श्रीगणेश शैक्षणिक संकुलाने कुस्तीत मिळविले ६ सुवर्ण

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राहाता तालुका शालेय क्रीडा कुस्ती स्पर्धेत श्री गणेश इंटरनॅशनल स्कुल व जुनिअर कॉलेज, कोऱ्हाळेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत ६ सुवर्ण पदके मिळविली.

          यामध्ये १४ वर्षे वयोगटात यश बाबासाहेब थेटे वजन ३८ किलो विजेता ,सुजय वसंत शिरोळे वजन ४१ किलो विजेता , कृष्णा नारायण तासकर वजन ४४ किलो विजेता ,साई सुनील खकाळे वजन ५७ किलो विजेता, गौरव जालिंदर काकड वजन उपविजेता ५७ किलो, १७ वर्षे वयोगटात कृष्णा शिवाजी चव्हाण वजन ६८ किलो विजेता, शुभम जनार्धन मालुसरे वजन उपविजेता ५० किलो, ईश्वर संतोष डांगे वजन ५७ किलो उपविजेता, आयुष्य ईश्वर मांडवडे वजन ६५ किलो उपविजेता, अथर्व संजय गुंजाळ वजन ६० किलो उपविजेता,

१९ वर्षे वयोगटात ऋषिकेश भारस्कर वजन ८६ किलो विजेता, सुजल राजेश बोरावके वजन ६३ किलो उप विजेता झाले आहेत. विजेता विद्यार्थी सुवर्ण पदकासाठी पात्र ठरले आहेत.हि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नेवासा येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

          सर्व खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल श्रीगणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.विजय शेटे,उपाध्यक्ष संदीप चौधरी, सचिव नेमिचंद लोढा, विश्वस्थ भारत शेटे, कामिनी शेटे, रवींद्र चौधरी, संदिप सोनिमिंडे, पंकज मुथा, योगेश मुनावत, स्वप्निल लोढा, सुरेश गमे, आकाश छाजेड, चिराग पटेल , गणेश कुऱ्हाडे, प्राचार्य रियाज शेख, रामनाथ पाचोरे ,पंकज खंडांगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.बापू पुणेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक दिलीप दुशिंग व रवींद्र मोगल यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

श्रीक्षेत्र चासनळी ते पैठण पायी दिंडी सोहळा

डॉ. होमी भाभा वैज्ञानिक स्पर्धेत आत्मा मालीकच्या विवेक निकमची गगणभरारी

सालवडगावच्या उपसरपंचपदी राजेंद्र औटी बिनविरोध