बोरुडे अमरापूर, भाग्यश्री संजय केदार मंगरूळ, स्नेहल अशोक दिवटे आव्हाणे, साक्षी अशोक पठाडे आव्हाणे, अक्षदा प्रकाश मगर तळणी, मयुरी सावता पुंड दादेगाव, दिपाली भाऊसाहेब नरके गहिलेवस्ती, शेख झरीन अकिल सोनेमिया वस्ती, काजल मगर लांडेवस्ती  या विध्यार्थीनींना सायकली देण्यात आल्या. यावेळी  प्रांजल फाउंडेशनचे, कल्याण येथील आरटीओ प्रशांत देवणे यांनी आपल्या मुलीच्या स्मरणार्थ दिलेल्या सायकली विद्यार्थिनींचे भविष्य उज्वल करतील असा विश्वास व्यक्त केला.       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे अध्यक्ष डॉक्टर आशिष लाहोटी होते. सायकल बँकचे प्रोजेक्ट च...

एम.पी.एस.सी.परीक्षेत कोपरगावच्या गुणवंतांची कामगिरी अभिमानास्पद – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कोपरगाव तालुक्यातील गुणवंतांनी मिळविलेले यश अभिमानास्पद असून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घेवून यश संपादन करावे असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे. कोपरगाव तालुक्यातील मढी बु. येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी कर्मचारी बाबुराव गवळी यांची कन्या कु. पूजा बाबुराव गवळी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहाय्यक कक्ष अधिकारी परीक्षेत राज्यात मुलींमध्ये प्रथम क्रमांक तसेच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात मुलींमध्ये ९ वा क्रमांक मिळवून राज्यकर निरीक्षक या पदावर निवड झाली आहे. या मिळविलेल्या दुहेरी यशाबद्दल तसेच डाऊच बु. येथील अक्षय सोपान पवार यांनी देखील राज्यात १५ वा क्रमांक मिळवून सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल व माहेगाव देशमुख येथील सचिन भगुरे यांची सी.आय. एस. एफ. मध्ये निवड झाल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी या गुणवंतांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, प्रतिकूल परिस्थिती तुमच्या यशात अडसर ठरू शकत ना...

सिंगल युज प्लास्टिकच्या विरोधात नगरपरिषदेची मोठी कारवाई

कोपरगांव प्रतिनिधी दि. २५ :   सिंगल युज प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुचनेनुसार आज मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांच्या मार्गदर्शनानुसार उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे, प्र. आरोग्य निरीक्षक सुनिल आरण व स्वच्छता अभियान नोडल ऑफिसर भालचंद्र उंबरजे यांच्या पथकाने आज शहरात सिंगल युज प्लास्टिकच्या विरोधात मोठी कारवाई केली. सदर कारवाईमध्ये शहरातील सात दुकानातून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जप्त करण्यात आले. यात कॅरीबॅग, प्लॅस्टिकचे ग्लास, थर्माकोल पत्रावळ्या, सिल्व्हर कोटेड पत्रावळी आदींचा समावेश आहे. सदरील दुकानदारांना पाच हजार रुपयांचा दंड परिषदेमार्फत ठोठावण्यात आलेला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुचनेनुसार सिंगल युज प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने विशेष अभियान घेण्याबाबत राज्यातील सर्व नगरपरिषदांना कळविण्यात आलेले होते. त्यानुसार आज कोपरगाव नगरपरिषदेने शहरातील तुळजाभवानी कॉम्प्लेक्स भागातील उमेश पहाडे, महाल्क्ष्मी प्लास्टिक व ठोळे ट्रेडर्स या दुकानातून, स्टँड परिसरातील अग्रवाल फरसाण ( संदीप अग्रवाल), मेन रोडवरील संजय फरसाण तर येवला रो...

पोलीस स्टेशनच्या परिसरात दिवसाढवळ्या अल्पवयीन चोरांची टोळी

कोपरगाव पोलीस स्टेशनच्या आवारातील वाहने असुरक्षित कोपरगाव प्रतिनिधी दि.२५ : चक्क पोलीस स्टेशनच्या आवारातून दिवसा ढवळ्या शाळकरी चोरांची टोळी गाड्यांची किंवा गाड्यांचे साहित्याची चोरी करतात असे जर कोणी सांगितले तर त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. सामान्य माणुस  पोलीस स्टेशनला जायचे म्हंटले तरी त्याला आगोदर घाम फुटतो अशा ठिकाणी चोर तर कसे काय येणार असेच आपणास वाटेल. पण कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुरूवारी चक्क पोलीसांनीच तीन अल्पवयीन मुलांना दिवसा गाड्यांचे साहित्य खोलून चोरताना रंगेहात पकडे. कमालीची बाब म्हणजे गाड्यांचे सुट्टे पार्ट खोलून ते भंगारमध्ये विकण्याचा प्रताप अनेकवेळा केल्याची कबुली एका पकडलेल्या अल्पवयीन चोराने दिली. तो म्हणाला साहेब मी आजच पहील्यांदा आलोय. मला एका मिञाने पोलीस स्टेशन परिसरातील गाड्यांचे सुट्टे साहित्य खोलण्यास सांगितले. मी आजुन गाडी खोलली सुध्दा नाही. मी जवळच्याच काॅलेजमध्ये शिक्षण घेतोय. मिञाने माझ्या बॅगेत जबरदस्तीने पक्कड व स्क्रुड्रायव्हर टाकले व मला पोलीस स्टेशनच्या परिसरातील गाड्यांची खोलखाल करायला सांगितले असे म्हणत दुसऱ्याकडे बोट करीत त्या अल्पवय...

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या ३३ व्या पुण्यतिथी निमीत्त जपानुष्ठाण सोहळा

 कोपरगांव प्रतिनिधी, दि. २४ : कोपरगांव बेट भागातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांचा तेहतीसावा पुण्यतिथी सोहळा समाधीस्थानी २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान आयोजित केला असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री काशिविश्वनाथ महादेव शैक्षणिक व गोपालन ट्रस्टचे मठाधिपती विश्वस्थ प. पू. स्वामी रमेशगिरीजी महाराज, अध्यक्ष दत्तात्रय बाळकृष्ण होळकर व उपाध्यक्ष विलास यादवराव कोते यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी वाराणशी येथील जुना पंचदशनाम आखाडयाचे अखिल भारतीय आखाडा परिषदचे आंतरराष्ट्रीय संरक्षक महामंत्री महंत स्वामी हरिगिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.            या पुण्यतिथी काळात दररोज पहाटे ५ ते ६ नित्यनियम विधी ६ ते ७ सत्संग प्रवचन, दररोज सकाळी ८.३० ते ११ हभप गणपत महाराज लोहोटे यांचे गुरूचरित्र ग्रंथाचे सामुदायीक पारायण, रात्री ८ वाजता प्रवचन सत्संग, सायंकाळी ७.३० वाजता आरती आदि धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यांत आले आहे.              या संपुर्ण सप्ताह काळात हभप गुरूवर्य भास्करगिरी महाराज, सरलाबेटाचे ...

समता दिनदर्शिका आम्हा सर्वांची दैनंदिनी - डॉ. यशराज महानुभाव

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : ‘समता पतसंस्थेने आर्थिक क्षेत्रात सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. संस्थेचे कर्मचारी सभासदांना आदरपूर्वक सेवा देत असतात. समताने सहकार क्षेत्रात एक प्रतिष्ठा निर्माण केली आहे. समता प्रत्येक वयोगटातील सभासदांसाठी विविध योजना आणि उपक्रम राबवत असते. या सर्व सुविधा आणि उपक्रम हे स्तुत्य स्वरूपाचे आहेत. समताचा हा उपक्रमदेखील आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असून, आम्हा सर्वांची दैनंदिनी असल्याचे आम्ही समजतो,’ असे प्रतिपादन कोपरगाव तालुक्यातील महानुभाव संप्रदायाचे आचार्य डॉ. यशराज महानुभाव यांनी केले. समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व. मोहनलाल आनंदराम झंवर सभागृहात गुरुवारी कोपरगाव शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध डॉ. नरेंद्र भट्टड, बबलू वाणी, कान्हेगाव येथील संस्थेचे ज्येष्ठ ठेवीदार किसन सांगळे, संस्थेचे ज्येष्ठ संचालक अरविंद पटेल, चांगदेव शिरोडे, संदीप कोयटे, गुलशन होडे यांच्या उपस्थितीत समता दिनदर्शिका २०२३ चे प्रकाशन झाले. डॉ. महानुभाव यांचा सत्कार संस्थेचे ज्येष्ठ संचालक अरविंद पटेल यांच्या हस्ते, डॉ. नरेंद्र भट्टड यांचा सत्कार संदीप कोयटे यांच्या ह...

शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्रातही भविष्य घडविण्याची विद्यार्थ्यांना मोठी संधी - भाग्यश्री बिले

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २५ : जागतिकीकरणाच्या युगात उद्योग क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रानेही आता लक्षवेधी भरारी घेतली आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच क्रीडा क्षेत्रात भविष्य घडविण्याची चांगली संधी उपलब्ध झालेली असून या संधीचा विद्यार्थ्यांनी आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी श्रीमती भाग्यश्री बिले यांनी संवत्सर येथे आयोजित कार्यक्रम केले. खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संवत्सर येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात श्रीमती भाग्यश्री बिले बोलत होत्या. प. पू. महंत रमेशगिरीजी महाराज, जि. प. चे माजी सदस्य राजेश परजणे पाटील, तहसीलदार विजय बोरुडे, पंचायत समितीचे कृषी व बालविकास अधिकारी पंडितराव वाघिरे, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब साबळे, गट शिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख, उप अभियंता श्री लाटे, शाखा अभियंता जी. पी. गुंजाळ, विस्तार अधिकारी बबनराव वाघमोडे, श्री तोरवणे, डिजीटल तज्ज्ञ संदीप गुंड, ग्रामविकास अधिकारी कृष्णदास आहिरे यांच्यासह ...

संजीवनी अकॅडमीच्या ओम मोरेचा आयबीएम कडून गौरव

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ :  आयबीएम या जगातील सर्वात जुन्या साॅफ्टवेअर कंपनीने भारतात राष्ट्रीय पातळीवर आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत ऑनलाईन स्पर्धा घेतल्या. यात संजीवनी अकॅडमीच्या ओम नानासाहेब मोरे या विद्यर्थ्याने अंतिम फेरीत प्रवेश  केला. कंपनीने त्याला दिल्ली येथे आमंत्रित केले व आयबीएम स्कील्स बिल्ड या वार्षिक  सम्मेलनात त्याने तयार केलेल्या प्रोजेक्टवर पाॅवरपाॅईंट सादरीकरण देण्यास सांगीतले. यातही बाजी मारत आयबीएम कंपनीकडून गोल्डन बॅच विनर पुरस्कार मिळवुन संजीवनी अकॅडमी आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही देशात आघाडीवर असल्याचे अधोरेखित केले. संपुर्ण भारतातुन फक्त दोनच स्पर्धक अंतिम फेरीत पोहचले त्यात ओमचा या शेतकऱ्याच्या मुलाचा समावेश  होता, अशी माहिती स्कूलच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. पत्रकात पुढे म्हटले आहे की, ओमने संजीवनी अकॅडमीतील काॅम्प्युटर विभागाचे प्रमुख आदित्य गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम आयबीएम कंपनी संचलित रोबोटिक्स, कोडींग, आर्टिफिशिअल इंटिलिजन्स, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, डेटा सायन्स, डिझाईनिंग, क्रीटिकल थिंकिंग, असे सुमारे २०० को...

पुणतांबा-रस्तापुरचा पाणी प्रश्न मार्गी, १५.६२ कोटी निधी मंजूर – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२४: कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राहाता तालुक्यातील पुणतांबा, रस्तापूर  या गावांचा मागील अनेक वर्षापासूनचा पाणी प्रश्न कायमचा सुटावा यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून जल जीवन मिशन योजने अंतर्गत या गावांच्या पाणी पुरवठा योजनांसाठी १५ कोटी ६२ लाख ९७ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी तीन वर्षात जवळपास ७० पेक्षा जास्त गावातील पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळवून जवळपास २७० कोटी निधी मिळवून या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविला आहे. उर्वरित गावांचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु होता. या पाठपुराव्यातून पुणतांबा-रस्तापूर या गावातील पाणी पुरवठा योजनेला निधी मिळविण्यात आ. आशुतोष काळे यांनी यश मिळविले. या निधीतून साठवण तलावाची दुरुस्ती, साठवण तलावापासून जल शुद्धीकरण केंद्रापर्यंत नवीन पाईप लाईन टाकणे, सोलर पॅनल, उच्च क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्या व वितरण व्यवस्थे...

कोपरगाव मध्ये जुगार खेळणाऱ्यावर धडक कारवाई, २३ लाखाच्या मुद्देमालासह २८ जुगारी ताब्यात

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२४: कोपरगाव शहरालगत असलेल्या टाकळी फाटा परिसरातील धोंडीबानगर येथील एका मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्या २८ जुगारी सह त्याच्याजवळील रोख रकमे बरोबर इतर मुद्देमालासह तब्बल २३ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करुन धडक कारवाई केल्याने जुगार खेळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या घटनेची पोलीसांकडू मिळालेली अधिक माहीती अशी की, कोपरगाव शहरासह उपनगरात वाढलेल्या अवैध व्यवसायीकांनी धुमाकूळ घातला याची माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना समजल्याने त्यांनी कोपरगाव शहरात बुधवारी राञी आपल्या पथकाला पाठवले गुप्त माहीतीच्या अधारे कळाले की, शहरालगत असलेल्या धोंडीबानगर येथे एका मोकळ्या जागेत तीनपत्ते जुगार खेळत असल्याची माहीती मिळाली. त्यानुसार बुधवारी राञी ९ वाजण्याच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक डी.एस. मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान गोरे इतर १२ कर्मचाऱ्यांच्या पथकांनी धाड टाकुन तीन...

माजी सभापती जेष्ठ विधिज्ञ भागवतराव काळवाघे यांचे निधन

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : कोपरगांव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती भागवत यमाजी काळवाघे (९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या कामगार विभागाचे चौकशी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अभियंता किरण, बांधकाम व्यवसायिक हर्षल यांचे ते वडील होते.               कै. भागवतराव काळवाघे यांच्या पार्थीवावर शिंगवे येथे अंत्यसंस्कार करण्यांत आले. १९८१ ते १९८६ या काळात त्यांनी तालुका पंचायत समितीचे सभापती, श्रीगणेश सहकारी साखर कारखान्यांचे संचालक तर माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे विश्वासु सहकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. १९७४ ते २०२२ या ४८ वर्षाच्या कालावधीत त्यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या कामगार विभागाचे चौकशी अधिकारी म्हणूनही काम पाहिले होते. तसेच प्रसिद्ध वकील, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्राशी त्यांचा निकटचा संबंध होता. राहाता तालुक्यातील शिंगवे गांवचे सुपुत्र तर ग्रामपंचायत ...

प्रलंबित प्रश्न त्वरित मार्गी लावा, माजी आमदार कोल्हे यांची मुख्यमंत्री शिंदे यांचेकडे मागणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज बुधवारी (२३ नोव्हेंबर) शिर्डी दौऱ्यावर आले असता भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी कोल्हे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत कोपरगाव तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा केली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांकडून १०० टक्के नुकसान भरपाई देणे, नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गावर ड्रेनेजची व्यवस्था करणे आदींसह कोपरगाव तालुक्यातील पाणी, शेती, रस्ते आणि इतर प्रलंबित प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडून ते त्वरित सोडविण्याची मागणी कोल्हे यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दुपारी शिर्डी येथे भेट देऊन श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेऊन आरती केली. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या पत्नी लताताई शिंदे, राज्याचे महसूलमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र पाटील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी भाजपच्या प्रदेश सचि...

डॉ. प्रशांत भालेराव यांना 'एशिया पॅसिफीक आयकॉनिक अवॉर्ड' जाहीर

शेवगाव प्रतिनिधी, दि. २३ :  ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत भालेराव यांना अमेरिकेच्या ग्लोबल ह्यूमन राईट कौन्सिल फॉर पीस अँड सस्टेनबल डेव्हलपमेंट या संस्थेचा  ‘एशिया पॅसिफीक आयकॉनिक अवार्ड’ हा पुरस्कार जाहीर झाला असून येत्या ११ डिसेंबर २०२२ ला सायंकाळी सातला बँकॉक येथे  मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात  येणार आहे.   ग्लोबल ह्यूमन राइट्स कौन्सिल फॉर पीस अँड    सस्टेनबल डेव्हलपमेंट या संस्थेचे चेअरमन डॉ .साल्हटोर मोकिया यांनी गेल्या १६ नोव्हेंबरला डॉक्टर भालेराव यांना पत्र पाठवून हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी  बँकॉक ला येण्यासाठी निमंत्रीत  केले आहे. देशातील  नऊ राज्यात तब्बल १२७  शाखांच्या विस्ताराद्वारे बँकिंग व्यवस्थापन क्षेत्रात निष्ठापूर्वक केलेल्या विशेष कामगिरीची तसेच विविध सामाजिक क्षेत्रात अर्थतज्ञ डॉ. भालेराव सातत्याने करत असलेल्या समाज उपयोगी कार्याची दखल या संस्थेच्या पुरस्कार निवड समितीने घेतली असल्याचे नमूद करुन डॉ. भालेराव यांची ही उत्तुंग कामगिरी समाजातील अन्य नागरिकांना प्रेरणादायी व स्फुर्तीदायक ठरत असल्याचे कौतूक देखील चेअरमन डॉ. म...

तालुक्यातील १२ पैकी १० ग्रामपंचायतीवर महिला सरपंच निवडून येणार?

शेवगाव प्रतिनिधी, दि. २३ : तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी जनतेतून थेट सरपंच पदासह निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून यातील १२ पैकी १० ग्रामपंचायतीवर महिलांची सरपंच पदी जनतेतून वर्णी लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत अनेक ग्रामपंचायतीवर महिला राज अवतरणार आहे.      या निवडणुकीसाठी येत्या २७ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होणार असल्याने या गावात निवडणूक रणधुमाळी सुरु झाली असून ऐन थंडीच्या कडाक्यात गाव पातळीवरील राजकारण ढवळून निघण्यास सुरुवात झाली आहे.    ग्रामपंचायतीचा कारभार बहुतेक ठिकाणी पुरुष मंडळी हाताळताना दिसतात. परंतु या निवडणुकीत १२ पैकी १० ग्रामपंचायतीचे सरपंच महिलांसाठी आरक्षित असून सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने गावची धुरा सांभाळणाऱ्या गावकारभाऱ्याना आता आपल्या पत्नीला, मुलीला वा सुनेला निवडणुकीच्या रिंगनात उतरवावे लागणार आहे. मात्र  आपल्या मंडळाच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांची जमवाजमाव ते मतदान संपेपर्यतची सर्व प्रक्रिया गावकारभा-यांना सांभाळण्याची वेळ आली आहे.     तालुक्यातील जोहरापूर, खामगाव, प्रभूवाडगाव, भायगाव, रावतळे कुरुडगा...

पाच वर्षाच्या परीने आईची धोकादायक प्रसुती केली बरी

 अंगावर काटा आणणारी प्रसुतीची घटना गोवा एक्स्प्रेस मध्ये घडली कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : ‘देव तारी त्याला कोण मारी’ याची प्रत्यक्ष अनुभुती कोपरगावच्या लेकीला आली. प्रसुतीची वेळ नाही, प्रसुतीला तब्बल एक महीना बाकी आहे. पती-पत्नी दोघेही वैद्यकीय क्षेत्रातील आहेत. भाऊ डॉक्टर आहेत. वेळेवर औषधोपचार सुरु आहेत. वेळेवर तपासण्या केल्या. कोणताही धोका नाही म्हणून रेल्वेने सुखरुप प्रवास करण्यासाठी सर्वात जलद  गोवा एक्स्प्रेसने कोपरगावच्या दिशेने प्रवास करण्यासाठी बसलेल्या सोनाली गाढे यांचा प्रवास जीवघेणा होईल याची कोणालाही शंका नव्हती. देव तारी त्याला कोण मारी याचा अनुभव सोनाली गाढे यांनी बुधवारी अनुभवला…! त्यांच्या लहान परीमुळे जीवदान मिळाले  एक्स्प्रेस रेल्वेने प्रवास करताना अचानक प्रसुती वेदना होवू लागल्या आणि सोबत असलेल्या पाच वर्षाच्या परीने प्रसंगावधान दाखवून आपल्या आईच्या वेदना नातेवाईकांना कळवून एका धोकादायक घटनेतून आपल्या आईचे व नवजात बालकाचे प्राण वाचवले.   चित्तथराक व चिञपटाला लाजवेल अशा या घटनेची अधिक माहिती अशी की, कोपरगाव हे  माहेर असलेल्या सोनाली सतिश गाढे ह्...

ग्रामिण भागातील तरूणांना कर्तृत्व सिध्द करण्यासाठी जग खुले - सुमित कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २३ : ‘खाजगीकरण, ऊदारीकरण आणि जागतीकीकरण (खाऊजा) या धोरणांमुळे तसेच तंत्रज्ञानाच्या आधुनिकतेमुळे जग कवेत आले आहे. आत्तापर्यंत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित विविध व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या  संस्थांमधील माजी विध्यार्थ्यांनी जसे वेगवेगळे किर्तीमान स्थापित करून देश परदेशात  आपले आस्तित्व निर्माण केले, तसे संजीवनी आर्टस, काॅमर्स आणि सायन्स महाविद्यालयातील पारंपारीक शिक्षण घेणाऱ्या  ग्रामिण विध्यार्थ्यांनी सुध्दा देश परदेशात  आपल्या ज्ञानाच्या आणि अंगीभुत कौशल्यांच्या जोरावर कर्तृत्व सिध्द करावे’, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप  ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी केले. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित संजीवनी आर्टस्, काॅमर्स व सायन्स काॅलेज काॅलेजच्या वतीने नुकताच ‘रिसेन्ट  रिसर्च ट्रेंड्स  इन ऑरगॅनिक क केमिस्ट्री करीअर ऑपॉर्च्युनिटीज अँड  फ्युचर पर्सपेक्टिव्हज्’ या विषयावर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय  परीसंवाद आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कोल्हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डायरेक्टर डी. एन. सांगळे, प्राचार्य...

राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक विद्यारत्न पुरस्काराने वर्षा सुडके यांचा गौरव

शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ :  येथील ज्ञानोदय इंग्लिश स्कूलच्या कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका सौ वर्षा नवनाथ सुडके यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील पुणे येथील राष्ट्रीय बाण्याच्या उपक्रमशील संस्थेद्वारे दरवर्षी संपन्न होत असलेल्या राज्यस्तरीय  गुणीजन गौरव महासंमेलन २०२२ या उपक्रमांतर्गत आदर्श मुख्याध्यापक विद्यारत्न पुरस्कार २०२२ ‘ या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.          सन २०१७ ला स्थापन झालेल्या ज्ञानोदय इंग्लिश स्कूलने अल्पावधीत मोठी प्रगती साधली. मुख्याध्यापिका सौ सुडके यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने करोना कालावधीत देखील उत्कृष्ट योगदान दिले. विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विविध ठिकाणी  वृक्षारोपण करुन पंचक्रोशीतील नागरिकांचे पर्यावरण संवर्धनाबाबत उद्बोधन केले? आदि बाबी पुरस्काराच्या निवडीसाठी विचारात घेण्यात आल्या आहेत.       पुण्यातील डेक्कन जिमखाण्याच्या सांस्कृतिक सभागृहात सौ. मनीषा कदम यांचे अध्यक्षतेखाली परिषदेचे समन्वयक प्रकाश सावंत आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत  या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात...

राज्यात पासपोर्टच्या धर्तीवर जात वैधता प्रमाणपत्र देणारा अहमदनगर पहिला जिल्हा

अहमदनगर प्रतिनिधी, दि. २२ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १९ नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथील सामाजिक न्याय भवन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून भाषण करतांना ‘‘आता यापुढे पासपोर्टच्या धर्तीवर जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येईल.’’ अशी घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांची ही घोषणा प्रत्यक्षात अहमदनगर जिल्ह्यात मूर्त स्वरूपात आली आहे. पासपोर्टच्या धर्तीवर जागेवरच कागदपत्रे तपासून जातवैधता प्रमाणपत्र देणारी अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती राज्यात पहिलीच समिती ठरली आहे. राहाता तालुक्यातील लोणी येथील पद्मश्री विखे-पाटील महाविद्यालयांत व नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता माध्यमिक तांत्रिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इय्यता ११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी जातवैधता प्रमाणपत्र वाटपाचे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात लोणी येथे ९७ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सवीकारून ९२ विद्यार्थ्यांना व भेंडा येथे  ११६ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्वीकारून १०९ विद्यार्थ्यांना जागेवरच जातवैधता प्रमाणपत्र देण्यात आले. जात पडताळणी समितीच्या या धडाडीच्या कामगिरीमुळे प्रत्यक्ष महाविद्याल...

जीवनाकडे खिलाडूवृत्तीने पहा - अतिरीक्त पोलीस अधिक्षिक भोर

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २२ : विविध खेळांच्या स्पर्धेत स्पर्धा म्हणुन न खेळता खेळ म्हणुन खेळावे. स्पर्धेत हारजीत होते तर खेळातुन आनंद मिळतो. सांघिक आणि वैयक्तिक खेळातुन जीवनाला शिस्त लागतेे, जे खेळाडू असतात ते जीवनात शिस्तीने वागुन यशस्वी होतात, असे प्रतिपादन श्रीरामपुर विभागाच्या अतिरीक्त पोलीस अधिक्षिका स्वाती भोर यांनी केले. संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निक आयोजीत व इंटर इंजिनिअरींग स्टूडंटस् स्पोर्टस् (आयईडीएसएसए), महाराष्ट्र  राज्य प्रायोजीत डब्ल्यु ५ झोन अंतर्गत अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, धुळे व नंदुरबार या सहा जिल्ह्यातील  पाॅलीटेक्निक व डी फार्मसी संस्थांमधिल मुलींच्या विविध क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख उद्घाटक म्हणुन भोर बोलत होत्या. संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डाॅ. मनाली अमित कोल्हे यांनी या शानदार सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी व्यासपीठावर संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, कोपरगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, सचिव ए. डी. अंत्रे, डायरेक्टर डी. एन. सांगळे, प्राचार्य ए. आर. मिरीकर, क्रीडा ...