शेवगांवात बाजार समितीच्या मतदानाची व्यवस्था पूर्ण

शेवगाव प्रतिनिधी, दि . २८ : शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी रविवारी दिनांक ३० एप्रिल रोजी मतदान होणार असून  मतदानाची पूर्ण तयारी  करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक व्ही . यु . लकवाल यांनी दिली.

       शेवगावातील  रेसिडेन्सीयल हायस्कूलमध्ये  एकूण सहा खोल्यात मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.  येथील खोली क्रमांक एक व दोन मध्ये सहकारी संस्थां मतदार संघाच्या ९११  मतदारांची तसेच खोली क्र. ३ व ४ मध्ये ग्रामपंचायत मतदार संघातील ८६९ मतदारांची,

खोली क्र : ५ मध्ये व्यापारी आडते मतदारसंघाच्या एकूण १८६ मतदारांची  तर खोली क्रमांक ६ मध्ये हमाल मापाडी मतदार संघाच्या २२१ मतदाराच्या  मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे .   सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार असून सायंकाळी पाच वाजता  तहसील कार्यालयात लगेच मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. मतदान व्यवस्थेसाठी ४० अधिकारी व कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे, 

Comments

Popular posts from this blog

श्रीक्षेत्र चासनळी ते पैठण पायी दिंडी सोहळा

डॉ. होमी भाभा वैज्ञानिक स्पर्धेत आत्मा मालीकच्या विवेक निकमची गगणभरारी

सालवडगावच्या उपसरपंचपदी राजेंद्र औटी बिनविरोध