Posts

Showing posts from January, 2023

धर्मनिरपेक्षता वाचविण्याचे भाकपचे आवाहन

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३१ : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ३० जानेवारी महात्मा गांधी हुतात्मा दिवस, धर्मनिरपेक्षता वाचवा दिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत शेवगाव येथील पैठण रस्त्यावरील महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याची स्वच्छता करून अभिवादन करण्यात आले.        त्यानंतर झालेल्या सभेत भाकपचे राज्य सचिव अॅड सुभाष पाटील लांडे म्हणाले,  दि. ३० जानेवारीला संपूर्ण देश गांधींना श्रद्धांजली अर्पण करीत आहे. याच दिवशी हिंदू धर्मांध गोडसेने त्यांची हत्या केली. गांधींनी वसाहतवादी राजवटीविरुद्धच्या लढ्यात आणि देशाच्या मुक्तीसाठी केलेल्या भूमिकेव्यतिरिक्त, एक अतिशय महत्वाचा संदेश सर्वांना दिला. ‘आपल्या देशातील ‘ हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि धार्मिक सलोखा” हा त्यांच्या जीवनाचा संदेश होता. ज्यावेळी भाजप-आरएसएस युती लोकांमध्ये ध्रुवीकरण करण्यासाठी, द्वेष पसरवण्यासाठी, परिस्थितीचे सांप्रदायिकीकरण करण्यासाठी आणि मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक दलित आणि आदिवासी लोकांच्या मनात भीती आणि असुरक्षितता निर्माण करण्यासाठी आक्रमक आहे, तेंव्हा धर्मनिरपेक्ष लोकशाही शक्तींनी एकज...

श्रीगणेश मधील विद्यार्थ्यांना दर्जेदार भविष्य - गोविंदराव शिंदे

श्रीगणेश शैक्षणिक संकुलात वार्षिक स्नेहसंमेलन कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३१ :  कोऱ्हाळे येथील श्री गणेश शैक्षणिक संकुलात “श्रीगणेश कलाविष्कार व स्नेहसंमेलन रंगात आले आहे.’देशभक्ती’  या संकल्पनेवर आधारित  स्नेहसंमेलनामध्ये  भावसाक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन,राष्ट्रीय जबाबदारी, ध्येय निश्चिती, निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयावर मुलांनी सुंदर नृत्य व नाटिका सादर केली. यावेळी शिर्डी प्रांताधिकारी गोविंदराव शिंदे, राहाता तालुक्याचे तहसीलदार कुंदन हिरे, श्री गणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.विजय शेटे हे उपस्थित होते.    स्पर्धकांच्या भरजरी वेशभूषा ,इमारतीचा मोहक प्रकाश आणि तालबद्ध नृत्य अविष्कार सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.संकुलाच्या विद्यार्थ्यांनी कलेबरोबरच अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेला आहे असेच भविष्यात बरेच विद्यार्थी श्री गणेश शैक्षणिक संकुल मध्ये आपले भविष्य निर्माण करतील, असा विश्वास शिर्डी प्रांताधिकारी गोविंदराव शिंदे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. तसेच संस्थेने कोविड प्रकोपानंतर शैक्षणिक व क्रीडा मध्ये उंचच उंच झेप घेतली आह...

वारी वीज उपकेंद्राची क्षमता वाढणार – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३१ : कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वारी उपकेंद्राची वीज पुरवठा करण्याची क्षमता वाढवावी यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून वारी उपकेंद्राची क्षमता वाढविण्याची मंजुरी मिळविली होती. त्या मंजुरीच्या माध्यमातून वारी वीज उपकेंद्राची क्षमता वाढविण्यासाठी अपेक्षित असलेल्या ६० लाख रुपये खर्चाच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोपरगाव मतदार संघातील रस्ते, पाणी आदी मूलभूत प्रश्नांबरोबरच अनेक वीज उपकेंद्र कमी क्षमतेचे असल्यामुळे वीज ग्राहकांना पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा होत नव्हता. यामध्ये तालुक्याच्या पूर्व भागातील वारी वीज उपकेंद्राचा देखील समावेश होता. याबाबत वारी वीज उपकेंद्राला जोडलेल्या अनेक गावातील नागरिकांची या वीज उपकेंद्राची क्षमता वाढवावी अशी मागणी होती. त्या मागणीची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी ऊर्जा विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याची ऊर्जा विभागाने दखल घेऊन वारी वीज उपकेंद्राची क्षमता वाढविण्यासाठी मंजुरी दिली होती. त्या मंजुरीतून वारी वीज उपकेंद्राची क्षमता वाढविण्यासाठी ऊर्जा विभागाने या कामाच्या निविदा ...

आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात शेवगावच्या लघुपटाचा डंका

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३१ : येथील भारदे विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक उमेश घेवरीकर यांनी दिगदर्शित केलेल्या व याच शाळेतील डॉ. सपना कुलकर्णी यांची संकल्पना, कथा व संवाद असलेल्या ‘संप्रदानम’ या संस्कृत लघुपटाने संस्कृत भारती या संस्थेने आयोजित केलेल्या चवथ्या विश्व संस्कृत लघुपट महोत्सवात या लघुपटाने दोन पुरस्कारासह स्पेशल ज्युरी अवॉर्ड देखील पटकावले. तसेच या लघुपटातील प्रमुख भूमिकेसाठी विद्या जोशी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.      अवयवदानाचे महत्व अधोरेखित करणारा अवघ्या सात मिनिटांचा हा लघुपट असून कोणतीही आधुनिक साधने हाताशी नसताना अडचणींवर मात करत शेवगाव सारख्या ग्रामीण भागातील कलाकारांनी घेतलेली ही आंतरराष्ट्रीय महोत्सवातील झेप शेवगावची शान उंचावणारी आहे.      या महोत्सवात जगभरातील शंभराहून अधिक लघुपट दाखल झाले होते. त्यातील आठ लघुपटांचे प्रदर्शन शुक्रवारी दि. २७ जानेवारी रोजी नागपूर येथील रेशीम बाग येथे करण्यात आले. या समारंभात विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.     विद्या जोशी, संकेत खेडकर, विराज अवचिते, सपना कुलकर...

धर्म, संस्कृती टिकविण्यासाठी समाज बांधवांनी एकसंघ व्हावे - भगवंत पाठक

कोपरगाव प्रतिनिधी, दि.३१: ग्रामीण भागात कोपरगाव ब्राम्हण सभेने उभारलेली भव्य वास्तूचे काम प्रशंसनीय आहे. धर्म आणि संस्कृतीची जपवणूक करण्याची जबाबदारी समाजावर आहे. समाजाविषयी द्वेषभावना बाळगणारे विशिष्ट घटक कार्यरत आहेत. अश्यावेळी समाज बांधवांनी एकत्र येवून संस्कृती टिकविणे आवश्यक आहे. सर्वांनी अंतर्मनाला साद घालून एकत्र यावे तरच समाजातील युवक-युवतींचे भवितव्य राहील असे प्रतिपादन ब्राम्हण महासंघ (नाशिक) शहराध्यक्ष भगवंत पाठक यांनी केले. कोपरगाव ब्राम्हण सभा आयोजित स्नेहसंमेलन, गुणगौरव, तिळगुळसोहळ्या प्रसंगी अध्यक्षपदावरून पाठक बोलत होते. व्यासपीठावर अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्थेचे कार्याध्यक्ष उदय मुंगी, कार्यवाह सुभाष सबनीस, प्रवीण कुलकर्णी, सुधाप्पा कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई ,ऐश्वर्या सातभाई, अध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकर, बांधकाम व्यवसायिक प्रसाद नाईक, दीपक एकबोटे आदि उपस्थित होते. स्नेहसंमेलन प्रसंगी समाज बांधवांनी सादर केलेल्या कलाविष्काराला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. शारदा संगीत विद्यालयाचे संचालक केतन व दिपाली कुलकर्णी, नादब्रह्मचे विकास किर्लोस्कर, संजय कुलकर्णी यांनी...

शेवगाव तालुक्यात एकूण ४१.७३ टक्के मतदान

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३० : सोमवारी ( दि. ३० ) झालेल्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील ३ हजार २९१ पुरुष व८५२ महिला अशा एकूण ४ हजार १४३ मतदारापैकी १हजार ४८५ पुरुष व २४४ माहिला अशा एकूण १ हजार ७२९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात एकूण ४१.७३ टक्के मतदान झाले.     पदवीधर मतदारसंघाची निवडणूक म्हणजे सुशिक्षित, जाणकार मतदारांची निवडणूक मात्र यावेळी निवडणूक यंत्रणेच्या सावळ्या गोंधळामुळे अनेकांना मतदानासाठी मुकावे लागले. अनेकांनी नाव नोंदवून देखील त्यांची नावे मतदार यादीत आढळली नाहीत. त्यामुळे  अनेकांना मनस्ताप सोसावा लागला. ऑनलाईनवर शोध घेतांना अनेकांची नावे  तालुक्या व्यतिरिक्त दूसऱ्याच तालुक्याच्या मतदान केंद्रात आढळली. मतदान नोंदणीचा फॉर्म भरूनही ऑनलाईनवर अनेकांच्या नावापुढे ‘ रेकॉर्ड नॉट फाउंड ‘ असा शेरा पाहायला मिळाला. जितू शिवाजीराव देवढे यांनी एकाच वेळी दाखल केलेल्या १६ नाव नोंदणी अर्जापैकी दोघांची नावे शेवगावात तर १४ जणांची नावे नगर केंद्रात गेलेली आढळली. प्रा.विठ्ठलराव देवढे व प्रा.संगीता देवढे या प्राध्यापक पती- पत्नीची निवडणूक यंत्रणेने पर...

अवैध वाळू डंपरवर शेवगाव पोलीसांची कारवाई

शेवगाव प्रतिनिधी, दि. २९ : येथील दादेगाव रस्त्यावरून अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर शेवगाव पोलीसांनी वाळू सह पकडून जप्त केला. पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर यांनी अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात डंपर चालक व मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.    वाळूचा डंपर ( क्र. एम एच १३   ए एक्स २७०८) पोलिसांनी पकडला असता डंपर चालक दीपक संजय साळवे (वय-३० रा. आखतवाडे तालुका शेवगाव) याचे कडे वाळू वाहतुकीच्या परवाना बाबत  विचारणा केली तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. डंपर मध्ये एक ब्रास वाळू  आढळून आली. सुमारे सात  लाख रुपयाचा डंपर व दहा हजाराची एक ब्रास वाळू असा ७ लाख१० हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.  ही कारवाई पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली  पथकातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर, बप्पासाहेब धाकतोडे, सोमनाथ घुगे, रवींद्र शेळके यांनी केली. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल दराडे करीत आहेत. 

दाट धुक्याने तालुक्यात जमीनीवर आकाश आल्याचा भास

कोपरगाव तालुक्यात वाहनचालकांनी दिवसा लावले दिवे  कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३०: कोपरगाव तालुक्यात सोमवारी पहाटे सहाच्या दरम्यान अचानक धुके वाढत गेले आणि काही क्षणात संपूर्ण परिसर धुक्याने झाकल्याने सर्वञ जमीनीवर ढग जमा झाल्याचे चिञ दिसत होते. जसा जसा दिवस उगवत होता तसतशी धुक्याची स्पष्टता अधिक दिसु लागली. सकाळी तब्बल साडे नऊ वाजेपर्यंत धुक्याची लाट ओसरली नव्हती. नगर मनमाड महामार्गावरील मोठमोठ्या वाहनधारकांना समोरचे काहीच दिसत नव्हते. गाडीचा लाईट लावला तरी धुक्यापुढे प्रकाश सुध्दा फिका पडत होता. सकाळचे साडे नऊ वाजले तरी दिवे लावून प्रवास करण्याची वेळ नागरीकांवर आली होती. धुके जरी दाट असले तरी थंडीचा प्रभाव अतिशय कमी होता. प्रथमच सकाळी उशिरापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात धुके पसरल्याने माणसांना माणसं दिसत नव्हती. संपूर्ण तालुक्यावर ढग कोसळल्याचा भास होत होता. नजर जाईल तिकडे फक्त ढग दिसत होते. मोटारसायकल चालवणाऱ्याना वाटते होते कि, आता जमीनीवरचा रस्ता संपला आणि आपण आकाशात गाडी चालवतोय की काय असे चिञ धुक्याने निर्माण केले होते. अचानकपणे पडलेल्या दाट धुक्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढ...

पदवीधर म्हणुन शिकलेलेच मतदानाला हुकले

Image
कोपरगाव तालुक्यात फक्त ४० टक्के मतदान  कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३०:   नाशिक पदवीधर मतदार संघाची विधानपरिषद निवडणुकीत कोपरगाव तालुक्यातील  केवळ ४०.४१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. माञ बहुतांश पदवीधर शिकलेल्यांनी आपला मतदानाचा हक्क हुकवला आहे.   तालुक्यात एकुण ८ हजार ४६४ पदवीधर मतदारांची अधिकृत नोंदणी करण्यात आली होती. त्यात ५ हजार ७०५ पुरुष तर २ हजार ७५९ स्ञियांचा सामावेश होता. एकुण मतदारांपैकी केवळ ३ हजार ४२० मतदारांनी मतदान केले. त्यात २ हजार ५५४ पुरूष तर केवळ ८६६ स्ञियांनी मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीचे बिजे खोलवर रोवण्यासाठी सुशिक्षित वर्गाने पुढाकार घेण्याची गरज असते. अनपड, कमी शिकलेल्यांचे प्रबोधन करुन मतदानाचे महत्त्व पटवण्याची खरी जबाबदारी पदवीधर शिकलेल्यांची असताना आज तेच त्यांचा मतदानाच हक्क शंभर टक्के बजावु शकत नसल्याने पदवीधर मतदानाच्या टक्केवारी वरुन जेवढे शिकले त्यापैकी बहुतांश मतदानाला हुकले असे म्हणण्याची वेळ आली आहे.   दरम्यान तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया तहसीलदार विजय बोरूडे यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत पार पडली कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मतदारांच...

मुलांच्या कलाविष्कारातून समता इंटरनॅशनल स्कूलची उडान - गोविंद शिंदे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत ध्वजारोहण होत असताना महाराष्ट्राच्या रथातून आपल्या संस्कृतीचे दर्शन झाले आणि संध्याकाळी समता इंटरनॅशनल स्कूलच्या मुलांच्या कलाविष्कारातून भारत आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन झाले. मुलांनी केलेल्या सादरीकरणातून समता स्कूलची उडान प्रशंसनीय आहे.या उपक्रमामुळे मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला आणि त्यांच्या कलेचा अप्रतिम आविष्कार पहायला मिळाला, असे मत शिर्डी येथील प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी व्यक्त केले. समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये उडान २०२२ – २३ या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. तसेच शिर्डी विमानतळाचे डेप्युटी कमांडर अमिश कुमार, संजीवनी गोविंद शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे गोविंद शिंदे यांचा सत्कार समता पतसंस्थेचे जेष्ठ संचालक अरविंद पटेल, डेप्युटी कमांडर अमिश कुमार यांचा सत्कार समता पतसंस्थेचे जेष्ठ संचालक चांगदेव शिरोडे तर संजीवनी शिंदे यांचा सत्कार मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे या...

श्रीगणेश मधील विद्यार्थी दर्जेदार भविष्य घडवतील - तहसीलदार कुंदन हिरे

श्रीगणेश शैक्षणिक संकुलात वार्षिक स्नेहसंमेलन कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : कोऱ्हाळे येथील श्री गणेश शैक्षणिक संकुलात “श्रीगणेश कलाविष्कार व स्नेहसंमेलन रंगात आले आहे. ‘देशभक्ती’ या संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनामध्ये भावसाक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रीय जबाबदारी, ध्येय निश्चिती, निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयावर मुलांनी सुंदर नृत्य व नाटिका सादर केली. यावेळी प्रांताधिकारी गोविंदराव शिंदे, राहाता तालुक्याचे तहसीलदार कुंदन हिरे, श्रीगणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.विजय शेटे हे उपस्थित होते.  यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संदीप चौधरी, सचिव नेमीचंद लोढा, विश्वस्त कामिनी शेटे, भारत शेटे, रवींद्र चौधरी, सुरेश गमे, देविदास दळवी, महावीर शिंगवी, संदीप सोनिमिंडे, पंकज मुथा, योगेश मूनावत, स्वप्निल लोढा, चिराग पटेल, आकाश  छाजेड, गणेश कुऱ्हाडे, प्राचार्य रियाज शेख ,प्राचार्य रामनाथ पाचोरे, प्राचार्य पंकज खडांगळे हे उपस्थित होते. स्पर्धकांच्या भरजरी वेशभूषा, इमारतीचा मोहक प्रकाश आणि तालबद्ध नृत्य अविष्कार सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. संकुलाच्या विद्यार...

वक्तृत्व ही जनतेच्या मनावर अधिराज्य करणारी कला - लांडगे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : वक्तृत्व ही जनतेच्या मनावर अधिराज्य करणारी कला असून चमकदार शैलीपेक्षा विचारांची पेरणी करणारे भाषण अधिक सरस ठरत असते, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष लांडगे यांनी केले.             येथील महात्मा सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित न्या.रानडे स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष माजी प्राचार्य रमेश भारदे होते. या स्पर्धेत राज्यभरातील पंचवीस स्पर्धकांनी सहभाग घेतला. परीक्षण प्रा. राजेंद्र सलालकर व प्रा.सुसर यांनी केले.       स्पर्धकांना मार्गदर्शन करतांना प्रा.सलालकर म्हणाले , वक्तृत्व हा समाज सुधारणेचा पाया असून व्यक्तिच्या मनाची मशागत करत वैचारिक पातळी उंचावण्यासाठी या कलेचा उपयोग व्हायला हवा.       यावेळी प्रथम क्रमांकासह स्पर्धेचा मानाचा न्या.रानडे स्मृती करंडक, सन्मानचिन्ह, प्रमाण पत्र व रोख रुपये ७ हजाराचे पहिले पारितोषिक नगर न्यू आर्टसच्या महेश उशीर याने पटकावले. बीडच्या बलभीम मह...

तळमळीने कलेचा प्रसार करणारे शिक्षक समाजचे खरे वैभव - कांबळे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : ‘शैक्षणिक साक्षरते इतकीच समाजाला कलासाक्षरतेची गरज असून हे काम तळमळीने करणारे शिक्षक समाजचे खरे वैभव असतात’, असे प्रतिपादन प्रसिध्द चित्र व शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी केले. येथील बाळासाहेब भारदे हायस्कुल मधील जेष्ठ कला शिक्षक अशोक कदम व प्राचार्य सुधीर आपटे यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.       माजी प्राचार्य प्रा.रमेश भारदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात प्रा.सुधीर आपटे व कलाशिक्षक अशोक कदम यांचा  कांबळे यांच्या हस्ते संपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी भारदे यांनी तळमळीचे व उपक्रमशील  असलेल्या या शिक्षकांची उणीव भविष्यात नक्की जाणवणार अशी भावना व्यक्त केली. आपटे व कदम या दोघांनी मनोगते व्यक्त करतांना संस्था व पदाधिकाऱ्यांचे ऋण व्यक्त केले.   विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक संस्था व व्यक्तीच्या वतीने दोघांचा सत्कार करण्यात आला. प्रास्तविक प्रा.शिवदास सरोदे यांनी तर सूत्रसंचालन निलेश मोरे यांनी केले. यावेळी हरीश भारदे, श्यामसुंदर भारदे, रजनीकांत छेडा, मधुकर वावरे आदी मान्यवर, पालक, शिक्षक व विद्यार्थ...

शनीदेवावर तेल वाहण्याऐवजी दान पेटीत वाहिले तेल

हा खोडसाळपण की, अंधश्रधा पोलीस घेतायत शोध शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ :  अलीकडे काही दिवसात लौकिक पावलेल्या व भाविकांचे श्रध्दास्थान बनलेल्या तालुक्यातील ताजनापुर येथील श्री शनेश्वर देवस्थानाची दानपेटी नेहमीप्रमाणे पंचाच्या व भाविकाच्या उपस्थितीत उघडण्यात आली असता ती मध्ये तेल आढळून आले. भाविकांनी दानपेटीत टाकलेल्या नोटा चिल्लर तेलामध्ये भिजलेल्या आढळल्या. या अगोदरही दोन वेळेस असाच प्रकार  घडला असल्याने येथील भाविकांनी लगेच शेवगाव पोलिसांना कळविले. शेवगाव पोलिसांनी देखील त्याची दखल घेत प्रत्यक्ष पाहणी करून त्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांचे मार्गदर्शनाखाली हे.कॉ. दादासाहेब शेळके या विषयी शोध घेत आहेत. अशा प्रकारची घटना घडण्याचा ही तीसरी वेळ असल्याने हे चूकून घडलेले कृत्य नसून कुणा माथेफिरुचे मुद्दाम जाणूनबुजून केलेले हे काम असावे. अशा प्रकारच्या प्रतिक्रीया यावेळी ग्रामस्थ व्यक्त करत असून दोषीला लवकरात लवकर शोधून त्यास शासन व्हावे अशी मागणी त्यांनी केली आहे.      या वेळी अप्पासाहेब वीर, नवनाथ अमृत, कैलाश नजन, भाऊराव वीर, राजेंद्र वीर ,सचिन...

तालुकास्तरीय गणित, विज्ञान प्रदर्शनात वसंत जाधव प्रथम

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : तालुक्यातील कोकमठाण येथील ओम गुरुदेव इंग्लिश मीडियम स्कूल येथे कोपरगाव पंचायत समिती आणि विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शनात माध्यमिक शिक्षक गटातून कोपरगाव तालुक्यातील वारी येथील श्री रामेश्वर विद्यालयातील उपशिक्षक वसंत जाधव यांनी पर्यावरण एक गंभीर समस्या व उपाय या शिक्षक माध्यमिक गटात प्रथम क्रमांक मिळविला. त्याबद्दल त्यांना सन्मानपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या गणित विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील सर्व शाळांतील विद्यार्थी व शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला होता. याप्रसंगी कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, विज्ञान अध्यापक संघटना अध्यक्ष एस. डी. सातव, गणित अध्यापक संघटना अध्यक्ष वाय. डी.कदम यांच्यासह सर्व मान्यवर उपस्थित होते. वसंत जाधव यांचे विद्यालयातील मुख्याध्यापक छबूराव पाळंदे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले.

नाद संगीत विद्यालयाचे संगीत परीक्षेत घवघवीत यश

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्यावतीने गेल्यावर्षी एप्रिल २०२२ मध्ये संगीत परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात कोपरगाव तालुक्यातील वारी येथील नाद संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून सहा वर्षाची परंपरा कायम राखली असल्याची माहिती विद्यालयाचे संचालक शंकर गोंडे यांनी दिली. यामध्ये प्रारंभिक परीक्षेत गायन या विषयात समीक्षा नेवगे, स्वाती सूर भैय्या, यथार्थ तिवारी, संकेत काळोखे प्रथम तर बासरी या विषयात प्राची निमसे, कीर्ती निमसे, राजलक्ष्मी कासार प्रथम श्रेणीत उतीर्ण झाले आहेत. तसेच हार्मोनियम या विषयात वैष्णवी निमसे, शीला गाडेकर, देवयानी गाढवे तर तबला या विषयात तन्मय पेंडभाजे, कृष्णा कासार, भव्य नकरानी, पायल गोंडे, साईश शिंदे, यश भड(मध्यमा प्रथम) यांनी विशेष योग्यता मिळवून सर्व विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या निकालाची परंपरा कायम राखली आहे विद्यार्थ्यांना विद्यालयाचे संचालक शंकर गोंडे यांचे मार्गदर्शन लाभले.

अक्सा मस्जिद व कब्रस्तानचे काम तातडीने सुरु करण्याची राष्ट्रवादीची मागणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : आ.आशुतोष काळे यांनी मुस्लीम समाज बांधवांच्या मागणीची दखल घेवून कोपरगाव शहरातील सर्व्हे क्र. १०५ मधील अक्सा मस्जिद व कब्रस्तानसाठी निधी दिला असून २५ लाख निधीतील या मस्जिद व कब्रस्तानचे काम तातडीने सुरु करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेकडे करण्यात आली आहे. त्याबाबत  कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वरजी चाकणे यांना निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सर्व्हे क्र. १०५ परिसरातील मुस्लीम समाज बांधवांना दफण विधी व नमाज पठण करतांना येणाऱ्या अडचणींची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी स्थानिक विकास निधीतून घेवून कोपरगाव शहरातील सर्व्हे क्र. १०५ मधील अक्सा मस्जिद व कब्रस्तानच्या संरक्षक भीत व इतर दुरुस्तीसाठी १० लाख व २५ लाख असा एकूण ३५ लाख रुपये निधी दिलेला आहे. १० लाख रुपये निधीतील काम प्रगतीपथावर असून २५ लाख निधीतील काम मात्र आजपर्यंत सुरु झालेले नाही. त्यामुळे मुस्लीम समाज बांधवांना येत असलेल्या अडचणीची दखल घेवून तातडीने अक्सा मस्जिद व कब्रस्तानचे २५ लाख निधीतील काम तातडीने सुरु करावे अशी मागणी क...

कोपरगाव तालुक्यात ९ हजार विद्यार्थ्यांचा परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभाग

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून संवाद साधला. कोपरगाव शहरातील एस.एस.जी. एम. महाविद्यालय, के. जे. एस. महाविद्यालय तसेच तालुक्यातील ६० विद्यालयांमध्ये सुमारे नऊ हजार विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम ऑनलाईन पाहिला. भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे आणि जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम कोपरगाव मतदारसंघात राबविण्यात आला.              यावेळी एस.एस.जी. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य आर. आर. सानप, के.जे. एस. महाविद्यालयाचे प्राचार्य बी. एस. यादव, उपप्राचार्य डी. एस. सोनवणे, संतोष पगारे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरदनाना थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, माजी नगराध्यक्ष दिलीप दारुणकर, विजय आढाव, जगदीश मोरे आदि उपस्थित होते. ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांनी मेहनत करावी व कोणत्याही समस्येला घाबरू नये. तणावमुक्त राहून परीक्षेला सामोरे जावे, असा सल्ला दिला.पंतप्रधान ...

पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके यांना वनश्री पुरस्कार

शिर्डी प्रतिनिधी, दि. २६ : महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने देण्यात येणारा “छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार – २०१९” कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थापक आणि वृक्ष पर्यावरण प्रेमी, भारत सरकारचे स्वच्छतादूत सुशांत घोडके यांना पालकमंत्री दादाजी भुसे यांचे हस्ते  वितरण करण्यात आला आहे. नाशिक येथील पोलिस परेड मैदानावर जिल्ह्याचे मुख्य ध्वजारोहण नंतर या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.  सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि पन्नास हजार रुपये असे या पूरस्काराचे स्वरूप आहे. वनश्री सुशांत घोडके यांना राज्यस्तरीय व्यक्तींमध्ये दूसरा तर नाशिक विभागाचा प्रथम अशा दोन पुरस्कारांचा समावेश आहे. नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांचे हस्ते नाशिक विभागाच्या छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन २०१८ व २०१९ चे वितरण करण्यात आले. या प्रसंगी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विभागीय पोलीस महासंचालक बी. जी. शेखर पाटील यांचेसह नाशिक येथील विविध खात्यांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  महाराष्ट्र शासन वन विभागाने वृक्षारोपण आ...

शेवगावमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ : भारतीय प्रजासत्ताकाचा वर्धापन दिन शेवगाव शहरासह तालुक्यात मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ठिकठीकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तहसील कार्यालयातील मुख्य सार्वत्रिक कार्यक्रमात तहसीलदार छगनराव वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक विलास पुजारी, गटविकास अधिकारी महेश डोके यांच्यासह स्वातंत्र्य सैनिकांचे उत्तराधिकारी, आजी व माजी स्वातंत्र सैनिक, विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी तसेच  नागरिकांची उपस्थिती होती.      शेवगाव न्यायालयात दिवाणी न्यायाधीश संजना जागुष्टे यांच्या हस्ते, पंचायत समिती मध्ये गटविकास अधिकारी महेश डोके, पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विलास पुजारी, नगरपरिषदेत मुख्याधिकारी सचिन राउत, वीज वितरण कंपनीत उप अभियंता अतुल लोहारे, एसटी आगारात आगार व्यवस्थापक वासुदेव देवराज, ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ.रामेश्वर काटे, आयुर्वेद महाविद्यालयात प्राचार्य डॉ.बीटी शिंदे, न्यु आर्ट्स आणि सायन्स महाविद्यालयात प्राचार्य डॉ.पुरुषोत्तम कुंदे, पद्मभूषण बाळासाहेब भारदे विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य...

पालिकेने रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत अहवाल द्यावा – सुनील गंगुले

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : कोपरगाव शहराच्या विकासासाठी आ. आशुतोष काळे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला असून या निधीतून अनेक रस्त्यांची कामे झाली आहेत. मात्र यापैकी काही रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये सांशकता आहे. त्याबाबत कोपरगाव नगरपरिषदेने स्वयंस्पष्ट अहवाल प्रसिद्ध करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. दिलेल्या निवेदनात गंगुले यांनी असे म्हटले आहे की, कोपरगाव शहरातील अनेक रस्त्यांसाठी आ. आशुतोष काळे यांनी निधी दिल्यामुळे खराब रस्त्यांना वैतागलेल्या कोपरगावकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र यापैकी काही रस्त्यांच्या बाबतीत संबंधित ठेकेदाराकडून गुणवत्तेकडे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. यामध्ये कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कल व ते श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते गोकुळ नगरी या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम गुणवत्तेनुसार झालेले नसतांना देखील त्या रस्त्याच्या कामाचे देयके संबंधित ठेकेदाराला अदा करण्यात...

प्रजासत्ताक दिनी संविधानाचे सामूहिक वाचन

शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून काल गुरुवारी ( दि.26) शेवगाव येथील क्रांती चौकात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय संविधानाचे सामुदायिक वाचन करण्यात आले. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व समविचारी पक्ष, विविध संघटनांच्या वतीने संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले.       यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव एडवोकेट सुभाष पाटील लांडे म्हणाले, जेंव्हा पासून भाजपकडे सत्ता आली तेंव्हा पासून आपल्या लोकशाहीवर, राज्यघटनेवर आणि धर्मनिरपेक्षतेवर सतत आघात करण्यात येत आहेत. आपल्या लोकशाहीला उद्ध्वस्त करण्याचे, इतिहासाचे चुकीचे पुनर्लेखन आणि राष्ट्रीयत्वाची चुकीची पुनर्व्याख्या करण्याचा भाजप-आरएसएसच्या संमिश्र प्रयत्नांना हाणून पाडावे. या उद्देशाने २६ जानेवारीला घटना दिवस म्हणून साजरा करण्यात आला.  आज सर्व धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रेमी जनतेने एकत्र येऊन  हे षडयंत्र हाणून पाडले पाहिजे.      सायली राहुल वरे या विद्यार्थिनीने भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून संविधानाचे महत्त्व विशद केले. यावेळी भाकपचे राज्य कौसिंलसदस्य काँ.संजय नांगरे, ...

गुणवत्तेला प्राधान्य देवून, निर्धारित वेळेत विकासकामे पूर्ण करा -आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : कोपरगाव शहरात सुरु असलेली विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करून विकासकामांच्या गुणवत्तेला प्राधान्य द्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरात सुरु असलेल्या विकासकामांच्या पाहणी दरम्यान उपस्थित अधिकारी व ठेकेदारांना दिल्या आहेत.             गुरुवार (दि.२६) रोजी आ. आशुतोष काळे यांनी शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम आटोपल्यानंतर कोपरगाव शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली. यामध्ये १३१.२४ कोटी निधीतून सुरु असलेल्लेया ब्रिजलाल नगर येथील पाण्याची टाकी व वितरण व्यवस्था तसेच १ कोटी निधीतून सुरु असलेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या उद्यान सुशोभिकरण, १० लाख निधीतून श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर सुशोभीकरण आदी कामांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांसमवेत पाहणी केली.                  यावेळी उपस्थित अधिकारी व ठेकेदारांना सूचना करतांना कामाच्या गुणवत्तेला प्राधान्य देवून आराखड्यानुसारच कामे करा. संबंधित अधिकाऱ्याच...

समताच्या उपक्रमांमुळे सभासदांना आर्थिक स्थैर्य - डॉ.वैशाली फुलसुंदर

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२७ : समता पतसंस्था प्रत्येक वयोगटातील सभासदांसाठी अनेक नवनवीन योजना आणि उपक्रम राबविणारी पतसंस्था म्हणून महाराष्ट्रात अग्रेसर आहे. नवनवीन योजना आणि उपक्रमामुळे समताच्या सभासदांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. घरपोहच योजनांबरोबर मोबाईल बँकिंगद्वारासुद्धा अनेक योजना सभासदांना देत आहेत. आज हर घर क्यूआरकोड योजनेचा शुभारंभ करून विशेष करून महिलांना पैशांची बचत आणि सुरक्षित करण्याचा एक मार्ग खुला करून दिला आहे, असे प्रतिपादन डॉ.वैशाली फुलसुंदर यांनी केले. समता पतसंस्थेच्या व्हा.चेअरमन सौ. श्वेता अजमेरे यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव शहरातील निवारा परिसरात हर घर क्यू.आर.कोड योजनेचा शुभारंभ डॉ.वैशाली फुलसुंदर, सौ.दिपा गिरमे, सौ जिजाबाई कापे, सौ.अनिता सरोदे यांच्या शुभहस्ते आणि सौ.शोभा दरक, सौ.जोत्सना पटेल, सौ.चित्रा शिरोडे, सौ.मंगल लोणगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.श्वेता अजमेरे यांचा सत्कार निवारा परिसरातील सौ.सुनिता मुदबखे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.वैशाली फुलसुंदर यांचा सत्कार सौ.श्वेता अजमेरे...

माजी आमदारांच्या प्रयत्नामुळे कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाणे, वसाहतीचा प्रश्न मार्गी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाणे  इमारत आणि पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नवीन वसाहतीचा प्रश्न उपमुख्यमंत्री त्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मार्गी लागला असे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले. या कामासाठी २८ कोटी ५० लाख रुपये खर्चाच्या शिंदे फडणवीस सरकारने निवेदन प्रसिद्ध केल्या त्याबद्दल या शासनाचे जाहीर आभार मानले आहे.         कोपरगाव तालुक्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी कोपरगाव शहर व तालुका (ग्रामीण) पोलिस ठाणे असे दोन स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण करण्यात आले. कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाणे गेल्या काही वर्षापासून नगरपरिषदेच्या इमारतीत कार्यरत आहे. ही जागा कामकाजाच्या दृष्टीने अपुरी व गैरसोयीची आहे. शहर पोलिस ठाण्याच्या जुन्या इमारतीच्या पश्चिम बाजूस पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची जुनी वसाहत आहे, ती पूर्णपणे मोडकळीस आली आहे. सदर इमारत दोन खोल्यांची असून, चटई क्षेत्र २०० चौरस फुटांपेक्षाही कमी आहे. पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ही जागा रा...

शेवगावात नेपियर हत्ती गवतापासून नैसर्गिक कोळशाची निर्मिती

शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : तालुक्यात काही तरुणानी आधुनिकतेची कास धरली आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार  निर्मितीसह सन२०३० पर्यंत इंधन मुक्त भारत ही संकल्पना राबविव्याचा वसा त्यांनी घेतला. त्यातूनच नेपियर हत्ती गवतापासून नैसर्गिक कोळसा उत्पादनाचा प्लांट उद्या गुरुवारी दुपारी २.वा. २६ जानेवारीच्या मुहुर्तावर तालुक्यातील तळणी येथे पहिल्या कारखान्याच्या कामाचा शुभारंभ आखेगावच्या जोग महाराज संस्कार केंद्राचे प्रवर्तक राम महाराज झिंजुर्के यांचे हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे.     या नैसर्गिक कोळस्यापासून प्रदूषण होणार नाही. दगडी कोळसा, फरनेस ऑइल, LDO पद्धतीच्या जीवाष्म इंधनाला इकोफ्रेंडली पर्याय आहे. तो लाईट निर्मिती, फौंड्री व्यवसाय, हॉटेल व्यवसाय, औद्योगिक वसाहती, कापड उद्योग आदीसाठी उपयुक्त असणार आहे. जैव इंधन निर्मिती, सेंद्रिय खत निर्मिती, इकोफ्रेंडली प्रॉडक्ट, सेंद्रिय शेती या क्षेत्रास उपयुक्त असून तळणी गावाच्या परिसरात सभासद शेतकऱ्यांचे नेपिअर गींनी गवत प्लँटसाठी हमीभावाने खरेदी केले जाणार आहे, मीरा क्लीन फ्युएल लि. व ग्रिन गोल्ड ऑरगॅनिक फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या सहकार्यातून ह...

कोल्हे साखर कारखान्याच्या सेंद्रीय खत पॅकींग मशीनचा शुभारंभ

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २५ : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी उस उत्पादक सभासद शेतक-यांच्या उत्पादन वाढीसाठी सर्वतोपरी अत्याधूनिक तंत्रज्ञानातून अंमलबजावणी केली असुन उस व अन्य पीक उत्पादन वाढीसाठी कारखान्याने स्वत: सेंद्रीय खताची निर्मीती केली असुन त्याचा पॅकींग मशीनचा शुभारंभ गणेश जयंतीच्या मुहूर्तावर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते बुधवारी करण्यांत आला. अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे होते.              प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार प्रास्तविक केले. उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. साखर सर व्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी कारखान्याच्या उपक्रमाची माहिती दिली. उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, केन मॅनेजर जी. बी. शिंदे यांनी सेंद्रीय खत निर्मिती उत्पादनाची माहिती दिली. संचालक बापूसाहेब बारहाते व सौ. संगिता बारहाते यांच्या हस्ते विधीवत पुजन करण्यांत आले.            याप्रसंगी ज्येष्ठ नेत...

शेवगावात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उत्साहात जनजागृती अभियान

शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ :   सर्व जगाने आपल्या देशाच्या लोकशाही समाज व्यवस्थेचे कौतुक केले असून प्रत्येक नागरिकाला मिळालेला मतदानाचा अधिकार हा अनमोल आहे. मतदानामुळे प्रत्येक नागरिकाला त्यांचे हक्क आणि कर्तव्य बजावण्याची मोठी संधी मिळत असून ग्रामपातळीपासून केंद्रीय स्तरावर होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन तहसीलदार छगनराव वाघ यांनी केले.  राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शेवगावासह तालुक्यात पार पडलेल्या मतदार जनजागृती अभियान अंतर्गत आयोजित  कार्यक्रमात तहसीलदार वाघ बोलत होते.          या निमित्त येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अॅड सायन्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती फेरीचे आयोजन केले होते. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून नागरिकांना मतदानाचे महत्व विषद केले. तर आबासाहेब काकडे विद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदान दिनाची शपथ देण्यात आली. तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाच्या वतीने पार पडलेल्या केंद्र निहाय निबंध, वकृत्व, चित्रकला, घोषवाक्य व रांगोळी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थी व विद्यार्थ्याचा ब...

महात्मा वाचनालय आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : येथील महात्मा सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने संस्थेचे संस्थापक न्या.महादेव गोविंद रानडे यांच्या स्मरणार्थ आयोजित  ‘न्या.रानडे स्मुर्ती करंडक राज्यस्तरीय अंतर महाविद्यालीन वकृत्व’ स्पर्धेचे उद्घाटन  शुक्रवारी ( दि. २७ ) शेवगावच्या दिवाणी न्यायाधिश श्रीमती संजना जागुष्टे यांचे हस्ते होणार आहे.   शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी परंपरा लाभलेल्या या महात्मा सार्वजनिक वाचनालयाची मुहूर्तमेढ सन १८८५ मध्ये न्या.रानडे यांनी केली. सध्या या वाचनालयात १८ दैनिके, १५ साप्ताहिके, ५ पाक्षिके आणि ८० मासिके नियमित येतात. एकूण ग्रंथ संख्या ३८ हजार ३६६ असून बाल वाचकांची पुस्तक संख्या ९ हजार २९४ असून ६ हस्तलिखिते आणि बहुसंख्य दुर्मिळ ग्रंथ उपलब्ध आहेत. गेल्या अनेक वर्षापासून लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने वकृत्व स्पर्धांचे आयोजन सातत्याने केले जात आहे. तसेच साहित्यिक तुमच्या भेटीला, ग्रंथ प्रदर्शन, दिवाळी अंक प्रदर्शन, स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, जागतिक महिला दिन असे विविध उपक्रम राबविले जातात.       दि.२७ जानेवारी रोजी आयोजीत वकृत्व ...

वेस येथील काळे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा कोल्हे गटात प्रवेश

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : युवकांनी संघटनात्मक बांधणीतुन गावचे प्रश्न सोडवावे, भारतीय जनता पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडियाच्या माध्यमातुन युवा शक्तीला विकास प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी मोठे योगदान दिले असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.              तालुक्यातील वेस सोयगांव येथील काळे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपा कोल्हे गटात प्रवेश केला त्याबददल त्यांचा मंगळवारी सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम होते.               याप्रसंगी सर्वश्री तान्हाजी श्रीपती पाडेकर, रामनाथ निवृत्ती पाडेकर, काशिनाथ बाबासाहेब पाडेकर, बाबासाहेब बळवंत पाडेकर, दादासाहेब त्रंबक पाडेकर, शांताराम सारंगधर पाडेकर, रविंद्र उत्तम पाडेकर, प्रदिप सोमनाथ पाडेकर, आबासाहेब रामनाथ पाडेकर, दिलीप गोपिनाथ पाडेकर, विकास नवनाथ पाडेकर, नितीन कचरू पाडेकर, नामदेव कचेश्वर म्हाळसकर, शकीलभाई बशीरभाई इनामदार, मच्छिंद्र नामदेव पाडेकर, मच्छिंद्र सोपान आरणे, सचिन कचरू पाडेकर, दुर्गेश काशिनाथ पाडे...

कोपरगांवच्या ४ हजार विद्यार्थ्यांचा चित्रकला स्पर्धेत सहभाग - स्नेहलता कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २५ :  परिक्षेवर चर्चा कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधून आपले अनुभव व तणाव दूर करण्याचे मार्ग सांगून विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी प्रोत्साहन देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असल्याचे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी केले.       कोल्हे पुढे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या मनावरील परिक्षेचा ताण हलका व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१८ सालापासुन परिक्षेवर चर्चा उपक्रम राबवित आहे. त्यांची संकल्पना संपुर्ण राज्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रभावीपणे राबविली आहे.           शहरासह संपुर्ण कोपरगांव विधानसभा मतदार संघात बुधवारी गणेश जयंतीच्या मुहूर्तावर जी २० जागतिक विश्वगुरू बनण्याच्यादृष्टीने भारताची वाटचाल, आझादीचा अमृत महोत्सव, सर्जीकल स्ट्राईक, कोरोना लसीकरणांत भारत पहिल्या कमांकावर, पंतप्रधानांच्या जनसेवेच्या विविध योजना, स्वच्छ भारत अभियान, आत्मनिर्भर भारत, आंतरराष्ट्रीय योगदान, बेटी बचाव बेटी पढाओ, चुलीतल्या धुराच्या त्रासातून मुक्त महिला हे दहा विषय चित्रकला स्पर्धेसाठी निवडण्यांत आले होते. त्यात ...

आत्मामालीकचा आत्माविष्कार सोहळा म्हणजे गजबजलेली पंढरी

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मामालीक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचा आत्माविष्कार सोहळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, अध्यात्मीक, कलेचा आविष्कार असतो हा सहादिवशीय सोहळा म्हणजे देशविदेशातुन आलेल्या हजारो भक्तातांसह विद्यार्थी, पालकांच्या गर्दीने आत्मामालीक संकुलाला गजबजलेल्या पंढरीचे स्वरुप आले होते.  पंपु.आत्मा मालीक माऊलींच्या विचाराला अनुसरुन या ठिकाणी अध्यात्मा बरोबर विविध कलागुणांची शिकवण दिली जाते. शैक्षणिक क्षेञात अग्रभागी असलेल्या या संस्थेत राज्यासह देशाच्या कानाकैपऱ्यातून विद्यार्थी शिकत आहेत. आत्मामालीक शैक्षणीक संकुलाचा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे अर्थात आत्माविष्काराचे आयोजन करण्यात आले होते. सहा दिवशीय चाललेल्या कार्यक्रमाचची जय्यत तयारी आत्मामालीक ध्यानपिठाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी व शैक्षणिक संकुलाचे शिक्षणाधिकारी सुधार मलीक यांच्या संकल्पनेतून  शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात करण्यात आली. संपूर्ण शैक्षणिक संकुलाला आकर्षक विद्युत रोषणाईने झगमगाट केले होते. संकुलातील मुला मुलीसह त्यांच्या ...

अहमदनगर येथे होणाऱ्या सायक्लोथान प्रचार प्रसारसाठी शेवगाव येथे प्रोमो राईट उत्साह

शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ : अहमदनगर येथे २२ फेब्रुवारीला होणाऱ्या जागतिक पातळीच्या अहमदनगर सायक्लोथान राइटच्या प्रचार व प्रसारासाठी शेवगाव ते साकेगाव अशी सकाळी ६ वा. शेवगावच्या शेकडो सायकल स्वारांनी अहमदनगर सायकल क्लबचे चंद्रशेखर मुळे यांच्या उपास्थितीत डॉ. भागीनाथ काटे, डॉ. संजय लड्डा, वसंत सुरवसे, यांनी शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सायकल रॅली काढली. यावेळी भारत माता व छात्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने सारा परिसर दुमदुमून गेला.        डॉ. योगेश फुंदे , डॉ.दिपक वैद्य, डॉ.श्रीकांत देवढे यांनी झेंडा फडकावताच रॅलीला सुरुवात झाली. साखर झोपेत असलेले शेवगावकर जयघोषांच्या आवाजाने जागे होवून राईड पाहण्यासाठी घरा बाहेर आले. सायकल स्वार थोर पुरुषांच्या व भारतमातेच्या नामांचा जयघोष करीत असल्यामुळे रॅलीला एक वेगळाच रंग आला. रॅलीला साकेगाव यु टर्न घेवून मागे फिरली.  युटर्न पाँईट वर पाणी, चक्की, एनर्जी उत्तेजक पेय ठेवण्यात आली होती.      रॅलीत महिला सायकलस्वारांची उपस्थिती उल्लेखनीय होती. युटर्न पाँईट वर फोटो शुट करण्यात आले. रमत -गमत राईडचा आनंद घेत राई ड नि...

आकाशातुन झेपावला दगडासारखा पदार्थ

कोपरगाव प्रतिनिधी, दि, २४ : तालुक्यातील भोजडे चौकी परिसरातील किरण ठाकरे यांच्या घरावर अवकाशातून  दगडासारखी टणक वस्तू पहाटेच्या सुमारास घराचा पत्रा छेदून घरात पडल्याने ठाकरे कुटुंबियांसह परिसरात एकच धावपळ सुरू झाली. पडलेली वस्तू ओबडधोबड आकाराची असल्याची माहिती घराचे मालक किरण ठाकरे यांनी दिली. पहाटेच्या दरम्यान अचानक घरावर दगडफेक झाल्याचा भास ठाकरे कुटुंबला झाला होता. मात्र शेजारी राहणाऱ्या महेंद्र सिनगर यांनी  आकाशातून चमकत जमिनीच्या दिशेने झेपावणारी वस्तू प्रत्यक्ष पाहिल्याने हे कोणी फेकलेले नसून हे आकाशातून पडले असल्याचे सांगितले. या घटनेची माहिती ठाकरे यांनी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना दिली. जाधव यांनी तातडीने घटनास्थळी पोलिसांना पाठवून घटनेचा पंचनामा करून आकाशातून पडलेल्या त्या वस्तूला  तहसीलदार विजय बोरुडे यांच्या मार्फत पुढील तपासणीसाठी खगोलशास्त्रज्ञाकडे पाठवले आहे. सदर घटनेची समाज माध्यमांवर मोठी चर्चा झडली होती. काहीं नागरिक उल्का सदृश्य वस्तू पडल्याचे तर काहीं आगीचा गोळा पडल्याची तर काहींनी टणक वस्तू असल्याची चर्चा करत होते. दरम्यान सदर टणक वस्तू घ...

शेळ्या चोरणारी टोळी पोलीसांच्या जाळ्यात

सिनेस्टाईलने शहर पोलीसांनी पकडले चोरांना   कोपरगाव प्रतिनिधी दि. २३:   प्रवास करण्यासाठी लोकांना निट मोटारसायकल मिळत नाही पण चोरांनी आलिशान कार शेळ्या चोरण्यासाठी केली आहे.  एका आलिशान कारमध्ये शेळ्यांना बसवून चोर घेवून जात असल्याची माहीती पोलीसांना  मिळताच पोलीसांनी सिनेस्टाईलने चारचाकी गाडीचा पाठलाग केला. शहराच्या मुख्य भागात हा सर्व प्रकार सोमवारी सकाळी सुरु होता. अखेर मोठ्या शिताफीने पोलीसांनी पाठलाग करुन चारचाकी गाडी सह  दोघांना ताब्यात घेवून तीन शेळ्यांची सुटका केली. या संदर्भात पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्याकडून मिळालेली अधिक माहीती अशी की, कोपरगाव शहरात सोमवारी आठवडे बाजार असल्याने शहरातील बैल बाजार रोड येथे जनावरांचा मोठा बाजार भरतो त्या बाजारात एक आलिशान कार मधुन शेळ्या घेवुन येत असल्याची माहीती गुप्त बातमीदारांकडून मिळाली. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी पोलीस यंञणा तातडीने सतर्क करून एक पथक पाठवले. यामध्ये पोलीस कर्मचारी यमुनाजी सुंबे व तमनर शेवाळे यांनी शेळ्या घेवून जाणाऱ्या गाडीवर पाळत ठेवली.  त्यांना बैल बाजार येथे पांढऱ्या रंगाची एम एच ०४ एफ आर ४२७९ क्रमांकाच्य...

संजीवनी पाॅलीटेक्निकला जनरल चॅम्पियनशिप बहाल

संजीवनी क्रीडा क्षेत्रात अव्वल कोपरगांव प्रतिनिधी, दि. २३ : इंटर इंजिनिअरींग डीप्लोमा स्टुडंटस् स्पोर्टस असोसिएशन (आयईडीएसएसए), महाराष्ट्र  राज्याच्या वतीने संजीवनी के. बी. पी. पाॅलीटेक्निकच्या भव्य मैदानावर डब्ल्यु ५ झोन अंतर्गत मुलींच्या विविध हिवाळी क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. यात सर्वात जास्त विजेते-उपविजेते पदे, सर्व क्रीडा प्रकारातील सहभाग या निकषांवर  आयईडीएसएसएने संजीवनी पाॅलीटेक्निकला जनरल चॅम्पियनशिप बहाल केले आहे, या उपलब्धीने संजीवनी पाॅलीटेक्निकने परंपरेनुसार एक नवीन किर्तीमान स्थापित केला आहे, अशी माहिती पाॅलीटेक्निकने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात पुढे म्हटले आहे की,  डब्ल्यु ५ झोन अंतर्गत अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, धुळे, जळगांव आणि नंदुरबार या सहा जिल्ह्यातील सर्व पाॅलीटेक्निकचा समावेश आहे. या भव्य क्रीडा स्पर्धांमध्ये सहा जिल्ह्यातील सहभागी ३८ पाॅलीटेक्निकच्या ८५० मुलींनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग नोंदविला. यात कबड्डी, खो-खो, व्हाॅलीबाॅल, बास्केटबाॅल, चेस, कॅरम, बॅडमिंटन, रनिंग (१००, २००, ४०० आणि ८०० मीटर), १०० मी बाय ४ रिले, जावेलिन थ्रो, डिस्क थ्र...

ग्रामीण पोलीस स्टेशन इमारत व पोलीस कर्मचारी वसाहतीचा प्रश्न मार्गी - आ. आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ :  मागील काही वर्षापासून कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनच्या इमारतीचा व कर्मचारी वसाहतीचा प्रश्न गंभीर झाला होता. त्याबाबत निवडून आल्यापासून केलेला पाठपुरावा फळाला आला असून ग्रामीण पोलीस स्टेशन इमारत व पोलीस कर्मचारी वसाहतीच्या नवीन इमारतीसाठी २८.५० कोटीच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत अशी माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोपरगाव तालुक्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेवून कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित रहावी यासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात कोपरगाव शहर व ग्रामीण असे दोन स्वतंत्र पोलीस स्टेशन निर्माण केले होते. दोन्ही पोलीस स्टेशनच्या इमारतीपैकी शहर पोलीस स्टेशन इमारतीचे काम पूर्ण झाले असून ग्रामीण पोलीस स्टेशन व पोलीस कर्मचारी वसाहतीचा प्रश्न मात्र प्रलंबित होता. ग्रामीण पोलीस स्टेशनचा कारभार सद्यस्थितीत ज्या ठिकाणी सुरु आहे त्याठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव असल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अशीच काही परिस्थिती पोलीस कर्मचारी वसाहतीची देखील झाली होती. कित्येक वर्षापूर्वी बांधण्यात आलेली ...

उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यावर सुमारे १३ लाख रुपये खर्चाचा टंचाई आराखडा

शेवगाव प्रतिनिधी, दि. २३ : पंचायत समितीने यंदाच्या उन्हाळ्यासाठी टंचाई आराखड्यात पिण्याच्या पाण्यावर सुमारे १३ लाख रुपये खर्च गृहीत धरुन तालुक्यातील नागलवाडी व सोनविहीर या दोन गावांसाठी टॅकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आल्यास एक टॅंकर उपलब्ध करण्यात येवून त्यासाठी सुमारे ७ लाख रुपयांचा खर्च तसेच तालुक्यातील सोनविहीर, नागलवाडी, सेवानगर तांडा गावठान, गोळेगाव व सोनेसांगवी अशा सहा ठिकाणी खाजगी विहिरी अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव केला आहे. त्यासाठी सुमारे पाच लाख रुपयांचा खर्च तसेच शेवगाव, राक्षी व चापडगाव येथील उद्भवातून पाणी उचलून प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेतून समाविष्ट गावात पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी सुमारे १ लाख ७५ हजार असा एकूण १३ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.      सध्या पहाटे गारवा, तर दुपारी काही प्रमाणात उन्हाच्या झळा व संध्याकाळी पुन्हा गारठा असे दुहेरी वातावरण असते. त्यामुळे हळूहळू उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली असून पंचायत समितीच्या टंचाई विभागाने पाणी टंचाईचा आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी पुढे पाठविला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून तालुक्यात ...

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी परखड मतप्रवाहद्वारे देश हित साधले - विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३: हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांनी सामाजिक व राजकीय जीवनात काम करत असताना कोणत्याही परिणामाचा विचार न करता परखड मते मांडून  देशहित साधले असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे एक सामर्थ्यवान, दमदार, प्रभावशाली व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. सर्व पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते.            ते पुढे म्हणाले की, नेताजी सुभाषचंद्रजी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठे योगदान दिले. त्यांनी भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतविले. नेताजी सुभाषचंद्रजी बोस व बाळासाहेब ठाकरे हे प्रखर देशभक्त व देशहित जपणारे थोर नेते होते.                याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, राजेंद्र सोनवणे, अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरदनाना थोरात, शहराध्यक्ष दत्तात्रय काले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, भाजपचे नगरपालिकेतील माजी गटनेते रवींद्र पाठक, सहकारमहर्षी ...

प्रभाग क्रमांक ६ मधील रस्त्यांची कामे सुरु करा – मंदार पहाडे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील प्रमुख रस्त्यांची कामे उत्कृष्ठ दर्जाची झालेली असून अजूनही काही महत्वाच्या रस्त्यांची कामे प्रलंबित असून त्यासाठी निधी देखील मंजूर आहे. या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यांची कामे तातडीने सुरु करा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक मंदार पहाडे यांनी केली असल्याचे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात मंदार पहाडे यांनी पुढे असे म्हटले आहे की, कोपरगाव शहरातील प्रमुख रस्ता म्हणून गणला जाणाऱ्या धारणगाव रस्त्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी दोन कोटी रुपयांचा निधी दिला असून या रस्त्याचे काम काही अंशी पूर्ण झाले असले तरी साईंड पट्ट्या व पेव्हिंग ब्लॉक्स बसविण्याचे काम प्रलंबित आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.    तसेच कोपरगाव शहराच्या प्रभाग क्रमांक ६ मधील अत्यंत वर्दळीच्या असणाऱ्या बँक रोड श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते तहसील कार्यालय, सोमासे रोड ते धारणगाव रोड, अरशी कॉम्प्लेक्स ते ढमाले घर, कन्या विद्य...

डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयाच्या मुलींनी मारली बाजी

एलिमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षेचा शंभर टक्के निकाल कोपरगाव प्रतिनिधी दि.२३: कोपरगाव येथील डॉ. सी एम. मेहता कन्या विद्यालयाच्या मुलींनी एलिमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षेत घवघवीत शंभर टक्के यश मिळवून तब्बल ३१ विद्यार्थीनींनी प्रथम श्रेणी अर्थात ‘ए’ ग्रेड मिळवून नवा विक्रम केला आहे.  शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये डॉ. सी.एम.मेहता कन्या विद्यामंदीरचा १०० टक्के निकाल लागला असुन एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत  परीक्षेत १२ विद्यार्थीनींनी ‘अ’ श्रेणी अर्थात ए ग्रेड मिळवला. ‘ब’ श्रेणीमध्ये ४ विद्यार्थिनी , ‘क’ श्रेणीमध्ये ३९ विद्यार्थिनीनी  यश मिळवले. ‘अ’ श्रेणी मिळवलेल्यामध्ये वाणी जोगेश्वरी,हंडी सबुरी,चौधरी तनुश्री, वर्मा तनुश्री, नाईकवाडे ईशा, राठोड आज्ञा, गव्हाळे सायली, नाईकवाडे निकिता, अनाड श्रेया, लोखंडे ज्ञानेश्वरी,बारहाते सबुरी, वाघ अनुजा तर  ब’ श्रेणीमध्ये लोणारी लावण्या, बारवकर स्वप्नाली,कुलकर्णी अनुष्का, बोधले अक्षदा आदींनी यश मिळवले. तसेच रेखाकला इंटरमिजीएट परीक्षेत ‘अ’ श्रेणीमध्ये १९ विद्यार्थिनीनी यश मिळवले तर  ‘ब’...

कोपरगावच्या विकास आराखड्यावर फक्त १०६ हरकती

कोपरगाव प्रतनिधी, दि. २३ : कोपरगाव शहर हे विकासापासून वंचित राहीलेले शहर आहे. शेजारच्या तालुक्यातील विकासाचा आलेख गगणाला भिडतोय पण कोपरगावच्या नेत्यांपेक्षा खालचेकार्यकर्ते एकमेंकांना भिडत असल्याने. शहरातील रस्ते, पिण्याचे पाणी, भूमिगत गटारी, भूमिगत विद्युत पुरवठा, प्रशस्त बगीचा, क्रीडांगणे, बंदीस्त नाट्यगृह, व्यायाम शाळा, सार्वजनिक पार्कींग, जलतरण तलाव, अद्यावत दवाखाने, प्रशस्त रस्ते, माॅल, यांचा अभाव आहे. दररोज पाणी न मिळणारे धुळगाव म्हणुन  बाहेरचे नागरीक कोपरगावकरांना हिनवतात. ओसपडलेल्या बाजार पेठेला ऊर्जितावस्था आणण्यासाठी व शहर विकासाची नवी दिशा ठरवण्यासाठी नगररचा विभागाने शहराचा नवा विकास आराखडा तयार केला आहे. तो आराखडा पुढील २० वर्षासाठी तयार केला माञ या विकास आराखड्यात अनेक ञुटी असल्याचे नागरीकांनी आपल्या हरकती अर्जातुन दाखवून देत या विकास आराखड्यावर शहरातील शेकडो नागरीकांनी नाराजी व्यक्त करीत तक्रारी नोंदवल्या आहेत. विशेषत निश्चित केलेली पुररेषा, आरक्षित भूखंड, रस्ते याला सर्वाधिक हरकती आल्या आहेत.  आरक्षित भूखंडावर शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन भ...

सौ.सुशिलामाई काळे यांच्या स्मरणार्थ तालुका स्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धा संपन्न

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ :  कोपरगावतालुक्यातील सुरेगाव-कोळपेवाडी येथील रयत संकुलातील श्री. छत्रपती संभाजी प्राथमिक विद्याललयात सालाबादप्रमाणे याहीवर्षी सौ.सुशिलामाई शंकरराव काळे उर्फ माईसाहेब यांचे २३ व्या स्मरणार्थ  तालुका स्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धां नुकत्याच संपन्न झाल्या आहेत.                 या स्पर्धेचे उदघाटन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरणारे यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कचरू कोळपे होते. स्पर्धेचे हे २१ वे वर्ष आहे. स्पर्धेतील सर्वच सामने अटीतटीचे झाले असून अंतिम सामना सुदर्शन अकॅडमी कोपरगाव व विद्या प्रबोधिनी कोपरगाव या संघामध्ये झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात कोपरगावच्या सुदर्शन अकॅडमी या संघाने विद्या प्रबोधिनी संघाला नमवत प्रथम क्रमांक पटकावून फिरता चषक आपल्या नावे केला तर विद्या प्रबोधिनी कोपरगावचा संघ उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेमध्ये कोपरगाव येथील भागचंद माणिकचंद ठोळे अकॅडमी, सुदर्शन अकॅडमी, विद्याप्रबोधिनी, के.बी.पी. प्राथमिक विद्यालय कोपरगाव, जिल्हा परिषद शाळा कोळपेवाडी,...

बसस्थानक इमारतीतील भ्रष्टाचाराला जबाबदार कोण? – दिनार कुदळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ जानेवारी २०२३ : कोपरगाव शहरात उभारण्यात आलेल्या बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत रुजू होवून एक वर्ष होत नाही तोच या बसस्थानकाचे काम किती निकृष्ठ दर्जाचे झाले आहेत हे स्पष्ट होत असून त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे दिसून येत आहे. या भ्रष्टाचाराला जबाबदार कोण? असा सवाल कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात माजी आमदार कोल्हे यांना विचारला आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिनार कुदळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, कोपरगाव शहरातील जुन्या बस स्थानकाच्या जागेवर नव्याने बांधण्यात कोपरगाव बस स्थानकाच्या इमारतीमुळे बस प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळतील अशी लाखो प्रवाशांची अपेक्षा होती. मात्र या बस स्थानकाच्या परिसरातील बांधकामाचे स्टिल एक वर्षाच्या आत उघडे पडले आहे. यावरून हे बांधकाम किती निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचे स्पष्ट होत असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे जनतेच्या पैशातून उभारण्यात आलेल्या बसस्थानकाच्या इमारतीत जनतेच्या पैशाचा अपव्यय झाला आहे. उभारण्यात आलेल्या ...