ढम्पर चालकाची वनरक्षकला मारहाण

शेवगाव प्रतिनिधी , दि. १८ : येथील गट नं- ७६९ मध्ये टाटा कंपनीचा विना नंबरचा खडीचा टीपर वनरक्षकांनी आडवला असता चालक व त्याच्या साथीदारानी त्यांना शिवीगाळ करून एका हंगामी कर्मचाऱ्यास  पळवून लकी हॉटेलच्या मागे नेऊन  लाथा बुक्याने जबर मारहाण केल्याच्या कारणावरून सरकारी कामात अडथळा आणल्याची फिर्याद शेवगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

     या संदर्भात अधिक माहिती अशी की,  वनरक्षक आप्पा माणिक घनवट ( वय ४०) रा .पाथर्डी यांनी 
या  टीपर वरील चालक परवेज बालम शेख रा. कऱ्हेटाकळी ता.शेवगाव याचे विरुद्ध ही फिर्याद दाखल केली आहे.

    शेख टिपरमधुन डबर खाली  करत असताना  फिर्यादी घनवट यांनी  येथे डबर खाली करु नको असे सागितले असता तो डबर खाली करुन टीपर घेवुन पळुन जात असताना त्यास फिर्यादी व त्यांचे सह कर्मचारी यांनी पकडले.

तेव्हा चालकाने ४ अनोळखी ईसमांना बोलावुन फिर्यादीस व वनपाल शिरसाठ यांना शिविगाळ दमदाटी करून  त्यांचेकडील हंगामी कर्मचारी शिवनाथ जिवडे हा त्याचे टिपरमध्ये बसलेला असताना त्यास लकी हॉटेलच्या पाठीमागे नेवुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन टिपर घेवुन पळुन गेले आहेत. असे म्हटले आहे.
सपोनि रविंद्र बागुल तपास करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

युवराजांनी अपुरी माहिती प्रसिद्ध करू नये - दिलीपराव बोरनारे

श्रीक्षेत्र चासनळी ते पैठण पायी दिंडी सोहळा

श्री मुक्ताई ज्ञानपीठासाठी कोल्हे परिवाराने यापुढेही सहकार्य करावे -स्वामी रामानंदगिरीजी महाराज